कृषीप्रदर्शन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात प्रक्रिया उद्योगांचे आकर्षण

जळगाव : ॲग्रोवर्ल्डतर्फे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि. २० रोजी दुपारी चार वाजता एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे. दि. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या प्रदर्शनात ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे आणि भाजीपाला सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योग यांचे प्रमुख आकर्षण आहे.

प्रदर्शनात शेतीमधील नवतंत्रज्ञान, यंत्र व अवजारांवर भर दिला आहे. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

ई-स्कूटर जिंकण्याची संधी
पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीसांसह ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. शेतकऱ्यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शनात २२० पेक्षा अधिक स्टॉल्स असून, प्रदर्शन मोफत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button