मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. राजस्थान येथे आज आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
निर्मल रायझामिका 👇
पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा करण्यात येतात. जुलै महिन्यात या योजनेचा 14 हप्ता देण्यात येईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली होती. त्यानुसार, आज 17 हजार कोटी रुपये 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेत असल्याचे दिसून येत असून लाभार्थ्यांची संख्या 30 लाखांनी वाढली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 3 टप्प्यांमध्ये प्रती 2 हजार रुपये दिले जातात. असे एकूण वर्षाला 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
असं करा चेक
सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तिथं तुम्हाला “फार्मर्स कॉर्नर” दिसेल. येथे Beneficiary Status असेल या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा पीएम किसान खाते क्रमांक नोंद करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. यांनतर गेट डेटा (Get Data)वर क्लिक करा. यानंतर खात्यात पैसे आलेत की नाही हे तुम्हाला दिसेल.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गांभीर्य नसलेल्या शिंदे सरकार मंत्र्यांना ताकीद; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या होत्या संतप्त भावना, अनेक आमदारांचीही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
येथे करा तक्रार