जगातील 98% अन्न जमिनीतून उत्पादित केले जाते. पिकांची उत्पादकता चांगली येण्यासाठी जमिनीचे आरोग्य उत्तम असणे महत्त्वाचे आहे. अधिक उत्पादन घेण्याच्या स्पर्धेत खतांचा व रसायनांचा अतिरेकी वापर झाल्याने व सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल न राखल्याने आज जवळपास 85% भारतीय जमिनी किमान सेंद्रिय कर्ब मर्यादेच्या खाली गेल्याचे चित्र दिसते. यामुळे उत्पादकता कमी होण्याबरोबरच पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो आहे तसेच पिकांची अजैविक ताणाचा प्रतिकार करण्याची क्षमताही घटली आहे. त्यामुळे शेतीवरील खर्च वाढला पण शेतीमधून मिळणारा नफा मात्र कमी झाला ही वस्तुस्थिती आहे. याच कारणामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविणे हे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठीचे महत्वाचे आव्हान ठरते आहे.
जमिनीचे आरोग्य का खालावले ?
अधिक उत्पादन घेण्याच्या नादात जमिनीच्या शाश्वत उत्पादक क्षमतेसाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे योग्य प्रमाण राखले गेले नाही. जमिनीवर घेतल्या गेलेल्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, पाण्याचे अयोग्य नियोजन, सेंद्रिय खतांचा कमी वापर, दूषित पाण्याचा योग्य प्रक्रिया न करता वापर, रासायनिक कीटकनाशके व तणनाशके यांच्या शिफारसी पेक्षा जादा वापर तसेच सूक्ष्म जीवांना, मित्र किडींना हानिकारक रसायनांचा वापर, सेंद्रिय व असेंद्रिय घटकांचे संतुलन न ठेवणे यासारख्या कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत गेले व सुपीकता घटत गेली. यांचा परिणाम कमी उत्पादन क्षमता व वाढलेला खर्च असा झाला आहे आणि शेतकऱ्यांना अजूनही मातीच्या आरोग्याची योग्य कल्पना न आल्याने जमिनीचे आरोग्य सुधारण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आज आपण अशा ठिकाणी आहोत की भविष्यातील शेती ही फायद्याची करायची असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारणे ही प्राथमिकता असावी.
रूटांझा आणि कंसर्ट जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कशी मदत करतात?
रूटांझा ही मायकोरायझा या बुरशीचे संयुक्त मिश्रण आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रजाती एकत्र केल्या असल्याने विविध प्रकारच्या जमिनी आणि हवामानातही त्याचा फायदा मिळतो. मायकोरायझाचा उपयोग प्रामुख्याने पिकावरील अजैविक ताण कमी करण्यासाठी होतो. त्यामुळे अजैविक ताणामुळे पिकांवर होणारे परिणाम कमी होऊन विपरीत परिस्थितीमध्येही चांगले उत्पादन मिळू शकते आणि विपरीत परिस्थितीमध्ये शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते व इतर रसायनांचा वापर करतात तो कमी झाल्याने जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
कंसर्ट हे जिवाणू संवर्धन युक्त मिश्र जैविक खत असून ते नत्र स्थिरीकरण, फॉस्फेट विघटन तसेच पालाश वहनाचे कार्य करत असल्याने एन. पी. के या तीन महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे प्रमाण रासायनिक खतांच्या माध्यमातून काही प्रमाणात कमी करता येते. शिवाय यामधील उपयुक्त जिवाणू पिकांच्या वाढीस मदत करतात आणि रोग व किडीपासून पिकास संरक्षणही देतात. त्यामुळे रासायनिक खतांचा व औषधांचा वापर कमी होऊन जमिनीचे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होते .रूटांझा आणि कंसर्ट ही दोन्ही जैविक खते शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वापरल्यास जमिनीचे खालवलेले आरोग्य हळूहळू सुधारण्यास मदत होते. यामुळे या दोन्ही घटकांचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर विविध पिकांसाठी करणे आवश्यक आहे.
रूटांझा आणि त्याचे जमिनीचे आरोग्यावरील व पिकांवर होणारे परिणाम :
मायकोरायझा जैविक खत:
मायकोरायझमध्ये एन्डो मायकोरायझा व एक्टो मायकोरायझा असे दोन प्रमुख प्रकार आहेत. यामध्ये एन्डो मायकोरायझा हा लागवडीखालील घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांच्या मुळावर सहयोगी पद्धतीने वाढतो. यालाच व्हॅम असेही म्हणतात. बदलत्या वातावरणामुळे पिकांवरील अजैविक ताण वाढल्याने उत्पादकता व गुणवत्ता प्रभावित होते हा ताण कमी करण्याचे व जमिनीतील मुळांना सहज उपलब्ध न होणाऱ्या अन्न घटकांची व पाण्याची उपलब्धता करून देण्याचे महत्त्वाचे काम मायकोरायझा ही उपयुक्त बुरशी करते. या बुरशीचे संयुक्त मिश्रण म्हणजे रूटांझा शेतकऱ्यांसाठी ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने उपलब्ध करून दिले आहे. रूटांझामध्ये मायकोरायझाचे सुदृढ स्पोर्स, नैसर्गिकरित्या उपलब्ध फाइटो कंपाऊंड, स्टॅबिलाइड ह्युमिक आम्ल व लेव्होरोटरी अमिनो ऍसिडयुक्त घटक काळजीपूर्वक प्रक्रियेने बेंटोनाइट मध्ये मिश्रण करून पिकाच्या वाढीसाठी मिसळलेले आहेत. ग्लोमसइंटराडीसेस (रायझोफॅगसइररेग्यूलॅरीस) व इतर एन्डो मायकोरायझा जे पिकाला अन्न घटकाचे शोषण वाढीस व अवर्षण, क्षारांचे वाढलेले प्रमाण यामुळे येणाऱ्या ताणासाठी पिकांची सहनशीलता वाढवण्यास मदत करत असून रूटांझा पर्यावरण पूरक आहे. प्रत्येक चार किलो रूटांझा मध्ये 200 ग्रॅम कार्यशील मायकोरायझा व प्रतिग्राम 60 स्पोर्स आणि 1200 आईपी /ग्राम इंफेक्टिव्हिटी पोटेन्शियल आहे.
