उष्णतेच्या लाटेचा देशातल्या गहू पिकावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे. सध्याची वाढलेली उष्णता आणि कमाल तापमानात वाढ झाल्याचा कापणीसाठी तयार गव्हाच्या पिकावर कोणताही परिणाम होणार नाही, असं आयएमडी महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं.
सध्या मध्य प्रदेशात तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे, पुढील आठवड्यात ते 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील 90 टक्के गव्हाची काढणी संपली असल्याने उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. तापमान 35 अंशांच्या वर गेलं तरी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातसुद्धा गव्हावर कोणताही परिणाम होणार नाही, असं महापात्रा म्हणाले.
देशात सर्वाधिक 30 टक्के इतकं गहू उत्पादन उत्तर प्रदेशात होतं. त्याखालोखाल मध्य प्रदेशात 20 टक्के, पंजाबमध्ये 15 टक्के आणि हरियाणा-राजस्थानमध्ये प्रत्येकी 10 टक्के इतकं गहू उत्पादन होतं. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत देशाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्याचा या गहू उत्पादक पट्ट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती हवामान खात्यानं खोडून काढली.
- 🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
- 🐐 अॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
- ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणार…
- ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 18 मे (शनिवारी) रोजी उपलब्ध… (अवकाळी पाहता कदाचित हंगामातील शेवटची गाडी…)
- ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा