खेडगाव नाशिक दि ६ : – देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
खेडगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. त्यावेळी बोलत होते.
खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, देशाला फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी या अगोदरच शेतकरी, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. यामुळे आपण त्यांचे नाव घेत आहोत. शाहू-फुले-आंबडेकर यांनी विज्ञानावर आधारित समाजकारण केले. नाशिकमध्ये आल्यावर मला आनंद होतो की इथे शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहे. इथले तरूण शेतीत नवीन प्रयोग करत असतात याचा आनंद आहे. अडचणी खूप आहेत सत्ता येते सत्ता जाते मात्र आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल – छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल. आपल्याकडचे जे पाणी गुजरातला जात आहे ते आपल्याकडे आणले तर नाशिकचाच नाही तर मराठवाड्याचा देखील प्रश्न सुटेल एक थेंब देखील महाराष्ट्रातून गुजरातला देऊ देणार नाही. तसेच संपूर्ण पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हाथ लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तसेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू तसेच जिल्ह्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, साखर हा बायोप्रोडक्ट आहे. इथेनॉलची निर्मिती कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. विजेवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा येत आहे. त्यात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा येतील त्यामुळे श्रीराम पवार यांनी नवं नवीन प्रोयग करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, डॉ. तुषार शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.