मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो. त्यामुळे राज्यात मका लागवड वाढत आहे. बऱ्याच वेळा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत या पिकाचे खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होते त्यासाठी वेळीच याचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
किडीचे नाव- खोडकिड
शास्त्रीय नाव : कायलो पार्टेलस
अशी ओळख खोडकिड
i. अळीच्या पाठीवर काळ्या ठिपक्यांचे पट्टे.
ii. डोक्यावर गडद तपकिरी रंग.
iii. पानावर समान रेषेत छिद्रे.
iv. पोंगा पूर्ण वाळतो.
किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : रोपावस्था
भौतिक नियंत्रण :
i. वाळलेल्या सुरळ्या अळ्या सहित उपटून जाळून टाकाव्यात.
ii. शेत स्वच्छ ठेवावे.
iii. प्रकाश सापळा वापरावा
रासायनिक नियंत्रण :
i. कार्बारील ८५% डब्ल्यूपी १७६४ ग्रॅम/हेक्टरी ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारावे.
ii. किंवा फोरेट १० जी. १० ते १२ किग्रॅ/हेक्टरी प्रमाणे जमिनीत मिसळावे.
iii. किंवा डायामिथोयेट ३० ईसी. १.२ मिली. १ पाण्यातून फवारावे.
जैविक कीड नियंत्रण :
i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे
खोड कीडबाबत जागरूक असावे.
जळगाव जिल्ह्यात जरी या किडीचा फारसा प्रादुर्भाव नसला तरी शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. पिक रोपावस्थेत असतांना या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने लक्षणे दिसताच वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. प्रदुर्भावाच्या सुरुवातीच्या काळातच रासायनिक औषधी न वापरता निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे. जर जास्त प्रादुर्भाव असेल तरच रासायनिक औषधी वापरावी.
श्री वैभव शिंदे
जिल्हा कृषी विकास अधिकारी
जिल्हा परिषद जळगाव
👍🙏🙏🙏