• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सामुहीक दूध शाळेतून गावांची समृद्धीकडे वाटचाल

Team Agroworld by Team Agroworld
September 18, 2019
in इतर
0
सामुहीक  दूध शाळेतून गावांची समृद्धीकडे वाटचाल
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम, धानोरा, दापोरा, कुर्‍हाडदे गावात प्रयोग



पूर्वी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता, आर्थिक अडचणी वाढल्या होत्या, काम करत होते पण हाती काही लागत नव्हते, अशा परिस्थितीत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून समृद्धीचा मार्ग त्यांना सापडला. सामुहीक दूध शाळेच्या प्रयोगाला सुरवात झाली आणि कर्ज कमी होऊन गावाची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे. महात्मा गांधीजींनी खेडी सक्षम करण्याचा मंत्र दिला होता, तोच आधार मानून गांधी रिसर्च फाऊंडेशन काम करत आहे.

गावांत घडवून आणलेल्या बदलांविषयी
महात्मा गांधीजींनी जगाला अहिंसेचे तत्त्वज्ञान दिले. शांतीचा मंत्र दिला. गावे, खेडी स्वावलंबी झाली पाहिजे यावर त्यांचा भर होता. खेडी समृद्ध झाली तरच देशाचा खर्‍या अर्थाने विकास होईल असे ते मान असत. त्यांनी दिलेली शिकवण आज देशभरात विविध पातळ्यांवर अवलंबलेली दिसते. जैन उद्योग समूहाने उभारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील गावे स्वावलंबी करण्याचा महत्वपूर्ण प्रयोग राबवीला जात आहे. त्या अंतर्गत धानोरा, दापोरा आणि कुर्‍हाडदा या गावांत दोन वर्षापूर्वी सामुहीक दूध संकलनाचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयोगाची आता यशस्वीता हाती येऊ लागली आहे. प्रयोगाची परिणामकारता दिसू लागली आहे. दूध संकलनातून समृद्धीचा मार्ग सापडल्याची भावना या तिन्ही गावातील नागरिक व्यक्त करतात.
वसुंधरा डेअरीची भेट
गावे स्वावलंबी करण्याचे काम एका दिवसात होत नाही. त्यासाठी पुरेसा वेळ जाऊ द्यावा लागतो. धानोरा, दापोरा, कुर्‍हाडदा या गावांचेही तसेच झाले. सुरवातीच्या काळात गावात बैठका घेणे, स्वावलंबनाचे मार्ग कोणते, त्याचे महत्व कसे, अवलंब कसा करायचा, अभ्यास दौरा आदी विषयांच्या बाबत चर्चा करण्यात आली. दूध संकलनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे होता येईल याचा विचार करत असताना वसुंधरा डेअरी गुजरात येथे धानोरा गावातील आठ ते दहा जणांची भेट घडवून आणली. वसुंधरा डेअरीची सर्व माहिती, कामकाज याबाबतची सर्व माहिती तीन दिवस समजून घेतल्यानंतर दूध संकलन प्रयोगाचे महत्व सर्वांना पटले आणि त्यावर अंमलबजावणी करण्याचे ठरले.
धानोरा, दापोरा, कुर्‍हाडदा गावातील बदल
या गावात आधी दूध संकलनासाठी संघटन नव्हते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाला कमी भाव म्हणजे तीस रुपये इतका भाव मिळत असे. मध्यस्थाच्या मदतीने दूध पाठवले जात असे. त्यामुळे जो काही नफा होता तो मध्यस्थाला मिळत होता. उत्पादकाच्या पदरात फारसे काही पडत नव्हते. अशी परिस्थिती असल्याने संघटनाचे महत्व पटवून, उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात आली. त्यासाठी गावातील नागरिकांचे प्रबोधन करणे, त्यांना सोयी उपलब्ध करून देणे आदी व्यवस्था निर्माण कराव्या लागल्या.
सुरवातीच्या काळात धानोरा गावात किसान दूध उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनने आर्थिक स्वरुपात पाठबळ दिले. या निधीतून वजनकाटा, फॅटमशीन, टेबल, कॅन आदी साहित्य खरेदी करण्यात आले. स्वत: दूध काढायचे आणि ते स्वत:च दूध ग्राहकांना नेऊन द्यायचे असा प्रयोग सुरू झाला, त्यामुळे फायदा असा झाला की अनेकांच्या डोक्यावरचे कर्ज फिटले, काहींचे फिटण्याच्या मार्गावर आहे. सुरवातीला या मंडळात केवळ दहा लीटर दूध संकलीत व्हायचे आता ते 120 लीटरवर पोचले आहे. पूर्वी 30 रुपये भावाने दूध मध्यस्थाला द्यावे लागत होते, आता स्वत: विक्री करत असल्याने थेट 50 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता आर्थिक परिस्थीतीत खुप सुधारणा झाल्याची भावना मनोहर धनगर यांनी व्यक्त केली. किसान मंडळात रमेश मराठे मनोहर धनगर, रमेश नाझरकर, सागर धनगर यांच्यासह अन्य सदस्य आहेत. धानोरा येथील गिरणाई सामूहीक दूध संकलन केंद्राचे रोज 70 लीटर दूध पाठवले जाते. पंढरीनाथ सोनवणे हे त्याचे अध्यक्ष आहेत, तर कांतीलाल ब्राह्मणे हे उपाध्यक्ष आहेत. कुर्‍हाडदा या गावात जय श्री दादाजी दूध संकलन मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे अध्यक्ष सुभाष धनगर, तर उपाध्यक्ष विठठ्ल न्याहाळदे हे आहेत. त्या मंडळात 84 सदस्य असून 600 जनावरांच्या माध्यमातून रोज साधारणपणे 700 लीटर दूध संकलन होते. दापोरा येथील जवळपास 300 लीटर दूध विकास फेडरेशनला पाठवले जाते. वरील तिन्ही गावांत दूधाच्या व्यवसायातून समृद्धी नांदू लागली आहे.
शिस्त आणि सातत्य महत्वाचे
कोणतेही कार्य करताना शिस्त आणि सातत्य दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून वेळो वेळी गावांत भेटी देणे, मार्गदर्शन करणे या गोष्टी केल्या जात आहेत. संकलीत झालेल्या दूधाला बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल याबाबत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी मार्गदर्शन करत असतात. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी वेळोवेळी सहकार्य करून ग्राम स्वावलंबानाचे मार्ग दाखवले. तर फाऊंडेशनचे डीन जॉन चेल्लादुराई यांनी ग्रामीण विकासात सहभागाची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली. तसेच राजेंद्र जाधव हा कार्यकर्ता गावांशी कायम संपर्कात राहून समन्वय साधून अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतो.
सामूहिक दूध संकलन केंद्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून या प्रयत्नांना आणखी उभारी देण्यासाठी व उत्पन्नाची वेगवेगळी साधने निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहे, त्यापैकी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व हायड्रोपोनिक चारा निर्मिती प्रकल्प यांना समोर ठेवून नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहे.
गांडूळ खत निर्मिती प्रकल्प
गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड कंपनी यांच्या माध्यमातून मंडळाला मार्गदर्शन मिळत आहे. दूध उत्पादना बरोबरच इतर उत्पादन साधने निर्माण व्हावे यासाठी गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर जवळपास आठ फूट लांबी व तीन फूट रुंदी प्रमाणे 10 बेड तयार करण्याचा संकल्प करण्यात आला व त्यामध्ये सध्यास्थितीत सहा बेड पूर्ण झाले आहे व गांडूळांच्या संरक्षणासाठी सुयोग्य सावली मिळावी यासाठी नेट अच्छादन केले आहे. शेणखत सध्या अल्पदरात विकले जात आहे. याउलट शेणखताचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी करत असून या माध्यमातून उत्पादित झालेले गांडूळ खत सध्या किमान 15 कमाल 30 रुपये प्रति किलो प्रमाणे मार्केट मध्ये विक्री होत आहे व याचा सरळ सरळ फायदा घेणे शक्य आहे.
हायड्रोपोनिक चारा निर्मिती उपक्रम
जनावरांसाठी लागणारा चारा व ढेप यांचे दर दिवसेंदिवस अतिशय वाढत असून अतिरिक्त खर्च यावरती होत आहे व हा खर्च कमी करण्यासाठी व योग्य आहार जनावरांना मिळावा या हेतूने हायड्रोपोनिक चारा निर्मिती प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी करत आहोत यामध्ये जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर दररोज किमान 40 किलो हायड्रोपोनिक चारा निर्मिती होऊ शकेल अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.


