कृषीप्रदर्शन
कृषी प्रदर्शनामध्ये मका कंबाईन हार्वेस्टर दाखल

जळगाव : शेतीतील बदलते तंत्रज्ञान, आधुनिक कृषी यंत्रे, नव्या प्रयोगांची माहिती घेण्यासाठी कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी जळगाव जिल्ह्यासह लगतच्या जिल्हा, गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती नोंदविली. मू. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा संकुल येथे सुरू असलेले कृषी प्रदर्शन सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रदर्शनात् २२० पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. यात ४० स्टॉल्सवर कृषी यंत्रे, अक्जारांची माहिती व प्रात्यक्षिके सादर केली जात आहे. प्रदर्शनातील मका कंबाईन हार्वेस्टर आकर्षण ठरत आहे. जळगावमध्ये पहिल्यांदाच हे यंत्र दाखल झाले आहे. शनिवारी २७ महिला शेतकरी गटांना आदर्श महिला गट शेती तंत्रज्ञान स्वीकारुन उत्पादन वाढवावे शेती क्षेत्रात सातत्याने बदल होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास उत्पादनक्षमता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. महिला बचत गटांनीही बदलत्या काळानुसार पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न राहता कृषी माल प्रक्रिया उद्योगांकडे वळण्याची गरज असल्याचे पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितले.
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या वेळी निवृत्त कृषी अधिकारी अनिल भोकरे, पाणी फाउंडेशनच्चे समन्वयक राकेश हिवरे, मत्स्य संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, वरिष्ट शास्त्रज्ञ बी. डी. जडे उपस्थित होते प्रास्ताविक अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.





