‘शेतकरी’ हा शब्द ऐकला की प्रत्येकाच्या मनात पुरुषाची प्रतिमा उमटते, पण सोबत सावलीप्रमाणे शेतीत मदत करणाऱ्या स्त्रिया कधीच शेतकऱ्याचा दर्जा मिळवू शकत नाहीत. ती तिच्या शेतकरी पतीसाठी फक्त एक ढाल बनून राहते. पण आजची गोष्ट काही वेगळी आहे, आज आम्ही एका महिला शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सेंद्रिय शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून एक आदर्श घालून दिला आहे. ललिता सुरेश मुकाती असे त्यांचे नाव असून त्या मध्य प्रदेशातील बड़वानी जिल्ह्यातील बोरलाय या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. ललिता यांना ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’ आणि ‘हलधर सेंद्रिय शेतकरी राष्ट्रीय पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
बीए ग्रॅज्युएट ललिता यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी पतीकडून शेतीच्या युक्त्या शिकण्यास सुरुवात केली. आता त्या पतीच्या मदतीने 37.5 एकर जमिनीवर स्वतः शेती करत आहेत. ललिता या शेती शिकण्यासाठी इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, दुबई येथे जाऊन आल्या आहेत. आज बहुतेक शेतकरी रातोरात जास्त नफा कमावण्यासाठी आपल्या शेतात रसायनांचा वापर करत असताना ललिता यांनी कीटकनाशक विरहित जमिनीवर लाखो रुपये कमावणारी पिके घेतली आहेत.
ललिता यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुनावरा जवळील एका गावात झाला. गावात मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. ललिता या एकुलत्या एक त्यांच्या वडिलांनी शिक्षण दिले आणि आपल्या मुलीला स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहिले. आपल्या मुलीने एका शेतकऱ्याशी लग्न करावे आणि केवळ गृहिणी राहावे असे त्यांच्या वडिलांना कधीच वाटत नव्हते. त्यांच्या वडिलांना आपल्या मुलीला शिक्षण देऊन काहीतरी करायचे होते. पण, परिस्थिती अशी होती की 20 एप्रिल 1996 रोजी ललिताचा विवाह ‘सुरेश मुकाती’ या कृषी विज्ञान पदवीधर यांच्याशी झाला. वेळ निघून गेली आणि वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी ललिता यांच्या पतीने नोकरीऐवजी शेतीची निवड केली.
सेंद्रिय शेतीच्या दिशेने टाकली पावले
त्यांनी संपूर्ण २० एकरमध्ये सीताफळ लागवड करून सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. त्या जेव्हा शेतात उतरल्या तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे आपली जमीन कीटकनाशक मुक्त करणे. ललिता यांनी 2015 पासून त्यांच्या शेतात कीटकनाशके वापरणे पूर्णपणे बंद केले. ललिता यांनी कीटकनाशक मुक्तीचा प्रत्येक शेतकरी सभेत मुद्दा मांडला. यासाठी त्यांना 2018 साली ‘हलधर सेंद्रिय शेतकरी राष्ट्रीय पुरस्कार’ आणि 2019 साली पुसा येथील नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय शेकडो टीव्ही चॅनेल्सवर किसान पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे.
सेंद्रिय शेतीतून लाखोंची कमाई
सेंद्रिय शेती करून मुकाती यांनी प्रति एकर 20 टक्के खर्चासह 80 टक्के नफा कमावला. ललिता यांनी सेंद्रिय शेतीतून लाखोंची कमाई करून विक्रम केला. आणि आज त्यांच्याकडून शिकून त्यांच्याच गावातील शेतकऱ्यांनी हजारो एकरात सीताफळाची लागवड सुरू केली आहे. ज्याचा त्यांना खूप आनंद आहे. हे सर्व करूनही त्यांनी स्वत:ला कुशल शेतकरी मानले नाही. एके दिवशी मजूर व चालक न आल्याने त्यांचे काम ठप्प झाले आणि ट्रॅक्टर चालवायला कुणीही मिळत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी केवळ फावडे कसे वापरायचे हेच शिकले नाही तर ट्रॅक्टर कसा चालवायचा हे देखील त्या शिकल्या. या घटनेनंतर त्यांनी कुणावरही अवलंबवून न राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी शेतात ट्रॅक्टर चालवले तेव्हा पुरुष शेतकरी त्यांना पाहून थक्क झालेत.
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे झाला फायदा
सेंद्रिय शेतीसोबतच अनेक नाविन्यपूर्ण कामेही त्यांनी सुरू केली. त्यात ‘ठिबक पद्धतीने’ सिंचन सुरू केले. त्यांनी जलसंधारण आणि वीज संवर्धनासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या अनोख्या पद्धती शोधून काढल्या. ठिबक सिंचन पद्धतीमुळे 70 टक्के पाण्याची बचत होते. मातीची धूप होत नाही. शेतीचा खर्च कमी होऊन पिकांचे उत्पादन 150 टक्क्यांपर्यंत वाढते. ही पद्धत डोंगराळ किंवा वालुकामय जमिनीत जवळपास सर्वत्र वापरली जाते. ललिता यांनी त्यांच्या शेतात सीताफळाची बाग 20 एकरात, आवळा, सपोटा आणि लिंबाची साडेतीन एकरात लागवड केली आहे. याशिवाय 5 एकरात हळद, 4 एकरात स्थानिक मूग, 2 एकरात स्थानिक गिरनार भुईमूग, 2 एकरात मका, 1 एकरात आले पीक घेत आहेत.
संपर्क :-
ललिता मुकाती
बोरलाय, जि. बड़वानी
ईमेल :- [email protected]