• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचा देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावलौकिक का आहे..?? शून्य टक्के व्याजदराची अपरिहार्यता; तब्बल 1800 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्‍यांना वाटणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक नेमके असे काय काम करते..?? या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास कशी मदत झाली..?? जाणून घ्या…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2021
in हॅपनिंग
1
पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचा देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावलौकिक का आहे..?? शून्य टक्के व्याजदराची अपरिहार्यता; तब्बल 1800 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्‍यांना वाटणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक नेमके असे काय काम करते..?? या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास कशी मदत झाली..?? जाणून घ्या…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे (वंदना कोर्टीकर) –
पेरणीपूर्व व पेरणीपश्चात अनेक कृषक कामांसाठी शेतकर्‍यांना पैशांची तातडीची निकड जाणवत असते. अशावेळी शेतकर्‍याला पुरेसे रोकड पैसे हातात नाही मिळाले तर बाजारातील वैध, अवैध सावकाराच्या सापळ्यात तो स्वतः जाऊन अडकतो. किरकोळ रकमेसाठी सावकार अशा अडलेल्या, नडलेल्या शेतकर्‍यांची अक्षरशः आयुष्ये उद्ध्वस्त करतो. कित्येक शेतकरी आत्महत्या करतात आणि या गोष्टी फक्त विदर्भ, मराठवाड्यातच घडतात असे नाही तर पश्चिम महाराष्ट्रासारख्या समृद्ध पट्ट्यातही घडतात. वेळेला पैसे मिळणं हा खरे तर प्रत्येक शेतकर्‍याचा, प्रत्येक व्यावसायिकाचा अधिकार. समाजव्यवस्थेने, राज्यकर्त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल सुरू आहे..

शेतीसाठी लागणार्‍या गुंतवणुकीसाठी शेतकर्‍याला या काळात पैसे मिळणे गरजेचेच आहे. शेतकरी समस्यांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केल्यास, बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे, भाकरी का करपते, पाने का सडतात, घोडा का अडतो, या सर्व प्रश्नांचे उत्तर जसे, न फिरवल्याने असे एकच आहे, तसे शेतकर्‍यांच्या बहुतांश समस्यांवरचा उतारा हा वेळेला पैशांची उपलब्धता या एका उत्तरातच सामावलेला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शेतकर्‍यांना 3 लाख रु.चे कर्ज शून्य टक्के व्याज दरात देणारी योजना. ही योजना आधीपासून होती, मात्र तिची अंमलबजावणी मात्र अत्यंत कमी प्रमाणात होत होती. राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका या योजनेची अंमलबजावणी करण्यास अनाकलनीय कारणामुळे नाराज होत्या. अशावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) हे आव्हान स्वीकारण्याचे ठरविले व आज आपल्या उत्तुंग कामगिरीमुळे बँकेने ही योजना तर शेतकर्‍यांमध्ये रुजविलीच तसेच शेतकर्‍यांना त्यांचा आत्मसन्मान परत मिळवून दिला. सुमारे 1800 कोटी रुपयांचे वाटप या योजनेंतर्गत पीडीसीसी बँकेने केले आहे. पीडीसीसीच्या या यशाची तातडीने दखल घेऊन नाबार्डने आता राज्य सरकारला ही योजना राज्यभरात यशस्वीपणे राबविण्यासाठी पीडीसीसी बँकेचे अनुकरण करण्यास निर्देश दिले आहेत. एवढेच नव्हे तर राज्य सरकारनेही या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे आदेश सर्व मध्यवर्ती सहकारी बँकांना दिले आहेत.

समुपदेशनानंतर शेतकर्‍यानी कर्ज बुडविले नाही…
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या व्याजदरात वसुलीशी निगडित प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला होता. शेतकर्‍यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने पीककर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी, यासाठी कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याची ही योजना शेतकर्‍यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे. सरकारने वेळोवेळी या योजनेतील कर्जमर्यादा व व्याजदरातील सवलत यांमध्ये सुधारणा केली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) या यशाबाबत बोलताना बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले की, आम्ही एखादे कर्ज बुडण्याच्या दिशेने वाटचाल का करतो, याचा अभ्यास केला. या कर्ज प्रक्रियेतील खाचखळगे स्वतः शोधले व ते नाहीसे करण्याचे काम केले. शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज न फेडण्याचे दुष्परिणाम सातत्याने सांगितले. कर्ज बुडित झाल्यानंतर आम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर कर्ज घेतानाच व कर्जाच्या विविध टप्प्यांवर आम्ही शेतकर्‍याला या गोष्टी अतिशय प्रभावीपणे सांगितल्या व आमच्या या चांगल्या समुपदेशनानंतर शेतकरी कर्ज बुडवण्यास धजावलाच नाही.

