मुंबई : राज्यातील सध्याचा पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे. विदर्भ वगळता सर्वत्र सध्याच्या पावसाने हळूहळू काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागांत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यानिहाय स्थितीचा अंदाज
– जळगाव: हलका ते मध्यम पावसाची शक्यता, तुरळक ढगाळ वातावरण.
– धुळे: हलका ते मध्यम पाऊस, काही भागात विजांसह पावासाची शक्यता.
– नंदुरबार: तुरळक-हलका पाऊस अपेक्षित, ढगाळ वातावरण.
– नाशिक: हलका ते मध्यम पाऊस, दुपारच्यावेळी कुठे-कुठे विजांसह हलक्या ते मध्यम सरी संभव.
विदर्भ:
– अकोला: मध्यम पाऊस, काही भागात जोरदार सरी येण्याची शक्यता.
– बुलढाणा: हलका ते मध्यम, काही ठिकाणी विजांसह पाऊस, जोरदार वाऱ्याची शक्यता.
मराठवाडा:
– संभाजीनगर: हलका ते मध्यम पावासाची शक्यता, ढगाळ वातावरण.
– जालना: हलका, काही भागांत मध्यम पावसाची शक्यता.
राज्याचा येत्या 48 तासांचा समग्र अंदाज (1-2 ऑगस्ट):
– कोकण व घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात मध्यम, मराठवाडा-विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस, कुठे-कुठे विजांसह सरी, काही भागात जोरदार वारे वाहू शकतात.
पावसाचा सध्याचा जोर ओसरतोय !
• मुंबईसह कोकण विभागात आणि राज्यातही पावसाचा सध्याचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. 1 ऑगस्टला विदर्भात मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील तीन-चार दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून सध्याच्या पावसाने काढता पाय घेतला आहे. या सर्व ठिकाणी आठवडाभर हलक्या श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे; पण कुठेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मात्र पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय !
राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती