मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय 31 मार्च 2024 पर्यंत राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याआधीच म्हणजे दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये कांदा पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात कांदा निर्यातीवरील बंदी उठवली. दरम्यान, केंद्र सरकारने बांगलादेश आणि युएई ला कांदा निर्यात करण्याची मान्यता दिली आहे.
इतक्या टन कांद्याची होणार निर्यात
केंद्र सरकारने युएई आणि बांगलादेशला कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. युएई आणि बांगलादेशला नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड मार्फत कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार बांगलादेशला 64,400 टन तर युएई 14,400 टन कांदा निर्यात केला जाणार आहे. तसेच यासाठी वाणिज्य मंत्रालयाला केंद्र सरकारच्या वतीने अधिसूचना देखील जारी केली आहे.
देशातील बाजारात कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी गेल्यावर्षी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. पण केंद्र सरकारने त्याआधीच कांदा निर्यातबंदी उठवली. केंद्र सरकारने फेब्रुवारीच्या अखेरीस बांगलादेश श्रीलंका नेपाळ आणि भूतान या देशांमध्ये कांदा निर्यातीला मान्यता दिली. तसेच इतर काही देशांना देखील कांदा निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यात मॉरिशस आणि बाहरीन इत्यादींचा समावेश आहे.
तसेच कांद्याला आज कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे जाणून घेणार आहोत. बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे..
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा (5/3/2024) |
|||
खेड-चाकण | क्विंटल | 175 | 1700 |
पुणे | क्विंटल | 18308 | 1200 |
पुणे -पिंपरी | क्विंटल | 6 | 1600 |
कांदा (4/3/2024) | |||
येवला | क्विंटल | 14000 | 1650 |
येवला -आंदरसूल | क्विंटल | 5000 | 1750 |
अमरावती | क्विंटल | 450 | 1300 |
लासलगाव | क्विंटल | 10050 | 1751 |
लासलगाव – निफाड | क्विंटल | 2850 | 1720 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 11900 | 1700 |
जळगाव | क्विंटल | 1072 | 1202 |
मालेगाव-मुंगसे | क्विंटल | 10000 | 1550 |
नागपूर | क्विंटल | 2000 | 1875 |
सिन्नर – नायगाव | क्विंटल | 295 | 1700 |