ॲग्रो केमिकल कंपनी धानुका ॲग्रिटेकने ‘लानेव्हो’ हे नवीन कीटकनाशक आणि ‘मायकोर सुपर’ हे बायो-फर्टिलाइजर बाजारात आणले आहे. उत्तम पीक संरक्षण आणि शेतीमध्ये उत्पन्न वाढीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी ही उत्पादने तयार केल्याचा दावा कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल धानुका यांनी केला.
मायकोर सुपर हे जैव खत नाशिकसह तिरुपती आणि बेंगळुरूमध्ये लाँच केले गेले. येत्या काही दिवसांत ते देशाच्या इतर भागातही लॉन्च केले जाणार आहे.
लानेव्हो हे जपानच्या निसान केमिकल कॉर्पोरेशनसोबत भागीदारीत विकसित करण्यात आले आहे. हे शक्तिशाली आणि ब्रॉड-स्पेक्ट्रम कीटकनाशक जॅसिड, थ्रिप्स, व्हाईटफ्लाय, बोअरर्स आणि लीफहॉपर्ससह बहुतांश कीटकांचे प्रभावीपणे नियंत्रण करते. शोषक आणि चघळणारे अशा दोन्ही कीटकांना लक्ष्य करून, लानेव्हो शेतकऱ्यांना पीक नुकसानीवर चांगले नियंत्रण प्रदान करते, असा कंपनीचा दावा आहे.
‘लानेव्हो’ विशेषतः भाजीपाला शेतकऱ्यांसाठी
या दोन उत्पादनांच्या लाँचच्या वेळी, राहुल धानुका म्हणाले की, या दोन महत्त्वाच्या निविष्ठा शाश्वत शेतीसाठी नवीन उपाय उपलब्ध करून देण्याची धानुकाची वचनबद्धता अधोरेखित करतात. नवीन कीटकनाशक ‘लानेव्हो’ विशेषतः भाजीपाला शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.
कीटक नियंत्रित करण्याची चांगली क्षमता
कंपनीचे कार्यकारी संचालक हर्ष धानुका यांनी नवीन उत्पादन आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, कीटकनाशक कायदा, 1968 च्या कलम 9(3) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवीन कीटकनाशकाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. जपानच्या निसान केमिकल कॉर्पोरेशनच्या धोरणात्मक सहकार्याने लाँच केलेले, हे नवीन उत्पादन कीटकांवर अनोख्या पद्धतीने नियंत्रण करते, जे पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या कीटकांपर्यंत पोहोचते आणि कीटकांमध्ये प्रतिकारशक्तीचा विकास कमी करते.
मिरची, टोमॅटो आणि वांगी पिकांवरील किडींचा खात्मा
लाँच प्रसंगी, निसान केमिकल, जपानचे महाव्यवस्थापक वाय. फुकागावा सान म्हणाले, की लानेव्हो भाजीपाला शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. हे कीटकांमधील प्रतिकारशक्तीच्या विकासावर मजबूत नियंत्रण ठेवते आणि कीटकांना लपण्याची जागा असलेल्या पानांच्या खालच्या भागाचे संरक्षण करते. हे शक्तिशाली उत्पादन शेतकऱ्यांनी मिरची, टोमॅटो आणि वांगी पिकांवर कीड दिसताच उत्तम परिणामांसाठी वापरायालाच हवे.
पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती