पंजाबमधील शेतकऱ्यांनी पेन्शन, हमीभाव (एमएसपी), कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. संयुक्त किसान मोर्चा आक्रमक झाला असून चंदीगडमधील राजभवनावर ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्त्वात, रविवापासून चंदीगड-मोहाली सीमेवर 3 दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. पेन्शन, एमएसपी हमी, कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
केंद्र सरकारकडून एमएसपीसाठी हमीभाव मिळावा, रद्द झालेल्या शेती कायद्यांविरोधात वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी, आदी मागण्या संयुक्त किसान मोर्चा करत आहे. शेतकऱ्यांनी पिकांचा कचरा जाळल्याबद्दल नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याचीही मागणी आहे.
चंदीगड-मोहाली सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली
पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. रविवारी मोहाली-चंदीगड सीमेवर सुरू झालेली निदर्शने सोमवारीही सुरू राहतील. गुरुपर्व उत्सवानंतर, चंदीगडमधील राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चा (SKM) या संघटनेत पंजाब आणि इतर राज्यांतील शेतकरी संघटनांचा समावेश आहे. शेतकरी आंदोलनामुळे चंदीगड-मोहाली सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
लुटारू कार्पोरेट उद्योगांना कर्जमाफी, शेतकरी वाऱ्यावर
“कॉर्पोरेट उद्योग देशाला लुटत आहेत आणि त्यांचे लाखो-करोडो रुपयांचे कर्ज माफ केले आहे, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज मार्ग केले जात नाही. हे कर्जाचे सापळे आमच्या शेतकरी मित्रांना आत्महत्येकडे प्रवृत्त करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज लवकरात लवकर माफ करण्यात यावे,” अशी मागणी संयुक्त मोर्चाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेही असेच वचन दिले होते आणि काही राज्य सरकारांनीही अशीच वचनबद्धता केली होती, असे शेतकरी निदर्शकांनी सांगितले.