जळगाव : रब्बी हंगामातील पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना उद्या अंतिम दिवस आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट किंवा इतर आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी संरक्षण मिळते. जे शेतकरी अद्याप या योजनेसाठी अर्ज करू शकले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून आपल्या पिकांचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करावे.
राज्यात 2016 -17 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र शासनाने केवळ एका रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे, ज्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. आता रब्बी हंगाम 2024 -25 साठीही पीक विमा योजनेत सहभागाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम संधी!
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक विमा पोर्टल www.pmlby.gov.in कार्यान्वित केले आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि रब्बी कांदा पिकांसाठी विमा घेण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे. तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्च 2028 आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगाम 2023 -24 मध्ये 71 लाखांहून अधिक विमा अर्ज प्राप्त झाले होते. यंदा 11 डिसेंबर अखेर राज्यात 41 लाख विमा अर्ज दाखल झाले आहेत.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात यंत्रावर फोकस ; शेतकऱ्यांना मजूर समस्येवर पर्याय – अशोक जैन
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