हॅपनिंग

1972, 2015 च्या दुष्काळाइतकी भीषण परिस्थिती यंदा नाही; मराठवाडा वगळता धरणात पुरेसा पाणीसाठा..!

मुंबई : सोशल मीडियावर “महाराष्ट्रात पाणी संपले” अशा अर्धवट, उथळ आणि सनसनाटी, पॅनिक पसरवणाऱ्या बातम्या फिरत असताना अधिकृत आकडेवारी वेगळेच चित्र दाखवत आहे. यंदा एल-निनोचा फटका बसून मान्सून 19% तुटीचा राहिला हे खरे असले, तरी राज्यातील धरणांची अवस्था 2015 किंवा 1972 च्या महाभयंकर दुष्काळाइतकी अजिबात नाही. किंबहुना, मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाणीसाठा पुरेसा आहे. राज्यातील विभागनिहाय तुलनात्मक स्थितीदेखील दिली आहे.


📞 Call Now

📞 Call Now

जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, आजघडीला राज्यातील एकूण पाणीसाठा 72.1% आहे. 2015 मध्ये याच वेळी हा साठा केवळ 60-62% होता. फरक मोठ्या धरणांमध्ये अधिक स्पष्ट आहे. 2015 मध्ये मृतसाठ्यात गेलेले जायकवाडी धरण आज 79.79% भरलेले आहे, तर राज्यातील सर्वात मोठे कोयना धरण 95.5% (100 TMC) भरले आहे. 2015 मध्ये कोयना 15.34% वर आले होते. कोकण विभाग 88.9%, पुणे 82.9%, नाशिक 80.3% आणि मुंबईची सातही धरणे 94.57% भरलेली आहेत – विहार 99.95% आणि मध्य वैतरणा 99.77%. 2015 च्या तुलनेत हा साठा जवळपास दुप्पट आहे. याचे कारण यंदा पाऊस कमी पडला पण जुलै-ऑगस्टमध्ये अतिवेगाने पडल्याने मोठी धरणे एका महिन्यात ओसंडून वाहिली.

दुसरीकडे प्रशासनही पूर्ण तत्पर आहे. राज्य सरकारने आधीच 305 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असून पीक पंचनामे 80% पूर्ण झाले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे नियोजन आहे. पुणे जिल्ह्याने तर ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी पुरेल असे वॉटर ऑडिट करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे. गोसे खुर्द सारखे धरण 100% भरल्याने विदर्भात रब्बीला दिलासा मिळणार आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना फी माफी, लाडक्या बहिणींना मदत, बळीराजाला आधार अशा अनेक पातळ्यांवर दिलासा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)


📞 Call Now

📞 Call Now

मराठवाडा अपवाद – तिथे लक्ष देणे गरजेचे
या सकारात्मक चित्राला एकमेव अपवाद आहे – मराठवाडा. तिथे परिस्थिती 2015 सारखीच गंभीर आहे. विभागाचा सरासरी साठा 42.7% दिसत असला तरी लहान-मध्यम धरणांमध्ये फक्त 5-17% पाणी आहे. लातूरची 8 धरणे 5%, धाराशिवची 17 धरणे 5%, बीडची 17 धरणे 11% वर आहेत. मांजरा 9%, लोअर दुधना 16%, माजलगाव 23% तर सिना कोळेगाव कोरडे ठाक आहे. त्यामुळे तिथे 374 टँकर सुरू करावे लागले आहेत.

> थोडक्यात, राज्यात दुष्काळ आहे पण 1972 मध्ये लोकांना सुकडी वाटावी लागली किंवा 2015 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी न्यावे लागले, तितकी जीवघेणी अवस्था आज नाही. पाणी आहे, नियोजन आहे, फक्त अफवांपासून दूर राहून पाण्याचा काटकसरीने वापर आणि मराठवाड्यातील बळीराजाला मदतीचा हात – हाच यंदाचा मार्ग आहे.