सामुहीक दूध शाळेचा प्रयोग
दूध मंडळ स्थापनेच्या यशानंतर सामूहीक दूध संकलन शाळेचा प्रयोग राबविण्याचा विचार ग्रामस्थांना पटवून देण्यात आला. त्यानुसार धानोरा येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावठाण जमीन 7 हजार रुपये दराने 11 महिन्यांसाठी करार तत्त्वावर ताब्यात घेण्यात आली. जमीनीवर असलेली काटेरी झाडे श्रमदानातून तोडण्यात आली. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने जेसीबी आणून जमीनीचा समतोल साधण्यात आला. याच ठिकाणी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या आर्थिक मदतीने 100 बाय 21 फुट आकाराचे शेड उभारण्यात आले. त्यात सात जनावरांची खरेदी करण्यात आली. चार्‍यासाठी दीड एकर शेत करार पद्धतीने घेतले आहे. गावातील अल्पभूधारक दहा कुटुंबातील एक महिला एक पुरुष अशा सदस्यांना त्यात सहभागी करून घेण्यात आले. 25 कुटुंबांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यातील सदस्यांना कामाचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येकाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची असे ठरवण्यात आले आहे. सामूहीक दूध शाळेच्या प्रयोगात सहभागासाठी शेअर्स घेणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. ज्यांना शेअर्स घेणे शक्य नाही त्यांनी आपल्याकडील जनावर किंवा शेतजमीन लावायची असे ठरवण्यात आले आहे. आता या दूध शाळेतील दूध काढले जाऊन ते विक्रीसाठी पाठवले जात आहे. त्यातून मिळणारा नफा दूध शाळेच्या विकासासाठी वापरला जात आहे. दूध शाळेच्या माध्यमातून बदल जाणवू लागल्याने गावातील असंख्य मंडळी आता चौकशी करू लागली आहे, आम्हाला देखील यात सहभागी होता येईल का अशी विचारणा करू लागली आहे. सामूहीक दूध शाळेची दर रविवारी मिटींग होत असते. त्यातून विविध विषयांवर चर्चा केली जाते. त्याची नोंद ठेवली जाते. –
दिनेश दीक्षित (9404955245)
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.

