आज असे एक फळ सांगणार आहोत, जे आहे जगातील सर्वात महाग फळ. त्याची किंमत इतकी जास्त आहे, की त्यात तुम्ही 30 तोळे सोने खरेदी करू शकाल! हे फळ म्हणजे खरबुजाचाच एक प्रकार आहे. जगात या फळाचे उत्पादन फक्त जपानमध्ये होते. तेही फक्त जपानच्या रका बेटावरील, एका शहरातच.
आपण ज्या खरबूज फळाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे युबरी किंग मेलन. असे म्हटले जाते, की हे जगातील सर्वात महाग फळ आहे. हा जपानी खरबूजाचा (डांगर) एक प्रकार आहे. त्याची लागवड फक्त जपानमध्ये केली जाते. युबारी खरबूजाची लागवड फक्त जपानच्या होक्काइडो बेटावर असलेल्या युबारी शहरातच केली जाते. त्यामुळे याला युबरी खरबूज आणि पुढे फळांचा खरा राजा म्हणून युबरी किंग असे नाव पडले. युबरी शहराचे वातावरण या फळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फक्त सहा महिने होऊ शकते लागवड
युबरी किंगची वर्षभर लागवड होत नाही. त्याचे उत्पादन फक्त ऑक्टोबर ते मार्च महिन्यातच होते. त्याची लागवड देखील वेगळ्या पद्धतीने केली जाते. या खरबुजाच्या शेतात विविध प्रकारची नैसर्गिक खते वापरली जातात. यामुळे युबरी किंग फळावर बरेच दिवस कोणत्याही रोगराईचा काहीही परिणाम होत नाही.
रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे पोटॅशियमयुक्त फळ
खरबूज खायला सर्वांनाच आवडते. आपल्या नेहमीच्या खरबुजामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय हृदयाशी संबंधित अनेक आजार बरे होतात. त्यामुळेच बाजारात साध्या खरबुजालाही नेहमीच मागणी असते. एप्रिल ते मे या कालावधीत हे फळ बाजारात सहज उपलब्ध होत असते. त्याचा दरही साधारणतः 50 ते 60 रुपये किलो असा आवाक्यात असतो; पण आज आपण खरबुजाच्या ज्या प्रकाराबद्दल बोलत आहोत, त्याची गणना जगातील सर्वात महाग फळांमध्ये केली जाते. त्याची किंमत हजारात नाही तर लाखात आहे. या किमतीत तुम्ही आलिशान लक्झरी कार खरेदी करू शकता. त्यात तुम्ही 30 तोळे सोने खरेदी करू शकता.
लिलावात 18 लाख रुपयांना गेले एकच फळ
युबरी खरबुजासाठी ‘अमृत’ म्हणून काम करणाऱ्या युबरी शहरातील दिवसा आणि रात्रीच्या तापमानात बराच फरक आहे. असे म्हटले जाते, की दिवसा आणि रात्रीच्या तापमानात जितका जास्त फरक असेल तितका खरबूज गोड आणि चवदार असेल. युबरी किंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमीच्या फळांप्रमाणे बाजारात विकले जात नाही. त्याचा लिलाव केला जातो. 2022 मध्ये युबरी किंगचा 20 लाख रुपयांना लिलाव झाला होता. तर 2021मध्ये फक्त एकच फळ 18 लाख रुपयांना विकले गेले. याचा अर्थ भारतात त्या र्का फळाच्या किंमतीत 30 तोळे सोने खरेदी करता येऊ शकते.
फक्त श्रीमंत लोकच खातात हे फळ
युबरी किंग हे संक्रमण विरोधी फळ आहे. अशा स्थितीत याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पोटॅशियम व्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम देखील त्यात भरपूर आढळतात. त्यामुळेच बाजारात त्याला मोठी मागणी आहे; पण उत्पादन अत्यंत मर्यादित असल्याने जगातील श्रीमंत लोकच फक्त ते खाऊ शकतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- रिटर्न मान्सून 25 सप्टेंबरपासून; राज्यातून 13 ते 18, तर संपूर्ण देशातून 20 ऑक्टोंबरपर्यंत माघार शक्य
- सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत