मुंबई : देशातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. दम्यान, तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या पद्धतींद्वारे पीएम किसानची शिल्लक तपासू शकता.
पीएम किसानचा 16 हप्ता कधी मिळणार ? याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर यवतमाळमध्ये काल (दि. 28) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 21 हजार कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच हा हप्ता देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे.
PM किसानचा खात्यात आला की नाही ? असे करा चेक
तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पीएम किसानच्या ( https://pmkisan.gov.in/ )
अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. यानंतर तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर ‘गेट स्टेटस’ वर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंटची स्थिती दिसेल.
पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर तुम्हाला बँक, सरकारकडून एक मेसेज येतो. ज्यामध्ये तुम्हाला 2 हजार रुपये हस्तांतरित झाल्याची माहिती येते. जर काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमच्या भागातील जवळच्या एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट देखील घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक एन्ट्री करा. यानंतर तुमच्या खात्यात पीएम किसान हप्त्याची रक्कम ट्रान्सफर झाली की नाही हे समजेल.