बाजारात दुभत्या गाय, म्हैस किंवा वासरांची निवड, ही एक कला मानली जाते. दुभत्या जनावरांची निवड चुकल्यावर दुग्ध व्यवसाय तोट्यात जायला वेळ लागत नाही. त्यामुळे दुध उत्पादकांनी दुभत्या जनावरांच्या निवडीसाठी खालील मार्गदर्शक सूचना लक्षात घेतल्या पाहिजे…
* जनावर खरेदी करतांना विशेषतः त्याची जात आणि दुग्ध क्षमतेवर निवड करावी.
* दुधाचे सर्वाधिक उपन्न हे पहिल्या पांच वेतांमध्ये मिळते. म्हणून निवड करतांना पहिल्या किंवा दुसर्या वेतांची गुरे निवडावी आणि वेतांच्या एक महिन्यानंतरची असावी.
* शक्यतो आक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात जनावरे खरेदी करावी.
* दुधाचे सर्वाधिक उत्पादन वेताच्या 90 दिवसांनंतर मिळते.
* पूर्ववृत पत्रक किंवा वंशावळ तक्ता जे उच्च व्यवस्थापीत दुग्ध शाळेत जोपासली जातात त्यावरून जनावरांचा इतिहास मिळतो.
* जनावरांचे लागोपाठ दोन वेळा दोहन करावे. त्यामुळे जनावराच्या दूध उत्पादनाचा पुसट अंदाज येतो.
* जनावर शांत आणि कोणालाही दोहन करु देणारे असावे.
उत्पादनक्षम जनावरांच्या जातींची लक्षणे :-
* शांत स्वभावासोबत सुडौल बांधा, शक्तिवान, शरीराची नेटकी बांधणी आणि चांगली आकर्षक चाल असावी.
* जनावराच्या शरीराचा आकार पाचरीसारखा (मागील बाजुस रूंद आणि पु़ढे निमुळता) असावा.
* जनावराचे डोळे चमकदार आणि मान बारीक असावी.
* कास पोटाला व्यवस्थित घट्ट चिकटलेली असावी.
* कासेच्या त्वचेवर शिरांचे चांगले जाळे असावे.
* कासेचे चारही कप्पे पूर्ण विकसीत असावे तसेच सडांची ठेवण नेटकी असावी.
व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात जातींची निवड :-
भारतीय वातावरणात व्यापारक्षम दुग्ध शाळेमध्ये किमान 20 दुधाळ जनावरे (10 गायी व 10 म्हशी) असणे आवश्यक आहे. ही संख्या सहज 100 गुरांपर्यंत जाऊ शकते. 100 जनावरे 50 : 50 किंवा 40 : 60 च्या प्रमाणात असावे. यानंतर तुम्हाला भांडवल आणि बाजार क्षमतेनुसार पुढील व्यवसाय वृद्धिचा विचार करावा लागेल.
आरोग्यभिमुख मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब कमी स्निग्ध पदार्थ असलेले दूध पिण्यासाठी पसंत करतात. जनावरांच्या मिश्र जाती दुग्ध शाळेत असणे अधिक चांगले. संकरित, गायी आणि म्हशीं एकाच आश्रयाखाली वेगळ्या दावणीला असाव्यात.
तुमच्या नजीकच्या बाजारपेठेची पूर्ण माहिती घ्या, जेथे विक्रीचा विचार आहे. तुम्ही वेगवेगळ्या दोन्ही प्रकारच्या जनावरांचे दूध मागणीनुसार विकू शकतात. हॉटेल आणि काही सामान्य ग्राहक (30% पर्यंत) म्हशींचे दूध पसंत करतात. दवाखाने आणि इतर ठिकाणी गायींचे दूध लागते.
दुग्ध शाळेसाठी गायीं/म्हशींची निवड :-
चांगल्या प्रतिच्या गायी बाजारात उपलब्ध आहेत आणि किंमत सुमारे 1200 ते 1500 रुपये प्रति लिटर प्रति दिन दूध उत्पादन असते. (उदा. 10 लिटर दूध प्रति दिन गायीची किंमत 12,000 ते 15, 000 रुपये असेल). उत्तम व्यवस्थापनात 13 ते 14 महिन्याच्या अंतरात गाय हमखास एक वासरू देते. गाई स्वभावाने शांत आणि हाताळण्यासाठी सोयींच्या असतात. अधिक दूध देणार्या संकरित जातींना (होलस्टिन आणि जर्सी संकर) भारतीय हवामान पोषक आहे.
(स्तोत्र – अॅग्रोवर्ल्ड प्रकाशन)