ग्रामस्थ म्हणतात
ग्राम विकासाचा संघटीत उपक्रम
संतोष केशव पाटील
: गांधी रिसर्च फाऊंडेशनने सुरू केलेला हा संघटीत उपक्रम आहे. महात्मा गांधीजींनी खेड्याच्या विकासाचा मंत्र दिला आहे, त्याचे तंतोतंत पालन गांधी रिसर्च फाऊंडेशनकडुन केले जात आहे. भविष्यात सामुहीक दुध संकलनाच्या या उपक्रमाला चांगली बळकटी मिळणार आहे. हे सारे सुरू होत असताना आम्ही अडचणींचा सामना केला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने शेड उभे राहिले आहे, जमिनीचा प्रश्न मिटला आहे. दुध उत्पादन देखील सुरू आहे. इथे काढलेले दुध अवघ्या 20 मिनिटात ग्राहकांपर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे दोन पैसे हाती खेळू लागले आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी आणि चार्‍याचे योग्य नियोजन आतापासून केले आहे. भविष्यात आम्ही दुध प्रक्रिया उद्योगाकडे वळणार आहोत.

श्रमदानाचे मिळते समाधान
भावना सोनवणे : सामुहीक दुध शेतीचा उपक्रम सुरू व्हायच्या आधी आम्ही आमच्या एक एकर शेतात राबत होतो. पण त्यात काही हाती लागत नव्हते. तेव्हा शेतीबरोबर जोड धंदाही करायला हवा ही गोष्ट ध्यानात आली. त्याचवेळी गांधी रिसर्च फाऊंडानच्या सहकार्याने सामुहीक दुध शेतीचा उपक्रम सुरू झाला. आम्ही त्यात सहभागी झालो. सहभागी व्यक्तींनी इथे श्रमदान करायचे असते, आम्ही देखील श्रमदान करतो. त्यात आनंद मिळतो. आम्ही करत असलेल्या कामाची पावती आम्हाला मिळू लागली आहे. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने मागणी वाढु लागली आहे.

उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल
मिनाबाई कांतीलाल ब्राह्मणे :
आमच्याकडे शेतजमीन नाही. आम्ही भूमीहीन आहोत. आता मात्र आमचे देखील काहीतरी हक्काचे आहे. याची जाणीव या सामुहीक दुध शेतीतून लक्षात येऊ लागली आहे. आम्ही या ठिकाणी म्हशींना चारा-पाणी करतो, जे काम मिळेल ते करतो. त्याचे समाधान मिळते. भविष्यात आमच्या उपक्रमांना नागरिक चांगला प्रतिसाद देतील असे वाटते.

श्रमदानाचे महत्व पटले
अंजली संतोष पाटील
: गांधी रिसर्च फाऊंडेशनने खेड्यात सुरू केलेला हा उपक्रम अतिशय चांगला आणि इतरांना प्रेरित करणारा आहे. त्यातून असंख्य कुटुंबियांच्या परिस्थितीत निश्चित स्वरुपात बदल होणार आहेत. आम्ही देखील या ठिकाणी येऊन श्रमदान करतो. श्रमदानाचे महत्व आम्हाला पटलेले आहे. या चांगल्या कामाला सर्वच सहकार्य करतात ही समाधान देणारी बाब आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गांधी रिसर्च फाऊंडेशनवसुंधरा डेअरी गुजरात
Previous Post

करार शेतीतून मिळविले वार्षिक 25 लाखांचे उत्पन्न

Next Post

जॉयफुल फार्मर्स प्रोडयूसर कंपनी-शासन व शेतकरी यांच्या सहकार्यातून तयार झालेली कंपनी

Next Post
जॉयफुल फार्मर्स प्रोडयूसर कंपनी-शासन व शेतकरी यांच्या सहकार्यातून तयार झालेली कंपनी

जॉयफुल फार्मर्स प्रोडयूसर कंपनी-शासन व शेतकरी यांच्या सहकार्यातून तयार झालेली कंपनी

ताज्या बातम्या

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.