कंसर्ट आणि त्याचे जमिनीचे आरोग्यावरील व पिकांवरील होणारे परिणाम :
हवेमध्ये 79 टक्के नत्र असतो पण पिकांना तो वापरता येत नाही पण नत्र स्त्रीकरण करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्टेर, रायझोबियम, ऍसिटोबॅक्टर, ऍझोस्पेरिलियम हा नत्र जमिनीमध्ये स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम करतात. याच्या वापराने जवळपास 30 की/ हे एवढा नत्र पिकाला मिळू शकतो म्हणजेच रासायनिक खतांच्या माध्यमातून दिला जाणारा नत्र या प्रमाणात कमी करता येतो. रायझोबियमचे जिवाणू पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये वास्तव्य करून नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात व म्हणून रायझोबियमच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या पिकांमध्ये वापराव्या लागतात.
कंसर्ट मधील फॉस्फेटची उपलब्धता वाढवणारे जिवाणू फॉस्फेट ची 30% पर्यंत पिकासाठी उपलब्धता वाढवतात. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर 30% कमी करता येतो. यामधील पालाश वहन करणारे जिवाणू जमिनीतील उपलब्ध पालाशचे प्रमाण वाढवून त्याची पिकाला उपलब्धता करून देतात. अनेक पिकांची पालाशची गरज जास्त असल्याने तसेच पिकांच्या गुणवत्तेसाठी व काढणीनंतर नुकसान टाळण्यासाठी पिकांची पोटॅशिअमची गरज भागवणे हे कंसर्टचे प्रमुख कार्य आहे. कंसर्टमध्ये विविध प्रकारचे जिवाणू एकत्र केले असल्याने पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून तर काढणीपर्यंत त्याचा लाभ मिळून या जिवाणूंची संख्या जमिनीत वाढून जमिनीचे आरोग्य सुधारते. बियाणे प्रक्रिया अधिक सुलभ व्हावीव बियाणे उगवणी पासूनच पिकाला या जिवाणूंचा फायदा मिळावा म्हणून खत बियाणे प्रक्रिया करण्यासाठी कंसर्ट ग्रीन या जैविकाचा वापर शेतकऱ्यांनी करावा.
रूटांझा व कंसर्टचा वापर कसा करावा ??
रूटांझा आणि कंसर्ट ही प्रामुख्याने जैविक खते आहेत. त्यामुळे पिकासाठी अन्नद्रव्य उपलब्धता वाढविणे हे त्यांचे मुख्य कार्य असले तरी त्यांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीतील अनुउपलब्ध अन्नघटक पिकांसाठी उपलब्ध करून दिल्याने रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. तसेच पीक रोग व कीड याचा प्रादुर्भाव कमी करण्यात व संरक्षणासाठी मदत मिळते. म्हणून त्याचा वापर जमिनीत होणे आवश्यक आहे. याचा वापर बीज प्रक्रिया, आळवणी, रोपांची मुळे तसेच पूर्णपणे कुजलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतात योग्य प्रमाणात मिसळून शेतात विखरून देता येते. याचे प्रमाण रूटांझा ग्रॅन्युअल्स एकरी ४ किलो व कंसर्टचे प्रमाण एकरी १ लिटर जमिनीतून देण्यासाठी तर बीज प्रक्रियेसाठी १० ml / किलो, आळवणीसाठी १० मिली/ लिटर प्रमाणे देता येते.
रूटांझाची भुकटी एकरी फक्त १०० ग्रॅम प्रमाणे ड्रीपद्वारे देता येते. या सर्व जिवाणू खतांचे जैविक स्वरूप ध्यानात घेता त्याचा वापर पिकाची पेरणी किंवा लागवडीच्या वेळी अधिक फायदेशीर आहे. रूटांझा मधील मायकोरायझा हा अधिक प्रमाणात व अधिक सामू असलेल्या जमिनीत राहतो म्हणून त्याच्या वापराचे प्रमाण वाढविणे बदलत्या वातावरणात आवश्यक आहे.
संपर्क : डॉ. सतीश भोंडे,
ॲग्रीसर्च (इंडिया) प्रा. लि., नाशिक
9822650661