भारतीय सेना आज (15 जानेवारी ) रोजी आपला 73 वा स्थापना दिन साजरा करीत आहे. भारतीय सैन्य दिन 15 जानेवारी रोजी देशभरात साजरा केला जातो. १९४९ मध्ये त्याच दिवशी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सैन्याची कमान घेतली. करियप्पा भारतीय लष्कराचे पहिले सेनापती-प्रमुख बनले. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर सैन्याचे पहिले दोन प्रमुख ब्रिटिश नागरिक होते. प्रत्येक वर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा यांनी या दिवशी आपला पदभार स्विकारल्याने हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो.
२८ जानेवारी १८९९ रोजी कर्नाटकच्या कर्ग येथे जन्मलेले करियाप्पा फील्ड मार्शलच्या पदावर पोहोचणारे एकमेव भारतीय आहेत. फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांना फील्ड मार्शलचा दर्जा मिळाला होता. सन १९४७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धामध्ये करिअप्पाने अदम्य धैर्य आणि भक्कम नेतृत्व दाखवले. पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांना वेस्टर्न कमांडचा जीओसी-इन-सी बनविण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वात भारताने जोजिला, द्रास आणि कारगिल सेक्टरमध्ये पाक सैन्याला पराभूत केले.
निवृत्त झाल्यानंतर 33 वर्षांनी करिअप्पा यांना ‘फिल्ड मार्शल’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. करिअप्पा यांनी 20 वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत नोकरी करायला सुरुवात केली. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करिअप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला ‘सेना दिवस’ साजरा केला जातो.