मुंबई : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. नुकताच या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. देशातील 8.5 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. आता या योजनेत महत्त्वाचा बदल होणार असल्याची माहिती समोर आली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केले जातात. या योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
हा बदल होणार
यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होत असून पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. यामुळे आता केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा बदल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येता. दरम्यान, आता या योजनेतील हप्ता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर या योजनेचा हप्ता वाढला तर शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 8 हजार रुपये वर्ग करण्यात येतील आणि याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- शाश्वत शेतीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त
- पीक विमा भरण्यास आता तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – कृषीमंत्री