शेती अभ्यास, अनुभव आणि हिम्मतीचे क्षेत्र आहे. यासाठी योग्य अनुभव आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. शेतीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. कृषिप्रधान भारत देशासाठी हे चांगले संकेत आहेत. शेतीतले महत्त्वाचे निर्णय महिला घेत आहेत ही देखील बाब गौरवास्पद आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन शेतीत आपले योगदान देत आहेत. यामुळे कुटुंब व्यवस्था टिकून राहत असून आर्थिक आधार देखील प्राप्त होत आहे. आज अनेक सुशिक्षित युवती, महिला देखील शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय असल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. यामुळे प्रक्रिया उद्योगात अनेक महिला शेतकरी पुढे येत आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला, तेव्हा ग्रामीण भागासोबतच शहरात देखील शेती आधारित उद्योगांनी अनेकांना सावरले. यात महिलांचा पुढाकार मोलाचा ठरला. अशाच काही महिला शेतकरी, कृषी प्रक्रिया उद्योजिकांच्या ‘अॅग्रोवर्ल्ड’ने यावेळीच्या महिला विशेषाकांतून यशोगाथा प्रकाशित केल्या आहेत…
अधिक माहिती / अंकासाठी संपर्क :- 9130091621 / 22 / 23 / 24 /25
Very nice