जळगावात “शेतकरी ते ग्राहक” उपक्रमांतर्गत तांदूळ महोत्सवाचा सोमवारी (ता. 18 मे) समारोप…
कृषी विभाग जळगाव व अॅग्रोवर्ल्ड यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व अॅग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.१५) पासून तीन दिवसीय तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इगतपुरी- घोटी येथील अस्सल इंद्रायणी तांदूळ, सांगली येथील सेलम हळद पावडर, तासगावचा बेदाणा व उन्हाळी बाजरी “शेतकरी ते ग्राहक” उपक्रमांतर्गत “ना नफा ना तोटा” तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या महोत्सवाचा रविवारी (ता. 17 मे) समारोप होत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उन्हाळ्यात अर्थात पावसाळ्यापूर्वी अनेकजण वर्षभरासाठीच्या धान्याची तजवीज करून ठेवतात. ही बाब लक्षात घेता “शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत आज शुक्रवार (ता 15) पासून रविवारी 17 मे पर्यंत या तीन दिवसांत रोज सायंकाळी 4 ते 6.30 या कालावधीत इंद्रायणी तांदूळ, उन्हाळी बाजरी, सेलम हळद व बेदाणा विक्रीचे नियोजन केले आहे.
इंद्रायणी तांदूळ – चवीला रुचकर, पौष्टीक व पचायला हलका असतो. आबालवृद्धही तो सहज चाऊ व पचऊ शकतात. यात लोह, जस्त तसेच सी जीवनसत्व अधिक असते. यात अँटीऑक्सिडंटही आढळते तसेच नायट्रोजन पातळी ही 30 % पेक्षाही कमी असल्याने यापासून कर्करोगाला (कॅन्सर) प्रतिकारक असते.
सांगली येथील सेलम हळद यात कुरकुमीनचे 5/5.5% प्रमाण असते.. परिणामी कर्करोगाला दूर ठेवण्यास मदत होते. तसेच अँटीबायोटीकचे प्रमाणही जास्त असते.
सुरक्षित वातावरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून उपस्थित ग्राहकांसाठी सोशल डिस्टनसिंग, सॅनटाईजची व्यवस्था केलेली आहे.
स्थळ व वेळ
महोत्सवाचे आयोजन सोम (ता. 18) पर्यंत दुपारी 4 ते सायंकाळी 6.30च्या दरम्यान कृषी विभाग कार्यालयाच्या पटांगणात… (आकाशवाणी केंद्राच्या शेजारी) जळगाव.
अधिक माहितीसाठी संपर्क – 9130645182