• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख…. क्रमशः भाग-४

Team Agroworld by Team Agroworld
July 11, 2019
in तांत्रिक
0
कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख…. क्रमशः भाग-४
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

लाल ढेकण्या जीवनक्रम :- प्रौढ अवस्थेतील लाल ढेकण्या सडपातळ व समोरचे पंख नारंगी, गर्द लाल किंवा पिवळ्या रंगाचे असतात. पिल्ले बहुदा लाल किंवा पिवळ्या रंगाची असतात. पुर्ण वाढ झालेले किटक १२ ते १८ मिमी लांब असतात. मादी पिवळसर रंगाची असून ती १०० ते १३० अंडी झाडाच्या खाली ओलसर जमिनीत घालते. ५ ते ८ दिवसात अंडी उबवतात. ५० ते ९० दिवसात पिल्लाची पुर्ण वाढ होते. वर्षातून ३ ते ४ पिढ्या निपजतात.

प्रादुर्भावाचे स्वरूप :- लाल ढेकण्या सुईसारख्या सोंडेने नुकत्याच फुटलेल्या बोंडातून बियामधील रस (द्रव) शोषतात. शिवाय सोंडेतून नेमाटोस्पोरा गॉसीपी नावाची बुरशी बोंडात सोडतात. त्या बुरशीमुळे कापूस पिवळा पडतो. बोंड सडते.

पाने गुंडाळणारी अळी :-
जीवनक्रम व प्रादुर्भाव :- अळीचे मादी पतंग, कोवळ्या पानाच्या मागील बाजूस चपटी, गुळगुळीत पांढर्‍या पिवळसर हिरावत रंगाची अंडी घालते. अंडी ६ ते ७ दिवसात उबतात. १५ ते २० दिवस अळी पानाच्या कडेने कडा खाऊन उपजिविका करते. पानांची गुंडाळी करून कोषावस्थेत जाते. ६ ते ७ दिवस कोषावस्था टिकते. पुर्ण वाढलेली अळी १ इंच लांब, चकचकीत हिरव्या रंगाची असून डोके गर्द हिरवे असते. जीवनक्रम १ महिन्याचा असून हिवाळ्यात बांधावरील झुडपात ही कीड राहते. दमट ढगाळ हवेमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो.

बोंड अळी :- कापसावर मुख्यत ठिपक्याची बोंडअळी, हिरवी बोंडअळी (घाटेअळी) आणि शेंदरी बोंड अळी (गुलाबी) या तीन प्रकारच्या बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव जाणवतो.

ठिपक्याची व गुलाबी बोंडअळी पक्क बोंडाचे नुकसान करते. जास्त करून गुलाबी बोंड अळी पक्क बोंडाचे नुकसान करते. त्याचबरोबर ठिपक्याची बोंड अळीमुळे बोंडात बुरशी वाढल्याने बोंडे निरोपयोगी होतात. हिरव्या बोंड अळीमुळे कळ्या, पात्या आणि बोंडाचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

यामुळे झाडावरील पुर्ण कापूस वेचता येत नाही कारण निकृष्ट कापूस वेचणीस योग्य नसतो. तसेच वेचणीस उशीर लागून दर्जा ढासळलेला असतो व अशा कापसाचे प्रमाण जास्त असते. बोंड अळीमुळे सामान्य बोंडापेक्षा अशी बोंडे ३ दिवस लवकर उमलतात. त्यामुळे बियाचे, रूईचे वजन कमी होऊन उतार कमी पडतो. शिवाय बोंड अळीने डागाळलेला, कमजोर तंतू असलेला, पोकळ सरकीचा कापूस निघतो.

ठिपक्याची बोंडअळी :- ठिपक्याच्या बोंड अळीचा रंग करडा असून तिच्या अंगावर बरेच काळे व बदामी ठिपके असतात. पतंगाचा विस्तार २५मिमी असून एरीएस इन्सुलाना जातीच्या पतंगाच्या पुढील पायाचा रंग गवती हिरवा असतो. तर एरीएस फॅब्रीया जातीच्या पतंगाच्या मध्यावर पाचरीच्या आकाराचे पांढरे पट्टे असतात. अंडी निळसर हिरवी व गोल मुकूटासारखी असतात. जिवनक्रम मात्र दोन्ही जातींचा सारखाच असतो.

