तंत्रज्ञान / हायटेक

शेतकऱ्यांसाठी ‘मेटा’चं ब्रह्मास्त्र: म्यूस वंडर आणि म्यूस वंडर फुल- आता शेताच्या बांधावरही एआय मदतीला

विक्रांत पाटील, मुंबई.
Vikrant@Journalist.Com
+91-8007006862 (WA)

शेतकरी म्हटलं की, डोळ्यासमोर येतं – काळी माती, ऊन-पाऊस, बाजारभावाची चिंता, आणि एआय (AI) म्हटलं की वाटतं – हे शहरातल्या, हाय-फाय लोकांचं, तरुण पोरांचं खेळणं.

पण, आता हे चित्र बदलणार आहे. मेटा (Meta) म्हणजेच फेसबुक (FB)ने आणलेले दोन नवे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल्स – म्यूस वंडर आणि म्यूस वंडर फुल (Muse Wonder आणि Wonder Full) हे फक्त आयटीवाल्यांसाठी नाहीत, तर थेट बांधावरच्या शेतकऱ्यासाठी, कृषी उद्योजकासाठीही बनले आहेत.

हे ओपन-एआय म्हणजेच ‘चॅट-जीपीटी’ला टक्कर देणारे मॉडेल्स आहेत, ज्यात तीन ताकद आहेत – जबरदस्त स्मरणशक्ती (मेमरी), कोडिंग आणि स्वतःहून काम करणारा एजंट (एजेंटीक).

हे वापरायचे 3 मार्ग – मेटा मॉडेल एपीआय, म्यूस कोड आणि म्यूस एजंट प्रॉडक्ट. आणि यातला सगळ्यात पॉवरफुल वंडर फुल हा फक्त म्यूस कोड मधून मिळतो.


📞 Call Now

📞 Call Now

आता याचा फायदा शेतात कसा होणार, ते पाहूया.

1. प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी – तुमचा डिजिटल कृषी-सहाय्यक

अ) रोग-कीड ओळख ते उपाय: समजा, तुमच्या टोमॅटोच्या पानावर डाग पडलाय? फोटो काढून वंडरला टाका आणि विचारा – “हा कोणता रोग आहे? यावर सेंद्रिय उपाय काय? मराठीत सांग.” त्याची मेमरी इतकी भारी आहे की, तो लगेच विचारेल – “मागच्या महिन्यात तुम्ही या प्लॉटवर कोणती फवारणी केली होती?” आणि त्यावरून अचूक सल्ला देईल.

ब) हवामान आणि बाजारभावाचा अंदाज: “उद्या नाशिकमध्ये पाऊस आहे का? द्राक्षाची काढणी करू का?” किंवा “पुढच्या 15 दिवसात सोयाबीनचा भाव वाढेल का? विकू की थांबू?” – वंडर जुना डेटा, हवामान रिपोर्ट आणि बाजार समितीचे भाव एकत्र करून तुम्हाला साध्या मराठीत निर्णय घ्यायला मदत करेल.

क) सरकारी योजना – फॉर्म भरण्यापासून सबसिडीपर्यंत: “पीएम किसान, नमो शेतकरी, पीक विमा यासाठी मी पात्र आहे का? अर्ज कसा भरू?” फक्त सातबारा नंबर आणि आधार टाकला की तो फॉर्मचा मसुदा मराठीत लिहून देईल. कुठे चूक झाली तर एजंटसारखा स्वतः दुरुस्त करून देईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)


📞 Call Now

📞 Call Now

2. प्रक्रिया उद्योग (प्रोसेसिंग) आणि कृषी-उद्योजकांसाठी

तुम्ही हळद पॉलिश करता, द्राक्षापासून मनुका बनवता, किंवा लोणचं-पापडचा किंवा इतर कोणताही कृषी अथवा पूरक उद्योग, व्यवसाय करता –

अ) ब्रँडिंग आणि विक्री: “माझ्या सेंद्रिय हळदीसाठी अमेझॉन वर विकण्यासाठी 5 फोटो कॅप्शन, उत्पादनाची माहिती आणि 3,000 रुपयात जाहिरात प्लॅन लिहून दे” – वंडर एकाच वेळी इंग्रजी, हिंदी, मराठीत किंवा तुम्हाला हव्या त्या भारतीय भाषेत कंटेंट देईल.

ब) हिशोब आणि कोडिंग: तुम्हाला तुमच्या कोल्ड स्टोरेजचा स्टॉक मॅनेज करायचा आहे? म्यूस कोड मधला वंडर फुल तुम्हाला विचारेल – “किती शेतकरी, किती माल?” आणि तुमच्यासाठी साधं एक्सेल किंवा मोबाईल ॲपचा कोड लिहून देईल. प्रोग्रामरला हजारो रुपये द्यायची गरज नाही.

क) निर्यातीसाठी मदत: “माझा आंबा किंवा केळी दुबईला पाठवायचे आहेत, कोणती कागदपत्रं लागतील, कोणता कंटेनर लागेल?” – तो स्टेप बाय स्टेप प्रोसेस आणि खर्चाचा तक्ता बनवून देईल.

3. कृषी पूरक उद्योग – दूध, पोल्ट्री, मत्स्यपालन

– दुग्ध व्यवसाय: “माझ्या 5 म्हशी आहेत, त्यांचं दूध 5% फॅटवरून 6.6% वर कसं नेऊ? खाद्य चार्ट बनव.” वंडर तुमच्या म्हशीचं वजन, दूध यावरून चार्ट देईल आणि मागच्या महिन्याचा डेटा लक्षात ठेवेल.

– पोल्ट्री आणि शेळीपालन: लसीकरणाचं वेळापत्रक, औषधाचा डोस, विक्रीसाठी व्हॉट्स अप मेसेज – सगळं तो मॅनेज करेल.

– एफपीओ आणि बचत गट : 20 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे? वंडर तुमच्यासाठी एफपीओ मीटिंग मिनिट्स लिहील, बँकेसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करेल, आणि प्रत्येकाला त्याच्या भाषेत – कोणी मराठी, कोणी हिंदी – मेसेज पाठवेल.


📞 Call Now

📞 Call Now

शेवटचं – शेतकऱ्याचा नवा मित्र

आधी शेतकरी हवामान आणि व्यापाऱ्यावर अवलंबून होता. आता त्याच्या हातात म्यूस वंडर आहे.

स्पार्क मॉडेलने मेटा एआय ची सुरुवात केली, आता वंडर ने तीच ताकद थेट शेताच्या बांधावर आणली आहे.

तुम्हाला फक्त सांगायचंय – “मला काय हवंय”. काय पेरायचं, कसं करायचं, उत्पन्न वाढीसाठी काय करू,
कसं करायचं, कुठे विकायचं, कागद कसा भरायचा – हे तो एजंटसारखं स्वतः करेल.

शेतात घाम गाळणं तुमचं काम, आणि त्या घामाचं सोनं करणं वंडरचं काम.

पुढचा हंगाम तुमचा, तंत्रज्ञान आणि डोकं वंडरचं

विक्रांत पाटील, मुंबई.
Vikrant@Journalist.Com
+91-8007006862 (WA)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button