110 टक्के कार्यक्षमतेने पीक कर्ज वाटप..; देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावलौकिक..
शेतकरी कर्जदारांचे आभार मानताना, थोरात म्हणाले की, आज हजारो, लाखो शेतकर्‍यांना आम्ही हे कर्ज अगदी एका दिवसात, विनासायास देतो व अभिमानाची गोष्ट अशी की या शेतकरीराजाने आम्हाला कर्जफेडीत कधी त्रास दिलेला नाही. सुमारे 37 वर्षांपूर्वी मी पीडीसीसी बँकेचे नेतृत्व स्वीकारले व आज ही बँक देशात सर्वोत्कृष्ट बँक म्हणून केंद्र सरकारने नावाजलेली आहे. जसे हे माझे व माझ्या सर्व बँक कर्मचार्‍यांचे श्रेय आहे, तसेच आपले कर्जखाते व बँकेने ठेवलेला विश्वास बुडित होऊ न देणारे माझे शेतकरी कर्जदारही या यशाला तेवढेच जबाबदार आहेत, हे निःसंशय. आम्ही सर्वसाधारणपणे दरवर्षी 1600 कोटींचे कर्जवाटप करतो मात्र या यशानंतर नाबार्डने आम्हाला 200 कोटी रुपये वाढवून दिले. आम्ही यावर्षी सुमारे 1800 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्‍यांना वाटले आहे. राष्ट्रीयीकृत बँका सुमारे 5 ते 10 टक्क्यांपर्यंत पीक कर्जाचे वाटप करतात मात्र पीडीसीसी बँकेने 110 टक्के कार्यक्षमतेने पीक कर्ज वाटप करून देशभरात एक विक्रम केला आहे. बँकेला आतापर्यंत चांगला घसघशीत नफा मिळालेला आहे व दरवर्षी हा नफा आम्ही मिळवत आहोत. तेव्हा मिळालेल्या या नफ्यात शेतकरी राजाला का सामावून घेऊ नये, या विचारातून आम्ही ही योजना लक्षणीय पद्धतीने राबविण्याचे ठरवले व आज या योजनेचा एक मानदंड म्हणून केंद्र सरकारने आमची निवड केल्याचे समाधान वाटत असल्याचे श्री. थोरात यांनी नमूद केले.

पक्षीय भेद न करता एक-दोन दिवसांतच कर्जखात्यात कर्जरक्कम उपलब्ध..
श्री. थोरात पुढे म्हणाले की, या योजनेचे लाभार्थी, कर्जदार निवडताना आम्ही सरसकट कर्जवाटप करतो. हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, धर्म-जाती असो कोणताही निकष न लावता आम्ही सरसकट कर्जवाटप करतो. ज्याला क्षेत्र आहे, ज्याला पीक आहे, अशा कोणत्याही शेतकर्‍याला आम्ही युद्धपातळीवर कर्जवाटप करतो. अवघ्या एक-दोन दिवसांत आम्ही शेतकर्‍याला त्याच्या कर्जखात्यात कर्जरक्कम उपलब्ध करून देतो. थकबाकीची, कर्ज बुडित होण्याची भीती वाटत नाही का, या प्रश्नावर थोरात म्हणाले की शून्य टक्के दराने दिलेला पैसा कधीही बुडित होत नाही. कारण तो शेवटच्या दिवसाच्या पुढे गेला तर त्याला 12, 12.50 टक्के व्याजदर सुरू होतो. म्हणून शेतकरी चक्क दोन दिवस आधी पैसे भरून मोकळा होतो. शिवाय आमच्याकडे सुमारे 11000 कोटींच्या ठेवी आहेत व सुमारे 8 हजार कोटींचा कर्ज व्यवहार आहे. त्यामुळे पीडीसीसी बँक अतिशय सक्षम अशा परिस्थितीत आहे. आम्हाला घाबरण्याचे काही कारणच नाही.

यामुळे व्याजदर शून्य टक्के
या कर्जाचा व्याजदर शून्य टक्के कसा होतो, हे विशद करताना थोरात म्हणाले की केंद्र शासन रू. 3.00 लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित सरसकट 3% व्याज दरात सवलत देते मात्र राज्य शासन रू.1.00 लाख कर्ज मर्यादेपर्यंत 3 % व्याज सवलत व रू.1.00 लाख ते 3.00 लाख या कर्ज मर्यादेपर्यंत 1% टक्का व्याज दरात सवलत देते, यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना रु.1.00 लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास एकूण व्याजदरात 6% सवलत मिळून अंतिमतः त्यांना सदर कज 0% (शून्य टक्के) व्याजदराने उपलब्ध होते. मात्र शेतकर्‍यांना रु.1.00 ते 3.00 लाख या कर्ज मर्यादेमध्ये 2% व्याज भरावे लागते. महागाईमुळे कृषी निविष्ठांच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकर्‍यांना रू.1.00 लाखापेक्षा जास्त कर्ज घेणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रु. 3.00 लाख मर्यादेपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज हे सरसकट 0% (शून्य टक्के) व्याजदराने मिळावे ही शेतकर्‍यांची अपेक्षा विचारात घेऊन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मार्च 2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांना रुपये 3.00 लाख पर्यंतचे पीक कर्ज हे 0% (शून्य टक्के) व्याजदराने देण्यात यावे अशी घोषणा केली होती. या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्याची बाब विचाराधीन होती, आता या संदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत.
शासन निर्णय राज्यातील शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये अंमलात आणण्यात आलेली आहे. सदर योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांना फायदा होण्याच्या अनुषंगाने अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड विहित मुदतीमध्ये करणार्‍या शेतकर्‍यांना सन 2021-2022 या वर्षापासून पुढील प्रमाणे व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना..
या योजनेमध्ये सन 2021-2022 या वर्षापासून पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड मुदतीमध्ये करणार्‍या शेतकर्‍यांना पुढीलप्रमाणे व्याजदरात सवलत देण्यात यावी.
1) सध्या शेतकर्‍यांना रु.1.00 लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम विहित मुदतीत परतफेड केल्यास त्यांना 3% व्याज दरात सवलत देण्यात येते, ती कायम ठेवावी. 2) सध्या रु.1.00 लाख ते रु 3.00 लाख या कर्ज मर्यादेमध्ये शेतकर्‍यांनी अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीस केल्यास 1% व्याज दरात सवलत देण्यात येते, यामध्ये आता अधिक 2% व्याज दरात सवलत वाढवून देण्यात येत आहे, जेणेकरून या कर्ज मर्यादेत व्याजदरात एकूण 3 % व्याज सवलतीचा लाभ शेतकर्‍यांना मिळेल.
3) उपरोक्त व्याज दरात सवलत सुधारणेमुळे शेतकर्‍यांना रु. 3.00 लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट 3 % व्याज सवलतीचा लाभ देण्यात यावा, जेणे करून रू. 3.00 लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेवून त्याची मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्र शासनाचे 3% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकर्‍यांना शून्य टक्के (0%) व्याज दराने उपलब्ध होईल. 4) या योजनेच्या इतर अटी व शर्ती यापूर्वी ठरवून दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कायम राहतील. अशाप्रकारे उपरोक्त योजनेचे अधिक स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने रु. 3.00 लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतकर्‍यांना व्याज दरात 3% सवलत देण्यात यावी.
आजच्या शेतकर्‍यांची आर्थिक परवड पाहताना, त्यांच्या आत्महत्यांचे विश्लेषण करत असताना रिझर्व बँकेने, सहकार क्षेत्राने बँकेची जी उतरंड निर्माण केली आहे, ती खरेच उपयोगाची आहे का, असा प्रश्न तुमच्या-आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना, निम्नस्तरीय शेतकर्‍यांना पडू लागला असतानाच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शून्य टक्के व्याजदराची ही योजना ज्या शक्तीने, नेटाने लावून धरली, यशस्वी केली, त्यामुळे इतर राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचे डोळे खाड्कन उघडले आहेत व शेतकर्‍याला अर्थपुरवठा (वेळेत) करण्याबाबत आतातरी ही मंडळी तातडीने कारवाई करतील, हीच अपेक्षा इतर जिल्ह्यातील शेतकरीही करीत आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 110 टक्के200 कोटीअजित पवारडॉ. पंजाबराव देशमुखपीडीसीसीपुणे जिल्हा मध्यवर्ती सहबँकेचे अध्यक्ष रमेश थोरातव्याजदरशून्य टक्के
Previous Post

राज्यात 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’

Next Post

ई – पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात* *महसूल व कृषी विभागाने टीम वर्क म्हणून काम करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन* *राज्यातील तहसीलदार,तालुका कृषि अधिकारी,तलाठी ,कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक संघटनांसोबत बैठक

Next Post
ई – पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात* *महसूल व कृषी विभागाने टीम वर्क म्हणून काम करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन* *राज्यातील तहसीलदार,तालुका कृषि अधिकारी,तलाठी ,कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक संघटनांसोबत बैठक

ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात* *महसूल व कृषी विभागाने टीम वर्क म्हणून काम करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन* *राज्यातील तहसीलदार,तालुका कृषि अधिकारी,तलाठी ,कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक संघटनांसोबत बैठक

Comments 1

  1. , kranti pawar says:
    4 years ago

    खुप छान

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish