• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘क्लायमेट कंट्रोल’ने एकरी 200 टन ऊस उत्पादन

जैन हिल्सवरील प्लॉटमध्ये 42 डिग्री तापमानात लागवड, हाय-टेक पद्धतीने मिळवा उसाचे बंपर उत्पादन; जाणून घ्या चांगल्या शेती पद्धती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2024
in इतर
0
‘क्लायमेट कंट्रोल’ने एकरी 200 टन ऊस उत्पादन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

या लेखातून आपण उसाच्या हाय-टेक शेतीबद्दल माहिती घेणार आहोत. जैन हिल्स कृषी महोत्सवात अनेक शेतकऱ्यांनी इथे उसाचे प्रात्यक्षिक लावलेले बघितले आहे. जगामध्ये जर आपण बघितले तर 260 लाख हेक्टर क्षेत्रात उसाची शेती होते. जगामध्ये दोन देश असे आहेत, ज्या देशात सर्वाधिक क्षेत्र उसाखाली आहे. त्यातील एक म्हणजे ब्राझील आणि दुसरा भारत आहे. दोन देशांचे मिळून क्षेत्र एकूण 110 लाख हेक्टर इतके आहे.

आता जगाच्या बाबतीत उत्पादकता ही 30 ते 35 टनाची आहे. भारतात जर बधायचे झाले तर 55 लाख हेक्टर क्षेत्र उसाचे आहे. भारताची उत्पादकता ही 30 ते 35 टनाची आहे. जगाची उत्पादकता आणि भारताची उत्पादकता सारखीच आहे. त्यानंतर महाराष्ट्रात साढे चौदा लाख हेक्टर क्षेत्र उसाचे आहे. आपल्या राज्यात उसाची उत्पादकता ही एकरी 30 ते 35 टनाची आहे. उसाचे सर्वांत जास्त क्षेत्र हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशात 23 ते 25 लाख हेक्टर क्षेत्र उसाचे आहे आणि उसाची उत्पादकता ही 30 ते 32 टनाची आहे.

भारतात होणारी उसाची शेती पारंपरिक पद्धतीची आपल्या राज्यातसुद्धा उसाचे उत्पादन आस्त आहे. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 95 ते 100 लाख क्विंटलपर्यंत आहे. बरीचशी भारतातील जी ऊस शेती आहे, ती साधारण सारखीच आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, ओडिसा आणि तामिळनाडू या सर्व राज्यांमध्ये उसाची शेती ही पारंपरिक पद्धतीची आहे.

 

 

भरमसाठ पाणी वापराने 30 ते 35 टक्केच कार्यक्षमता

पारंपरिक शेती म्हणजे लागवडीच्या सर्वच पद्धती पारंपरिक आहेत. ऊस लागवडीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची कार्यक्षमता ही 30 ते 35 टक्क्यांपर्यंतची आहे. जेव्हा सर्व घटकांची कार्यक्षमता ही 30 ते 35 टक्क्यांपर्यंत मिळते, तेव्हा उत्पादनसुद्धा निश्चितपणे कमी मिळणार आहे. आपल्याला ऊस पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर ऊस पिकाची ओळख असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय गैरसमज आहे की या पिकाला पाणी खूप लागते. म्हणून मग या गैर समजतीतून शेतकरी ऊस लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंत सरी भरून तुडुंब पाणी देतात. त्यांची मानसिकता वर्षानुवर्षे तशी झाली आहे. जोपर्यंत तो सरी फुल्ल भरून पाहत नाही, तोपर्यंत त्याचे समाधान होत नाही.

ऊस पिकाला पाणी नव्हे सूर्यप्रकाश महत्त्वाचा

वास्तविक पाहता आपण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला, तर ऊस पीक हे वनस्पती शास्त्रामध्ये सीफोर प्लांट म्हणून आहे. सीफोरमधील जी पीके आहेत, त्यांची वैशिष्ट्य अशी की, इतर पिकांपेक्षा ही पीके सूर्य प्रकाशाचे अतिशय कार्यक्षमपणे वापर करतात. यामुळे उसाचे उत्पादन जास्त मिळते. म्हणून आपल्याला मानसिकता बदलली पाहिजे. ऊसाला जास्त पाणी देण्याची गरज नसून सूर्यप्रकाशाची जास्त गरज आहे.

