जळगाव : कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (3 नोव्हेंबर) होईल. शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन मोफत असून 210 हून अधिक स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.
कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार…
इलेक्ट्रिक बुल, करार शेती, ड्रोन, झटका मशीन, मिल्किंग मशीनसह प्रदर्शनाची वैशिष्ट्ये….
बियाणे पेरणी, कोळपणी, फवारणी करण्याबरोबरच जीपीएस तंत्रावर चालणारा तसेच मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रीक बैल, ड्रोन यांसारखी यंत्रे व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळभाज्या – भाजीपाला, बांबू अशा अनेक प्रकारच्या करार शेतीची माहिती देणार्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, मोबाईल स्टार्टर, मिल्किंग मशीन, काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
अॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे नववे तर अॅग्रोवर्ल्ड सिरीजमधील 18 वे कृषी प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी प्रदर्शनाला भेट देतील, असा अंदाज आहे.
प्रदर्शनाची तारीख व ठिकाण विसरू नका… 3 ते 6 नोव्हेंबर, एकलव्य क्रीडा संकुल, एमजे कॉलेज कॅम्पस, जळगाव
(वेळ – स. 10 ते सायं. 7 वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी –
9175040173
9175060174
https://www.eagroworld.in🌱