सन 2024 मध्ये तब्बल 44 सरकारी दिनविशेष कार्यक्रम आहेत. 2024 साठी राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच जारी केले आहे.
शासनाच्या दिनविशेष कॅलेंडरमध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रकात नमूद आहे.
परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात नमूद आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे
- कापसाला जळगाव बाजार समितीत मिळतोय असा दर