पुणे : कृषी व शेतकरी कल्याण विभाग आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती बद्दल विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील पुणे येथील यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यावेळी कार्यशाळेत एकात्मिक पोषण व्यवस्थापनाच्या उपसचिव रचना कुमार, सहसचिव योगिता राणा, आत्माचे कृषी संचालक दशरथ तांबाळे सोबत राज्यातील चार कृषी विद्यापीठांची कुलगुरू, केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकारी, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, दादरा व नगर हवेली, दिव व दमण आणि लक्षद्वीप या राज्यातील शेतकरी सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपले मत व्यक्त केले. केंद्र शासनाकडून देशात नैसर्गिक शेती करण्याविषयी धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत असून राज्यातही ते धोरण अवलंबिण्यात येत आहे. नैसर्गिक शेती संदर्भातील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना मराठी भाषेत भाषांतर करण्यात येतील. परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
ही आहेत जगातील सर्वात महाग फळे