राज्यात आजपासून रविवार, 10 ऑगस्टपर्यंत हवामान साधारणपणे बदलत राहील, अंशत: ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील.
FPC ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 ते 6 कोटींपर्यंत अनुदान
Agri Startup ला ₹ 10 लाख ते ₹ 10 कोटींपर्यंत फंडिंग..
FPC & Agri Startup – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला कार्यशाळा
जिल्हानिहाय अंदाज :
1. जळगाव – आज ढगाळ वातावरण, 9 ऑगस्ट – संध्याकाळी जोरदार वारे अन् पावसाची शक्यता, 10 ऑगस्ट – सकाळी हलका पाऊस.
2. धुळे – आज ढगाळ हवामान, 9 ऑगस्ट – संध्याकाळी जोरदार मान्सून वाऱ्यासह ढगाळ स्थिती.
3. नंदुरबार – अधूनमधून हलका शिडकावा, 9 ऑगस्ट – थोडा वादळी दिवस.
4. नाशिक – आज सामान्यपणे ढगाळ स्थिती, 9 ऑगस्ट – सायंकाळी मुसळधार पावसाची शक्यता.
5. अकोला – अधूनमधून सूर्यदर्शन, पण बहुतांश ढगाळ वातावरण.
6. बुलढाणा – वातावरण ढगाळ राहील, काही ठिकाणी हलका पाऊस.
7. संभाजीनगर – ढगाळ स्थिती आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
8. जालना – सामान्यपणे थोडे ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता.
राज्याचा विभागनिहाय हवामान अंदाज
6 ते 10 ऑगस्ट 2025
1. कोकण
– तापमान: 27- 29°C
– पाऊस: अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस सतत होणार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
– मुख्यत: वातावरण: ढगाळ, आद्रर्ता जास्त.
2. मध्य महाराष्ट्र
– तापमान: 28- 30°C
– पाऊस: मध्यम ते हलका पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, विशेषत: घाटमाथ्यावर.
– हवामान : थोडेसे उष्ण, ढगाळ हवामान
3. उत्तर महाराष्ट्र
– तापमान: 27- 29°C
– पाऊस: काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, थोडा वारा राहील.
– हवामान: सामान्यपेक्षा जरा जास्त ओलावा, बहुतांश रिमझिम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता
ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा
4. विदर्भ
– तापमान: 29- 31°C
– पाऊस: हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी अधून-मधून मुसळधार
– हवामान: थोडे उष्ण, आद्रर्ता राहू शकते
5. मराठवाडा
– तापमान: 29- 32°C
– पाऊस: अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस, काही भागात मुसळधार शक्यता
– वातावरण: उष्ण, दमट, हलका पाऊस चालू राहू शकेल
एकूणच येत्या 3-4 दिवसांत: राज्यात ढगाळ, पावसाळी वातावरण, साधारण 27- 32°C तापमान आणि अनेक ठिकाणी हलका-मध्यम ते काही ठिकाणी पावसाची शक्यता!