सुर्य मावल्यानंतर कोषातून पतंग निघतात. २ -३ दिवस नर- मादीचा संगम झाल्यानंतर मादी रात्री पात्या, फुले कळ्या बोंड किंवा झाडाच्या शेंड्यावर लव असणार्‍या भागावर १ -१ याप्रमाणे एक मधी २०० ते ३०० जास्तीत जास्त ७०० पर्यंत अंडी घालते. उबदार हवामानात २ ते ४ दिवस आणि थंडीमध्ये ८ ते ९ दिवसात अंडी उबतात. त्यातून बारीक अळी बाहेर पडते ही अळी फांद्या फुलाच्या कळ्या किंवा बोंडामध्ये शिरून आतील पेशीवर आपली उपजीविका करते. उबदार हवामानात अळीची पुर्ण वाढ व्हायला ९ ते २० दिवस तर थंडीमध्ये ५० ते ६० दिवस लागतात. पुर्ण वाढ झालेली अळी १.९ सेमी लांब, तपकिरी रंगाची असते. तिच्या लांबीला समांतर अंगावर पांढर्‍या व फिक्कट पिवळ्या किंवा हिरव्या रेषा असतात. एरीएस इन्सुलाना ह्या जातीच्या अळीचा रंग मळकट, हिरवट पांढरा असतो. अंगावर काळे नारंगी ठिपके असतात. झाडाचे खाली पडलेल्या पात्या, बोंड किंवा जमिनीतील भेगात अळी कोष तयार करते. कोषातून ६ ते २५ दिवसात पतंग बाहेर पडतात ही कीड उन्हाळ्यात भेंडी किंवा अंबाडी अशा पिकावर आपली उपजिविका करते.

नुकसानीचा प्रकार :- ठिपक्याची बोंड अळी कापसाचे शेंडे, फुले व बोंडाचे नुकसान करते. शेंडे सुकतात, खाली वाकतात व मारतात. किडलेली फुले, पाती गळतात. बोंडे लालसर होऊन गळतात. मोठी बोंडे अपरिपक्क अवस्थेत फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत खालावते. अळी नव्या फुटीस जास्त नुकसान करते. बोंडाची गळ होत नाही मात्र बोंडावर विष्टेने बंद झालेली छिद्रे दिसतात. बोंडातील आतील भाग पोखारल्याने बोंडे निकामी होऊन रूइचि प्रत खालावते. या अळीमुळे ७० ते ८०% बोंडगळ व ४० ते ५०% शेंडे मर होते.

हिरवी बोंड अळी :- बोंड अळीच्या पतंगाचे शरीर १६ ते १८ मिमी लांब असून पंखाचा विस्तार ३२ ते ३८ मिमी असतो. पंखाची समोरची जोड पिवळसर, तपकिरी करडी तपकिरी किंवा तांबूस तपकिरी बदामी रंगाची असून पंखावर रेषा असतात. मागील पंखाची जोडी घुरकट, पांढरट असून त्यावर रुंद, गर्द, करड्या किंवा तपकिरी रंगाचे पट्टे असतात. त्यावर फिक्कट दोन ठिपके असतात.

हिरव्या बोंड अळीचे पतंग कोषातून संध्याकाळी ६ नंतर बाहेर येतात. प्रामुख्याने ८ ते १० च्या दरम्यान जास्त पतंग बाहेर पडतात. दिवसा एकही पतंग बाहेर येत नाही. कोषातून नुकतेच निघाल्याने पतंगाचे पंख ओलसर व सुरकुतलेले असतात. ते हळूहळू झाडावर चढून २ ते ४ तास शांत बसून पंखामध्ये हवा भरून पंख पुर्णपणे उमलतात पंख पक्के झाल्यानंतर उडतात.

मादी पतंग कोषातून बाहेर पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी तीचा नराशी संबंध येतो. रात्री २ ते ४ नर पतंग शेतातून उडत असतात, तर मादी पतंग पानावर बसून फेरोमोन नावाचे संजीवक (हार्मोन ) निर्माण करून हवेत सोडतात. या संजीवकाच्या वासामुळे नर पतंग मादीकडे आकर्षित होतात. दोन्हींचा संगम झाल्यानंतर १ ते ४ मादी ३ ते ५ दिवस शेंड्यावर कोवळ्या पानावर एक एक अंडी घालते. अंडी चकचकीत, गोल, घुमटाच्या आकाराचे हिरवट पिवळी असतात. अंड्यातून अळ्या निघण्यासाठी तापमानानुसार २ ते ४ दिवस ते थंडीमध्ये ८ दिवस लागतात. वाढीस लागलेल्या अळ्या, पात्या, कळ्या, फुले व हिरवी बोंड ह्यांना छिद्र पाडून आतील भाग खातात. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी बोंडला छिद्र पाडू शकत नाही. त्यामुळे दोन आळ्या एकत्र आल्यावर, एकमेकींना जखमा करून खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एका बोंडामध्ये एकापेक्षा अधिक अळ्या आढळत नाहीत.

पुर्ण वाढलेल्या अळीचा रंग पिवळसर, फिक्कट ते गडद हिरवा, तपकिरी, लालसर गुलाबी, नारंगी आणि थोडासा काळसर असते. अंगावर तुरट गर्द करड्या रेषा असून पाय तपकिरी असतात. अळीची लांबी ३७ ते ५० मिमी असते. हिरव्या अळीची २० ते २१ दिवसात पूर्ण वाढ होते. अळी बोंडाना छिद्र पाडून तोंडाकडील भागाने आत अर्धी शिरून आतील भाग पोखरते. मात्र अर्धा भाग बाहेर राहत असल्याते नैसर्गिक शत्रुंना ही लवकर बळी पडते. ही अळी पुर्ण जीवनात ५ वेळा कात टाकते. कात टाकल्यानंतर नवीन कात पक्की होण्यास २ -३ तास लागतात. पुर्ण वाढ झालेली अळी पानावरून खाली उतरून ओलसर जमिनीत १ ते ६ इंच छिद्र करून आत घुसते व कोषावस्थेत जाते. कोष फिक्कट तपकिरी रंगाचा, १५ ते २० मिमी लांब असतो. कोषावस्था दोन आठवड्यापासून अनेक आठवडे असते. बहुतेक पतंग जून, ऑगस्ट, डिसेंबर, जानेवारी महिन्यात आढळतात, पतंग दिवसा दिसत नाहीत. ते रात्री सक्रिय असतात. औषधांना प्रतिकारक पतंग शेतापासून लांब जातात.

