प्रतिनिधी;पुणे
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी काराव्या लागणाऱ्या अर्ज प्रक्रियेसाठी शासनाचे महाडीबीटी पोर्टलवर वापरा जाते. कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वतंत्र देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करायचा आहे. या साठी नोंदणी करण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे. याबाबत कृषी आयुक्तालयाच्या वतीने परिपत्रक काढून आवाहन केले आहे.
अशी आहे प्रक्रिया
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल/संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र इ. माध्यमातून अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय कोणत्याही अनुदानाचे वितरण केले जाणार नाही.
महाडीबीटी पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरीत करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी विषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी ३१/१२/२०२० अखेर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. यासाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोव नोंदणी करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Best
Thibhak shichan