मुंबई : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, राज्यातील काही भागात 16 सप्टेंबरपासून पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला होता. त्यानुसार हळूहळू राज्यात परतीचा पाऊस सुरू झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये जोरदार हजेरी लावली. आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
छ. संभाजीनगर, बीड, अहमदनगर, सातारा, सिंदुधुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.