• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
in यशोगाथा
0
मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वंदना कोर्टीकर –
मधाचा गोडवा साऱ्यांनाच भुरळ पाडतो. फक्त आयुर्वेदाच्या दृष्टीनेच नाही, तर सौंदर्याच्या क्षेत्रातही मधाचा उपयोग विविध पातळ्यांवर होतो. मधमाशीच्या उत्पादनांचे फायदे सर्वांनाच माहीत असतात, पण या मधमाशींना जतन करणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तथापि, या क्षेत्रात खूप कमी लोक काम करत आहेत. त्यामध्ये एक नाव म्हणजे श्वेता गायकवाड. श्वेता गायकवाड यांनी मधमाशी पालनातून दरवर्षी एका पेटीपासून 30 ते 35 किलो मधाचे उत्पादन घेतात. सरासरी 500 रुपये किलो दराने मधाची विक्रीतून आज त्या वर्षाला 9 लाख रुपये नफा कमवत आहेत.

श्वेता यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळील अवसरी खुर्द या गावी झाला. श्वेता यांचे वडील शेतकरी आणि आई शिक्षिका होत्या. त्यांनी विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे कृषी व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये कृषी व्यावसायिक कृषी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. कृषी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षीच श्वेता यांनी ठरवले की, मधुमक्षिका (मधमाशी) विषय प्राधान्याने घ्यावा. पुढे यातच आवड निर्माण केली. आणि त्यांच्या कार्यात व्यावसायिक आणि व्यवहारिक दृष्टिकोनाचा समावेश केला. मधुमक्षिका संवर्धन ते प्रक्रिया सोबतच विक्री व्यवसायाचा सखोल अभ्यास केला.

 

मधमाशी संशोधनाचे प्रशिक्षण केले पूर्ण
ग्रामीण भाग म्हंटल की, अडचणी तर येणारच. श्वेता यांना देखील सुरुवातीला भांडवलाची अडचण आली. यासाठी त्यांनी काही काळ नोकरीही केली. नोकरी करत असताना देखील त्यांनी मधुमक्षिका क्षेत्रातच कारकीर्द करायचे असे मनात धरून ठेवले होते. भारत सरकारच्या मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था (CBRTI) पुणे येथे संशोधक वर्गाच्या सातत्याने संपर्कात राहून विविध प्रशिक्षणाचे टप्पे देखील श्वेता यांनी पूर्ण केले. हे प्रशिक्षण श्वेता यांच्यासाठी एक महत्त्वाचे टर्निंग पॉइंट ठरले. त्यानंतर त्यांनी मधमाशींचे संवर्धन आणि व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला.

मधाचे असे केले विक्री व्यवस्थापन
श्वेता गायकवाड यांनी मधमाशींच्या विविध जातींचा अचूक अभ्यास करून मिली फेरा या जातीची निवड केली. या एका पेटीपासून दरवर्षी 30 ते 35 किलो मध मिळते आणि आता त्यांच्याकडे मधाच्या एकूण 250 पेट्या आहेत. सरासरी 500 रुपये किलो दराने, त्यांनी या मधाची विक्री सुरू आहे. श्वेता यांचा डेहराडून, बिहार, हरियाणा, अशा काही राज्यांमध्ये व्यवसाय सुरु आहे. गेल्या वर्षी त्यांना मध उत्पादनातून 13 लाख उत्पन्न मिळाले. यातून त्यांना 4 लाख रुपये खर्च आला असून त्यांनी 9 लाख रुपये नफा मिळवला.

 

मधाच्या विक्रीसाठी, श्वेता यांनी काचेच्या बाटलीत पॅकिंग करून, त्यावर ब्रँडिंग आणि स्टिकर लावले. यासाठी त्यांनी अडीचशे ते पाचशे ग्रॅमच्या तीन वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये मध विक्रीसाठी उपलब्ध केला. त्यानंतर, श्वेता यांनी आयुर्वेदिक शॉप्स आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापन सुरू केले. महिलांच्या गटांसोबत काम करत, त्यांनी विक्रीची यशस्वी व्यवस्था निर्माण केली. एकदा लोकांनी आपल्या मधाची चव चाखल्यानंतर, ते पुन्हा पुन्हा या मधाची मागणी करू लागले. मध विक्रीचे दृषटिकोन विविध होते, त्यामुळे श्वेता यांनी मध प्रोसेसिंग करून देखील विक्रीचा पर्याय सुरू केला.

‘मधुलेह’ ब्रँड केला रजिस्टर
केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (CBRTI) या संस्थेच्या माध्यमातून श्वेता गायकवाड यांनी देशभरातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी विविध प्रशिक्षण घेतले आहेत. विविध राज्यांमध्ये प्रशिक्षण घेत असताना, श्वेता यांनी वातावरण, मधपाळ यांच्याशी नेहमीच संपर्क ठेवला आणि त्यांच्यापासून विविध उपक्रम व संशोधन याचे सखोल ज्ञान मिळवले. प्रशिक्षण घेत असतानाच श्वेता यांच्या लक्षात आले की, मध उत्पादनाची मागणी वाढत आहे, आणि याच गोष्टीने त्यांना एक महत्त्वाचा निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. त्यांनी ‘मधुलेह’ हा ब्रँड रजिस्टर करून, देशभरात या उत्पादनाची विक्री करण्याचा मोठा निर्णय घेतला.

संपर्क :-
श्वेता गायकवाड
मो. 8177914150

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !
  • फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 'मधुलेह' ब्रँडमध उत्पादनमधमाशी पालन
Previous Post

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

Next Post

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish