जळगांव येथे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचा वर्धापन दिन साजरा
जळगांव( प्रतिनिधी ) :-
MAIDC विभागीय कार्यालय, जळगांव यांच्यामार्फत दि.२०.१२.२०१९ रोजी MAIDC चा वर्धापनदिन तथा वितरक सभा जळगांव येथे संपन्न झाली. MAIDC चे महाव्यवस्थापक महेंद्र बोरसे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, कृषी विज्ञान व संशोधन केंद्राचे डॉ. हेमंत बाहेती, MAIDC जळगांवचे विभागीय व्यवस्थापक डॉ.प्रकाशसिंग राठोड, नाशिक विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील आदीची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
गजानन महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महामंडळाविषयी सविस्तर माहिती डॉ.प्रकाशसिंग राठोड यांनी दिली. यावेळी बोलतांना त्यांनी ICAR द्वारा संशोधीत जीवाणू संवर्धक खतांच्या बायोकॅप्सूलचा वापर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी वितरकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. महामंडळामार्फत २०२०-२१ पासून १३ नवीन कीटकनाशक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्याची यावेळी माहिती संगणकावर सादर करण्यात आली.
यावेळी बोलतांना महाव्यवस्थापक मा.श्री.महेंद्र बोरसे यांनी मिश्र खतामध्ये १८:१८:१० हे अव्वल असल्याचे सांगितले. मागील ५५ वर्षापासून महामंडळाने शेतकऱ्यांना दर्जेदार रासायनिक खते व कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अशा गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठाची विक्री करून वितरक शेतकऱ्यांची व त्यासोबतच देशाची सेवा करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
a
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :-
* कार्यक्रमास हजर वितरक व सहसंस्थाची भरगच्च उपस्थिती
* कार्यक्रमात व्हिडीओ क्लिपद्वारे महामंडळाची माहिती सादर करण्यात आली.
* जिल्ह्यात महामंडळाच्या कृषी निविष्ठाची विक्रमी विक्री करणाऱ्या पारोळा येथील संजय कृषी केंद्र यांना प्रथम व पाळधी येथील उदय कृषी केंद्र यांना द्वितीय क्रमांकाचे परितोषिकाने सन्मानित करण्यात आले
* कार्यक्रमास सर्व प्रमुख खत कंपनीचे प्रतिनिधी व सन्माननीय अधिकारी उपस्थित होते.
* कृषी विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थिती होते.