• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 27 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 12, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पन्हाळगडच्या वाड्यात आदिलशाहीचे सरदार सय्यदखान हुक्क्याचा आनंद घेत बसले होते. सय्यदखान बड्या बेगमचे दूरचे नातेवाईक होते. मानाजी नाईक जरी गडाचे किल्लेदार होते, तरी सत्ता सय्यदखानाचीच होती.
बैठकीवर बसलेला सय्यदखान आपल्या मिजाशीत हुक्क्याचा आस्वाद घेत होता. सदरेखाली राणबा, जोतीबा, हुसेन उभे होते.
सदरेवर मौलवी करामतखाँ आपल्या पांढऱ्याशुभ्र दाढीवरून हात फिरवीत होते.
हुक्क्याची नळी बाजूला सारून सय्यदखानानं नाकातून धूर सोडला. बेफिकिरीनं तो म्हणाला,
‘ठीक है! ठीक है! अफजलखानसाहेब गारद झाले, म्हणून काय झालं? त्या पापाचा नतीजा भोगावाच लागेल. आदिलशाही कितनी बडी! और ये सिवाजी एक मच्छर!’


‘हां, हुजूर!’ करामतखाँनं दुजोरा दिला.
‘अभी हम आराम करना चाहते हैं! आपको इजाजत.’
साऱ्यांनी सय्यदखानाला मुजरे केले आणि ते वाड्याबाहेर गेले.
अधीर झालेल्या सय्यदनं हाक मारली,
‘रसूल ss’
रसूल आत आला. त्याच्या मुजऱ्याचा स्वीकार करून सय्यदनं विचारलं,
‘बंदोबस्त झाला?’
‘हुजूर ss….हुजूरss’
•हुजूर….हुजूर क्या?’ सय्यदनं विचारलं.
‘बात जरा नाजूक आहे.’ रसूल म्हणाला, ‘ती पोर यायला तयार नाही.’
‘ये हिम्मत! आजवर असं कधी झालं नाही. आम्ही बोलावलं आणि कोणी नाही म्हटलं, असं घडलं नाही.’
‘खाविंद! गुस्ताखी माफ हो! पण ती गडकऱ्याची मुलगी आहे.’
‘तो क्या हुआ? रसूल, एक लक्षात ठेव. जे फूल आमच्या नजरेत भरतं, ते हुंगल्याखेरीज आम्ही राहत नाही.’
‘लेकिन, हुजूरss’ रसूल काही बोलण्याचा प्रयत्न करीत असतानाच वर्दी न देता खुद्द मानाजी नाईक प्रवेश करते झाले. सय्यदखानाला मुजरा करून ते म्हणाले,
‘खानसाहेब! शिवाजी आला!’
‘शिवाजी!’ सय्यदखानाच्या ओठांतली हुक्क्याची नळी केव्हा पडली, हेही त्याच्या ध्यानी आलं नाही. धडपडत उठत त्यानं विचारलं, ‘कुठं आहे तो शिवाजी?’
‘गडाखाली!’ मानाजी नाईक सांगत होते. ‘गडाच्या सर्व वाटा त्यांनी रोखल्या आहेत.’
‘हरामखोरs’ सय्यदखानाचा संताप उफाळला. तरातरा पावलं टाकीत तो मानाजी नाईकासमोर गेला आणि काय होतं, हे लक्षात यायच्या आत त्यानं मानाजीच्या गालावर थप्पड लगावली.
सय्यद गर्जला,
‘इतना, नजीक गनीम आया! झोपा काढता काय!’
सय्यदखान आपल्या वाड्याबाहेर पडला. चार दरवाजा तटावरून त्यानं पहिलं. तसाच तो तीन दरवाज्याकडं गेला. तिथून त्याला काय दिसणार, याची शंका मागून धावणाऱ्या माणसांना येत होती. तीन दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांवर तो ओरडला,
‘हरामजादे! तो शिवा आला आणि दरवाजे उघडे ठेवता! बंद करो दरवाजे!’
नशेनं चढलेले आणि हुक्क्यानं पेटलेले खानाचे बटबटीत डोळे अधिक भेसूर वाटत होते. आपली आरक्त नजर मानाजी नाईकांवर स्थिर करीत सय्यदखानानं दुसरा हुकूम सोडला,
‘हमको सय्यदखान कहते हैं! ओ शिवाजीकी ऐसी तैसी! हम डरते नहीं! तोप सजाओ! ऐसा भडिमार करेंगे, जिंदगीभर याद रखेंगे!’
‘जी!’ मानाजी नाईक म्हणाले.

सेनापतीच्या आविर्भावात सय्यद वाड्याकडं परतत होता. वाड्यासमोर त्यानं आपली शिबंदी गोळा केली. अवघी शंभर-सव्वाशे माणसं वाड्याच्या बाहेरच्या चौकात एका कोपऱ्यात उभी होती.
संध्याकाळ होत आली होती. त्या वेळी एक जासूद धावत आला. त्यानं सांगितलं,
‘हुजूर!’
‘क्या है?’‘शिवाजीचा हेजीब पांढरं निशाण घेऊन गड चढत येतो आहे.’
सय्यद आनंदानं बेहोश होऊन म्हणाला,
‘मानाजी, देखा? ये है हमारी हिंमत! तुमचा तो शिवाजी डरके मारे अपना हेजीब भेज रहा है! आने दो उनको!’
मानाजी नाईक उसनं हास्य तोंडावर घेऊन उभे होते. सय्यदच्या आज्ञेनं आलेल्या हेजिबाचं स्वागत करायला मानाजी चार दरवाज्याशी गेले.
चार दरवाज्याशी तटावर सारे गोळा झाले होते.
गडाच्या दरवाज्याशी आबाजी प्रभू आपल्या चार शिलेदारांसह उभे होते, मानाजी तटावरून खाली उतरले. दिंडी दरवाजा उघडला गेला. मानाजी बाहेर गेले.
आबाजी प्रभू दरवाज्याशी उभे होते. मानाजींना पाहताच आबाजींनी विचारलं,
‘आपण कोण?’
‘मी! नाही…. आम्ही मानाजी नाईक! गडाचे किल्लेदार.’
‘मी आबाजी प्रभू! बाजी देशपांडे यांच्या वतीनं हेजीब म्हणून आलो आहे.’
‘आपण आत यावं.’ मानाजी नाईक म्हणाले.
दिंडी दरवाज्यानं आबाजी प्रभूंनी आत प्रवेश केला. दिंडी दरवाजा बंद झाला. आबाजींसह सारे वाड्यात आले. दाराशी आबाजी थबकले. त्यांनी विचारलं,
‘मानाजी, आपण गडाचे किल्लेदार ना? मग इथं कुठं घेऊन आला?’
‘आबाजी! मी किल्लेदार हाय खरा. पन सत्ता बादशाहाची. आमचे सय्यदखान सांगतील, तसं वागायचं.’
अंबरखान्यानजीक असलेल्या वाड्याजवळ सय्यदखान राजांच्या हेजिबाची वाट पाहत होता.
मानाजी नाईकाच्या समवेत आबाजी प्रभू वाड्याच्या सदरेवर प्रवेश करते झाले.
सय्यदखानानं आपली बैठक सजवली होती.
मानाजी नाईकांनी ओळख करून देताच, सय्यदखान हुक्क्याचा आस्वाद घेत गुरगुरला,
‘हेजीब हो, इस वास्ते बाइज्जत आये हो! शिवाजीनं आमच्या गडाला वेढा घातला आहे. आम्ही आमची बेइज्जत समझते है!’
आबाजी प्रभूच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. आपल्या नरमाईच्या स्वारात ते म्हणाले,
‘खानसाहेब, आम्ही गडाच्या वाटा रोखल्या आहेत. पाच हजारांची फौज खाली आहे. आमच्या शेकडो तोफा खाली आल्या आहेत. अंदाज आणि निर्णय तुमच्या हाती आहे.’
सय्यदखानाच्या हाताची हुक्क्याची नळी सुटून खाली पडली. तो गरजला,
‘आमच्यावर दबाव आणता?’
‘दबाव नाही, खानसाहेब!’
‘तो क्या! आमच्या गडावर तोफा नाहीत? आम्ही त्या कारीगर करू.’
आबाजी हसला. तो म्हणाला,
‘राजांचे सरदार बाजींनी आपल्याला एक निरोप पाठविला आहे.’
‘क्या?’
‘तुमच्या गडावरून एक जरी तोफ उडाली, तर त्यानंतरचा नतीजा तुम्हांला भोगावा लागेल.’
‘मतलब?’
‘स्पष्ट सांगावं लागतं. तशी आगळीक घडली, तर या गडावर एकही माणूस जिवंत राहणार नाही. बायका-मुलांसकट.’ आबाजींनी सांगितलं.
सय्यदखानाचं शरीर त्या वार्तेनं थरथरत होतं…. अपमान आणि संताप त्याच्या अंगात उफाळत होता. काय करावं, हे त्याला सुचत नव्हतं.
मनातून हताश झालेला सय्यदखान शेवटी म्हणाला,
‘ठीक है! तहाच्या वाटाघाटीसाठी आम्ही तयार आहोत.’
‘खानसाहेब!’ आबाजीनं सांगितलं, ‘तहाच्या वाटाघाटीसाठी आपण जरूर गडाखाली बाजीप्रभू देशपांडेंच्या भेटीला या. तिथं वाटाघाटी पूर्ण होतील.’
सय्यदखानाच्या भेटीनंतर आबाजी प्रभू मशालीच्या उजेडात गडाखाली उतरले.

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आबाजीपन्हाळगडबाजीप्रभू देशपांडेमानाजींमानाजी नाईकशिवाजीसय्यदखान
Previous Post

पावनखिंड भाग – 26 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

महाराष्ट्रात ‘बर्ड-फ्लू’ चा शिरकाव

Next Post
महाराष्ट्रात ‘बर्ड-फ्लू’ चा शिरकाव

महाराष्ट्रात ‘बर्ड-फ्लू’ चा शिरकाव

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.