सरीतील अंतर 5 फूट हवे

पारंपरिक शेतीत सर्वात प्रथम सरीचे अंतर हे अडीच फूट होते. त्यावरून लोक तीन फुटावर यायलासुद्धा कचरत होते. आता त्यांच्या लक्षात येत आहे की, त्या अंतराने उत्पादनात वाढ होत आहे. आता आम्ही शेतकऱ्यांना सांगतोय की, सरीतील अंतर हे पाच फूट ठेवा. अंतर जेवढे जास्त ठेवले तरी देखील उत्पादन कमी होणार नाही. म्हणून लागवडीचे अंतर हे किमान पाच फूट असले पाहिजे.

 

 

बेण्यांऐवजी रोपाची लागवड करणे फायद्याचे

ऊसाची लागवड करताना बेण्यांची लागवड न करता रोपांची लागवड केली पाहिजे. बेण्यांची लागवड केल्यावर उगवणीस वीस ते पंचवीस दिवस लागतात. इथे तुमची रोपे तयार असतात. उगवण झालेली असते. त्यामुळे उसाची अपेक्षित संख्या आपल्याला मिळून जाते. म्हणून आपल्याला बेण्यांपेक्षा रोपांची लागवड केली पाहिजे. ज्यांना 100 टन उसाचे उत्पादन घ्यायचे असेल, त्यांनी ठिंबक सिंचनचा वापर करणे गरजेचे आहे.

लागवडीची दिशा उत्तर-दक्षिण असली पाहिजे

उसाच्या लागवडीची दिशा ही नेहमी उत्तर- दक्षिण असली पाहिजे. लागवड करताना जमिनीची मशागत चांगली केली पाहिजे. उसाचे पीक चौदा महिन्यांनी हार्वेस्टिंगला येते. पूर्व हंगामी पीक असेल तर त्याला 14 ते 18 महिन्यांनी ऊस लागणार आहे. म्हणून लागवड करताना घाई करू नये. जमिनीची पूर्व मशागत व्यवस्थित करा, नांगरणी, वखरणी करा. त्यानंतर तुम्ही ट्रिलर किंवा रोटाव्हेटरचा उपयोग करू शकता. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर सरी काढायची आहे. सरी आपण रिचरने काढू शकता. यात दोन सरीतील अंतर हे पाच फूट ठेवायचं आहे.

इनलाईन ठिबकचा प्रयोग

सरी काढल्यानंतर आपल्याकडे शेणखत उपलब्ध असेल, तर संपूर्ण शेतात ते पसरवा आणि रोटाव्हेटर फिरवा. चांगले कुजलेले शेणखत जर आपल्याकडे कमी असेल, तर फक्त सरीमध्येच शेणखत टाकावे. त्यानंतर आपण ठिबक सिंचनची उभारणी करायची आहे. उसाकरिता आपल्याला इनलाईन ठिबकचा वापर करायचा आहे. यानंतर तुम्ही दोन ड्रीपरमधील अंतर हे सव्वा फूट ठेवा. ड्रीपरचा डिस्चार्ज हा चार लिटर ठेवला पाहिजे. नळ्या पसरल्यानंतर खुंटीला बांधा आणि जमीन वापसा वाफेमध्ये आणून घ्या. वापसा अवस्थेत आणण्याआधी बेसल डोस द्यायचा आहे.

 

एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी

ज्यांना एकरी शंभर टन ऊसाचे उत्पादन घ्यायचे आहे, त्यांनी बेसल डोसच्या एकरी दोन बॅगा 10-26-26 च्या, 15 किलो मॅग्निशियम सल्फेट, 10 किलो गंधक, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट, 2 किलो मॅगनीस सल्फेट, तीन किलो बोरॅक्स आणि पन्नास किलो चांगले कुजलेले शेणखत असेल, ते त्यात मिसळायचे. ज्याच्यात आपल्याला एक डोळा पद्धतीचे बेणे लावायचे असेल, त्या ठिकाणी थोडेथोडे टाकले पाहिजे.

डबल ड्रिप लाईनमुळे मुळांचा पूर्ण घेर कव्हर

लागवडीनंतर उगवण झाल्यावर एक आठवड्यानंतर फर्टिग्रेशन हे रेग्युलर करायचे आहे. दर चौथ्या दिवशी फर्टिग्रेशन करणे आवश्यक आहे. उसाची मुळे ही तंतूमय असल्यामुळे एकच नळी वापरून चालणार नाही. एकाच बाजूने पाणी दिल्याने एकाच बाजूची मुळे जास्त भिजतात. म्हणून ऊसासाठी डबल ड्रिप लाईन वापरली पाहिजे. डबल ड्रीप लाईन वापरल्यामुळे उसाच्या मुळांचा पूर्ण घेर कव्हर होतो. त्यामुळे खताचे आणि पाण्याचे अचूक नियोजन करता येते.

