राज्यात १४ दिवसांचा पावसाचा खंड ! ६ सप्टेंबरनतंर पुन्हा पाऊस
प्रतिनिधी,पुणे
राज्यात मागील पंधरवाड्यापासून श्रावणझडीमुळे शेतकऱ्यांच्या कडधान्य पिकांना कोंब येऊन खूप नुकसान झाले आहे. परंतु उशिरा पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना या हवामान अंदाजामुळे दिलासा मिळाला आहे. कारण त्यांचा शेतमाल आता नेमका काढणीस आला आहे. तब्बल १५ दिवसांनी राज्यात १४ दिवसाचा खंड पडणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना कडधान्य पिकांची काढणी करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. मात्र अपवाद वगळता तूरळक ठिकाणी २०-२५ मिनिटे पाऊस पडू शकतो.
खाजगी हवामान वर्तविणाऱ्या वृत्तसंस्थेने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात चालू असलेलल्या पावसाला आजपासून दि २४ पासून ६ सप्टेंबरपर्यंत ब्रेक लागेल. राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानतंर स्थानिक वातावरण तयार होऊन तूरळक ठिकाणी २०-२५ मिनिटे पाऊस पडू शकतो. परंतु, सर्वदूर पाऊस सप्टेंबर नंतर होईल. त्यामुळे या १४ दिवसात शेतकऱ्यांनी मुगतोडणी, फवारणी, खत देणे ही कामे उरकून घ्यावी.