2015 आणि 2026 – दोन्ही दुष्काळाची वर्षे; पण धरणांच्या पातळीत जमीन-अस्मानाचा फरक

> मुंबई – 2015 आणि 2026 – दोन्ही दुष्काळाची वर्षे, पण धरणांच्या पातळीवर मोठा फरक आहे. 2015 पेक्षा 2026 ची स्थिती राज्य पातळीवर खूपच चांगली आहे. अर्थात, मराठवाड्यात जवळपास सारखीच गंभीर स्थिती आहे.

प्रमुख धरणातील तुलनात्मक आढावा
(अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार)
_*धरण / विभाग | ऑक्टोबर 2015 (भीषण दुष्काळ) | ऑक्टोबर 2026 (सध्याची स्थिती) | निष्कर्ष*

• राज्य एकूण पाणीसाठा | 2015 – सुमारे 60-62% (1972 नंतर सर्वात कमी) | 2026 – 72.1% | राज्य पातळीवर 2026 हे 2015 पेक्षा 10-12% ने चांगले आहे.

जळगाव – 2015 ऑक्टोबर च्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा –
2015 ऑकटोबर – गिरणा 14 %, हातनूर 25%, सुकी 35%, बोरी 00%
(निरंक)
2026 ऑकटोबर- गिरणा 99.23% %, हातनूर 100%, सुकी 101.28%, बोरी 100.30% (निरंक)

• मराठवाडा विभाग | 2015 – फक्त 10-12%, अनेक धरणे 0% वर | 2026 – 42.7% | आकडा जास्त दिसतो, पण लहान धरणे आजही 5-17% वरच आहेत

• जायकवाडी (पैठण) | 2015 – 4% ते मृतसाठा – यामुळेच लातूरला वॉटर ट्रेन न्यावी लागली होती | 2026 – 79.79% उपयुक्त साठा, नंतर 75% वर | नाशिक-अहिल्यानगरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी भरले.

• कोयना (राज्यातील सर्वात मोठे धरण) | 2015 – ऑगस्ट 2015 मध्ये 70% च्या खाली, मे महिन्यात 15.34% वर आले होते | 2026 – 95.5% भरले (105.2 TMC पैकी 100 TMC) पश्चिम महाराष्ट्राला यंदा दिलासा.

पुणे-नाशिक-कोकण
(ऑक्टोबर अखेर जलसाठा) | 2015 – पुणे विभाग 55-60%, कोकण 70% नाशिक 80.3%, कोकण |
2026 – पुणे विभाग 88.9% कोकण 89% नाशिक 92% उत्तर-मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाणी आहे.

• मुंबईची 7 धरणे | 2015 मध्ये 85-90% | यंदा 94.57% (विहार 99.95%, वैतरणा 99.77%) राजधानी मुंबईला चिंता नाही

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)


📞 Call Now

📞 Call Now

याचा अर्थ काय?
2015 मध्ये पाऊस कमी झाल्यावर धरणेच भरली नाहीत. 2026 मध्ये पाऊस कमी पडला; पण तो जुलै-ऑगस्टमध्ये खूप वेगाने पडला. त्यामुळे कोयना, जायकवाडी, गिरणा, भातसा, गोसे खुर्द सारखी मोठी धरणे एकाच महिन्यात 100% भरली, पण जमिनीत म्हणावे तसे पाणी मुरलेच नाही. म्हणूनच शेतीचे नुकसान 2015 सदृश्य भासत आहे, पण पिण्याच्या पाण्याची टंचाई 2015 इतकी टोकाची होण्याची कोणतीही चिन्हे नाही. त्यातच शासकीय पातळीवर वॉटर ऑडिट मुळे परिस्थिती पूर्ण नियंत्रणात राहणार आहे.

मराठवाड्यासाठी चित्र बदलत नाही
2015 मध्ये जसे लातूर-धाराशिवमधील 25 मध्यम धरणे 0-5% वर होती, तसेच आजही लातूरची 8 धरणे 5% वर, धाराशिवची 17 धरणे 5% वर, बीडची 17 धरणे 11% वर आहेत. म्हणजेच उर्वरित संपूर्ण राज्य वाचले आहे, मराठवाडा मात्र पुन्हा एकदा 2015 च्या उंबरठ्यावर उभा आहे.

गिरणासह हतनूर, बोरी, सुकी फुल्ल; खान्देशात पाण्याचे टेन्शन मिटले!

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button