डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टेरिफ धोरणामुळे पाकिस्तानच्या बासमतीची अमेरिकी बाजारात चांदी होणार आहे. एकीकडे भारतावर वाढीव टेरिफ असताना पाकिस्तानला मात्र कमी कराचा स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. अर्थात, पाकिस्तानकडे मागणीइतक्या पुरवठ्याची क्षमता तूर्तास नसल्याने अमेरिकेत बासमती तांदळाच्या किंमती भडकण्याची भीती आहे. दुसरीकडे, नॉन-बासमती तांदूळ व्यापारात थायलंड आणि व्हिएतनामला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

भारतीय निर्यातीत 50% हून अधिक घट होणार
पाकिस्तानी बासमती तांदळाची अमेरिकन बाजारपेठ मोठी असली तरी भारताच्या तुलनेत तिला मर्यादा आहेत. गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानाने अमेरिकेत सुमारे 7,72,725 टन बासमती निर्यात केली, त्यातून 876.9 दशलक्ष डॉलर्स महसूल मिळवला. त्यांच्या 2023-24 मधील निर्यातीतील 24% हिस्सा अमेरिकन बाजारात होता. पाकिस्तान सुमारे 1.8 लाख टन बासमती अमेरिकेत निर्यात करतो, जे भारताच्या 3 लाख टनच्या तुलनेत कमी, पण सध्या वाढत्या ट्रेंडवर आहे. तर, भारतीय बासमती निर्यातीत आता अंदाजे 50-80% पर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
भारतीय बासमतीवर 50% टेरिफमुळे चित्र बदलणार
भारतावरील नव्या वाढीव टेरिफमुळे अमेरिका बाजारात बासमती पुरवठ्यात सध्या अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानी निर्यातदारांना आपला हिस्सा वाढवण्याची मोठी संधी मिळाली आहे. नव्या करांमुळे अमेरिकेत भारतीय बासमतीची किंमत 1,200 डॉलर्सवरून जवळपास 1,800 डॉलर्स प्रति टन वर जाईल. अमेरिकेत पाकिस्तानी वस्तूंवर सध्या फक्त 19% टेरिफ आहे, त्यामुळे पाकिस्तानी बासमती तिथे सरासरी 1,134 ते 1,450 डॉलर्स प्रति टन किंमतीत उपलब्ध आहे. भारतीय बासमतीच्या तुलनेत 662 ते 350 डॉलर्स इतकी स्वस्त किंमत असल्याचा बोनाफाइड स्पर्धात्मक पर्यायी फायदा पाकिस्तानला लाभणार आहे.
अमेरिकी बाजारात पाकिस्तानाचा हिस्सेदारी 24%
पाकिस्तानाने 2024-25 मध्ये अमेरिकेत सुमारे 80,000 ते 100,000 मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे.=अमेरिकी बाजारात पाकिस्तानाचा हिस्सेदारी 24% आहे, म्हणजे जवळपास 1,80,000 टनपेक्षा जास्त बासमती निर्यात होऊ शकतो. आता भारताच्या 50% टेरिफमुळे पाकिस्तानचा अमेरिका निर्यात वाढवण्याचा हेतू आहे, वाढीव 100,000 टन पेक्षा जास्त बासमती निर्यात करण्याचे लक्ष्य पाकिस्तानने ठेवले आहे. भारतातून 2023-24 मध्ये अमेरिकेत सुमारे 2,34,467 मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात झाली, ज्याचे मूल्य जवळपास 370-380 दशलक्ष डॉलर आहे.
शॉर्ट आणि लाँग टर्म परिणाम
शॉर्ट टर्म: भारतीय बासमती निर्यात 50% घटू शकते, दाम वाढतील, आणि पाकिस्तानी उत्पादकांना बाजारात मोठा फायदा. भारतीय निर्यातदारांसाठी आर्थिक दबाव वाढेल, नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, आणि शेतकरी-जागतिक विक्रीसाठी त्रस्त होतील.
लाँग टर्म: पाकिस्तान अमेरिकन बाजारपेठेतील आपली पकड मजबूत करेल, भारत निर्यातमार्गांमध्ये विविधता शोधेल, पण बासमती निर्यात बाजार ताणतणावात राहील. भारताला विविध जागतिक बाजारपेठांमध्ये बदल करावा लागेल, उत्पादन गुणवत्ता सुधारावी लागेल, आणि स्थानिक प्रक्रिया उद्योग अधिक सशक्त करावे लागतील.
एकूणच, सरकारने आयात शुल्क सवलत, नवीन बाजारपेठांमध्ये वाटचाल, आणि निर्यातदारांसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, पण अमेरिकी टॅरिफचा मोठा फटका टाळणे तूर्तास कठीण आहे. सरकार व निर्यातदार यांना आता निर्यात स्त्रोत विस्तारणे आणि उत्पादन गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा लागेल.














