ओम गायत्री नर्सरी आपल्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भाजीपाला रोपे निर्मितीसाठी जगप्रख्यात आहे. सध्या भाजीपाल्याचा नवीन हंगामाची सुरुवात होत असताना आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील अनेक भागातून शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणात रोपांची मागणी वाढताना दिसत आहे.
रोपे निर्मितीसाठी ओम गायत्री नर्सरी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत बियाण्याची योग्य प्रकारे लागवड करणे, रोपांचे संगोपन काटेकोर पद्धतीने करणे, रोग व कीड विरहित रोपे तयार करणे व योग्य कालावधीचे रोपे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देणे व हे रोपे उच्च दर्जाचे असतीलच सोबत ते शेतकऱ्यांना परवडणारे असावे हाच ओम गायत्री नर्सरीचा प्रमुख उद्देश आहे.
भाजीपाला रोपे तयार करणे सोबतच ओम गायत्री नर्सरी भाजीपाला कलम रोपे तयार करण्यातही अग्रेसर आहे. अनेक शेतकऱ्यांना मर रोग व सूत्रकृमी समस्या भेडसावत आहे. सध्या जमिनी अश्या झाल्या आहेत की उत्पन्न तर नाहीच पण साधं भाजीपाला रोप सुद्धा तग धरू शकत नाही, एवढ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या समस्येला उपाय म्हणून भाजीपाला कलम रोपे चांगला पर्याय ठरत आहे.
उपलब्ध भाजीपाला रोपे : टोमॅटो, वांगी, मिरची, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, कारले, भोपळा, दोडका, शेवगा, ऊस.
फळ झाडे: कलिंगड, खरबूज,स्ट्रॉबेरी, पपई, डाळींब, केळी, द्राक्ष.
शोभिवंत रोपे: झेंडू, शेवंती.
रोपे निवडा दमदार !
पीक येईल जोमदार !!
भाजीपाला रोपे वेळेत उपलब्ध होण्यासाठी आजच ओम गायत्री नर्सरीला संपर्क साधा.
रोपे बुकिंगसाठी संपर्क: 7507771631 / 32 / 33 / 34.
पत्ता : ओम गायत्री नर्सरी, उगाव ता: निफाड, जि: नाशिक- 422304.


