हिरव्या अळीला कापसाच्या बोंडातील वाढणारा कोवळा सेल्युलोज खाद्य म्हणून आणि सरकीच्या तेलाचा वास फार आवडतो. त्यामुळे किटकनाशकामध्ये सरकी तेलाचा अंश असला म्हणजे अळी अकर्षित होते.

नुकसानीचा प्रकार :- हिरव्या बोंड अळीमुळे किडलेल्या पात्या, फुले, कळ्या व लहान बोंडे गळतात. मोठी बोंडे गळत नाहीत. मात्र अळीने आतील भाग पोखरल्याने बोंड निकामी होते व रूईची प्रत खालवते. त्यमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंडअळी) :- शेंदरी बोंड अळीचे मादी पतंग कोवळ्या पानाच्या मागील भागावर, पात्या, कळ्या व पुष्य कोषावर बारीक फटीत अलग अलग लांबोळी, पांढरी, गोल, चपटी अंडी घालते. सर्व साधारण ४ ते ५ दिवसात अंडी उबतात. १५ ते १६ मिमी लांबीची अळी असते. अळ्या रात्री पात्यामध्ये बोंडात शिरायला ५ ते ६ दिवस लागतात.

बोंडामध्ये अळी शिरल्यानंतर ओल्या विष्टेने छिद्र बंद करते. त्यामुळे वरून छिद्र जाणवत नाही. बोंडातील अळ्या रुईमधील सरकी खातात. सरकीची प्रत व तेलाचे प्रमाण कमी होते. ९ ते २१ दिवसात अळीची पुर्ण वाढ होते. गुलाबी रंगाच्या आळ्यांचे डोके बदामी रंगाचे असते. पुर्ण वाढ झालेली अळी बोंडाच्या टोकावरील भागावर गोल छिद्र करून बाहेर पडते. नंतर ती रेशमी आवरणात कोष तयार करते. कोषावस्था बोंडात, रुईमध्ये, खाली पडलेल्या पाल पाचोळ्यात ६ ते २० दिवस टिकते. एकूण जीवनक्रम २३ ते ३१ दिवसात पुर्ण होतो.

नर व मादीचा संयोग रात्री होतो. नंतर ३ दिवसात मादी अंडी घालते. पतंग आकाराने लहान असतात. त्यांची पुढील पंखाची जोडी विटकरी रंगाची असून त्यावर काळपट ठिपके असतात. कीड ग्रस्त पात्या व फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात.

पिंक बोल वर्म (Pink Boll Worm):- ही कीड कापूस या पिकास ”कॅन्सर’ आहे असे म्हटलयास वावगे ठरणार नाही. यासाठी अनेक कंपन्यांनी अतिविषारी किटकनाशके निर्माण केली. ही किटकनाशके वापरल्यानंतर कीड आटोक्यात येते म्हणून जगभरातील शेतकरी ही औषधे वापरू लागले, म्हणून या अळीपासून जे फुलपाखरू निर्माण झाले, ज्या अंड्यापासून अळी निर्माण झाली ती या किटकनाशकास प्रतिकारक झाली व मग या किडीने सर्व प्रकारची किटकनाशके पचविली. याचा अतिशय दु:खदायी व वाईट अनुभव येऊ लागला, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशामधील अनेक जिल्ह्यातील कापूस पिकामध्ये ह्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर व वारंवार झाला असता यासाठी शेतकर्‍यांनी बँकांचे कर्ज काढून अनेक पटीने ही औषधे वापरली, परंतु ही कीड आटोक्यात आली नाही. शेवटी बँकांचे कर्ज फेडावयास पैसे नसल्यामुळे कापसातील कीड नाहीशी करण्यास निघालेल्या शेतकर्‍यांना घोर निराशा पोटी हीच किटकनाशके पिऊन स्वत:चे प्रणात्क्रिमण करावे लागले. हा प्रकारात अनेक शेतकर्‍यांचे बळी गेले व जात आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी कीड व रोग प्रत्यक्ष पिकांवर येण्या अगोदरच योग्य ती खबरदारी घेतल्यास ह्या किडींस व रोगास प्रतिबंध होऊ शकेल.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गुलाबी बोंडअळीठिपक्याची बोंडअळीपाने गुंडाळणारी अळीप्रकाश सापळाहिरवी बोंड अळी
Previous Post

कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख…. क्रमशः भाग-3

Next Post

शासनाची एकरकमी कर्ज परतफेडीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
शासनाची एकरकमी कर्ज परतफेडीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शासनाची एकरकमी कर्ज परतफेडीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.