 

तीन हंगामात उसाची लागवड

उसाची लागवड ही एकूण तीन हंगामात होत असते. एक आडसाली लागवड असते, दुसरी पूर्व हंगामी असते आणि तिसरी सुरू हंगामी असते. आडसाली हंगामातील लागवड ही जुलै-ऑगस्टमध्ये होते, पूर्व हंगामी लागवड ही ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये होते. सुरू हंगामी लागवड जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होत असते. आडसाली लागवडीचा ऊस 17 ते 18 महिन्यात येतो. साधारणतः पूर्व हंगामातील ऊस 14 ते 15 महिन्यात हार्वेस्टिंगला येतो. सुरू हंगामातील ऊस हा 12 ते 13 महिन्यात हार्वेस्टिंगला येतो.

 

जैन’ने 42 डिग्री तापमानात करून दाखवली लागवड

एप्रिल, मे आणि जून या महिन्यात जळगावातील तापमान जवळपास 40 ते 47 डिग्रीपर्यंत जाते, ज्या दिवशी आम्ही जैन हिल्स प्लॉट वर ऊसाची लागवड केली, त्या दिवशीचे तापमान 42 डिग्री इतके होते. इतक्या गरम तापमानात आम्ही उसाची लागवड केली. परंतु उसासाठी इथे आम्ही वेगळे तंत्रज्ञान वापरले आहे. नुसते ठिबक सिंचनवर न थांबता एकरी 200 टनाचे उत्पादन काढण्यासाठी क्लायमेट कंट्रोल केले पाहिजे. म्हणून मग क्लायमेट कंट्रोल करण्यासाठी आम्ही जैन एक्चिविरेंट 5022 ओव्हर हेड स्प्रिंकलरचा वापर केला आहे. कारण तापमान 38 डिग्रीच्या वर गेले तर उसाची मुळे पाणी शोषण कमी करतात. त्यामुळे उसाची वाढ मंदावते. उसाची लांबी देखील आखुडते.

 

ओव्हर हेड स्प्रिंकलर वापरातून आर्द्रता निर्मिती

ओव्हर हेड स्प्रिंकलरचा वापर दररोज दहा ते पंधरा मिनिटे करावा. त्यामुळे पन्नास ते साठ टक्के आर्द्रता निर्माण होईल आणि पाच ते सात डिग्री तापमान कमी होईल. त्यामुळे ऊसाची मुळे पाण्याचे शोषण वेगाने करतील. ओव्हर हेड स्प्रिंकलरचा दुसरा फायदा असा की, उसावर जर पांढरी माशी किंवा इतर काही रोगराई आली तर कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी करणे शक्य नसते, तेव्हा ओव्हर हेड स्प्रिंकलरचा उपयोग केला जाऊ शकतो.

कोरड्या जमिनीत उसाची लागवड करू नका

बेणे लावताना ज्या ट्रेमधून बेणे किंवा रोप आणले आहे, त्या ट्रेमधून रोप काढायचे आणि ज्या उंचीचा कप असेल तेवढा खड्डा तुम्हाला करायचा आहे. सरीमध्ये रोप ठेवायचे आहे. कोणतेही रोप आपल्याला लावायचे असेल तर आधी जमीन वापसा अवस्थेत आणून घ्यायची आहे. कोरड्या जमिनीत उसाची लागवड करू नका. लागवड केल्यानंतर त्याला हळूच मातीने झाका आणि त्याला बोटाने थोडे दाबून द्या, जेणेकरून बियाण्याला हवा लागणार नाही.

– डॉ. बी. डी. जडे वरिष्ठ कृषी विद्याशास्त्रज्ञ, प्रमुख कृषी विस्तारक आणि प्रशिक्षक, जैन इरिगेशन, जळगाव

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कृषी यंत्रे भाड्याने देण्याच्या व्यवसायातून लाखोंचा नफा
  • कापसाला येथे मिळतोय 8200 रुपये प्रतिक्विंटल दर ; वाचा बाजारभाव

Share this:

  • Facebook
  • X
Tags: ऊस उत्पादनजैन हिल्सहाय-टेक शेती
Previous Post

कृषी यंत्रे भाड्याने देण्याच्या व्यवसायातून लाखोंचा नफा

Next Post

देवगड हापूस प्रतीक्षा संपली… जळगावला 6 एप्रिल (शनिवारी) तर नाशिकमध्ये 5 एप्रिलला (शुक्रवारी) गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध

Next Post
देवगड हापूस प्रतीक्षा संपली....

देवगड हापूस प्रतीक्षा संपली... जळगावला 6 एप्रिल (शनिवारी) तर नाशिकमध्ये 5 एप्रिलला (शुक्रवारी) गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.