• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इंजिनिअर ब्रदर्स नोकरी सोडून रमले शेतीत

एका वर्षाला होतोय 20 लाखांची कमाई

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2023
in यशोगाथा
0
नोकरी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुझफ्फरपूर : चांगल्या पगाराची आणि सर्व सोई सुविधांयुक्त नोकरी मिळाली असेल आणि ती देखील दिल्ली सारख्या शहरात तर कोणीही नोकरी सोडण्याचा साधा विचारही कोणी मनात आणणार नाही. मात्र याला मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कर्मपूर येथील दोघे इंजिनिअर भाऊ अपवाद ठरले आहेत. या दोनही भावंडानी दिल्ली येथील अभियंत्याची नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. आज हे इंजिनिअर ब्रदर्स एकात्मिक पद्धतीने शेती करीत असून त्यातून ते वर्षाकाठी 20 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. उच्च शिक्षित या दोघं भावंडांनी तरुणांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

मनात काही तरी करण्याची जिद्द असेल तर त्यात यश मिळाल्याशिवाय राहत नाही. मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कर्मपूर गावात राहणारे आयुष कुमार आणि कुशल कुमार यांनी देखील जिद्दीला पेटत शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यात यश देखील मिळविले. आयुष कुमार हा मॅकेनिकल इंजिनिअर तर कुशल कुमार इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनिअर असून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजधानी दिल्ली येथे चांगल्या पगारावर नोकरी करण्यास सुरुवात केली.

टोमॅटोला ‘या’ बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वाधिक दर
https://eagroworld.in/tomato-fetches-the-highest-price-in-this-market-committee-11-7-2023/

कोरोनामुळे परतले घरी…

या विषयी बोलतांना आयुष सांगतात की, कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र भिती पसरली होती. त्यामुळे कुटूंबियांनी देखील आमच्यावर घरी परत येण्यासाठी दबाव आणला. कुटूंबियांच्या दबावामुळे आम्ही दोघे भाऊ नोकरी सोडून घरी परतलो. घरी परतल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी कुटूंबियांनी वडीलोपार्जित 40 एकर शेतीत काही तरी नवीन करण्याचा सल्ला दिला.

एकात्मिक पद्धतीने करतायेत शेती

कुटूंबियांनी दिलेल्या सल्ल्यानंतर दोघा भाऊंनी शेती करण्याच्या कामाला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी मशरुमची शेती केली. आता ते मागील काही वर्षांपासून 10 एकर क्षेत्रात एकात्मिक पद्धतीने शेती करत आहेत. सोबतच एक एकराच्या क्षेत्रात पारंपारिक पद्धतीने देखील शेती करीत आहेत. ज्यामधून त्यांची चांगली कमाई होत आहे. या व्यतिरिक्त त्यांनी शास्त्रीय पद्धतीने लिची या लागवड केली असून त्यातून उच्च दर्जाच्या फळांचे उत्पादन घेत आहेत. शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नाबाबत बोलतांना आयुष सांगतात की, या कामातून चांगली कमाई होत आहे. शेतीतून जितकी कमाई होत आहे, त्याच्या फक्त 10 टक्के कमाई आम्ही नोकरीतून करत होते, असेही ते सांगतात.

शेतीला दिली उद्योगाची जोड

आयुष कुमार सांगतात की, त्यांच्याकडील एकूण शेत जमीनपैकी 12 एकरात त्यांनी शाही लिचीचे 1100 रोपांची लागवड केली आहे. यातून मिळणार्‍या उत्पादनावर अवलंबून न राहता या लिचीच्या बागेला उद्योगाची जोड दिली आहे. त्याअंतर्गत 200 झाडांच्या लिचीपासून ज्युस, रसगुल्ला आणि मनुखे बनविले जात असल्याचेही ते सांगतात. यातून कमीत कमी 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत कमाई होते. यातून शेतीला लागलेला खर्च वजा जाता 40 हजार रुपये निव्वळ नफा राहतो. उरलेली लिचीची फळे विक्री केली जातात. त्यातून देखील 5 लाख रुपयांपर्यंत कमाई होत असल्याचेही ते सांगतात.

Soil Charger

मुजफ्फरपुर येथून घेतले प्रशिक्षण

लिचीपासून विविध प्रकारची उत्पादने बनविण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय लिची अनुसंधान केंद्र, मुशहरी, मुजफ्फरपूर येथून प्रशिक्षण घेतले आहे. पुढे बोलतांना कुशल कुमार सांगतात की, शेतीला नवीन पद्धतीने सामावून घेण्याचे काम आम्ही सर्वात पहिले केले. आम्ही दोघे भाऊ 10 एकर शेती एकात्मिक पद्धतीने करत असल्याचेही ते सांगतात. त्यांनी एकात्मिक पद्धतीने अधिक उत्पादन देणारी पद्धत अवलंबली आहे.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇

 

8 ते 9 जणांना रोजगार

कौशल आणि आयुष यांनी एक लक्ष निवडून त्यांवर सातत्याने काम केले. आपली इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आज लाखो रुपये तर कमवितच आहेत शिवाय 8-9 लोकांना रोजगार देखील देत आहेत. इंजिनिअर बंधू सांगतात की, जे लोक शेतीला तोट्याचा व्यवसाय समजणार्‍यांनी आमच्या शेतात येवून पाहावे, असेही ते सांगतात.

Ajeet Seeds

मत्सपालन आणि बरेच काही

एकात्मिक शेती पद्धतीच्या मदतीने हे दोघे भाऊ 1 एकर क्षेत्रावरील तलावात मत्स पालन, 1 एकर क्षेत्रात मशरुम लागवड, 3 एकरमध्ये फळझाडांची आणि 4 एकर क्षेत्रात भाजीपाला लागवड तर एक एकर क्षेत्रात नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी आणि गावठी कोबड्या देखील ते पाळत आहेत. या विषयी बोलतांना कौशल सांगतात की, या सर्वांमधून कमीत कमी 20 लाखांपर्यंत कमाई होत आहे. परंतु, शेतीला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी उत्पन्नाचा बहुतांश भाग हा शेतीमध्येच लावला जात आहे. यामुळे आमच्या नफ्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सांगून 2025 पर्यंत या शेतीतून 30 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वासही ते व्यक्त करतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • मायक्रोग्रीनच्या शेतीतून महिन्याला 80 हजाराची कमाई
  • Velanga Home Stay : विदेशातील नोकरी सोडून उभारला ‘वेलंगा होम स्टे’

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आयुष कुमारइंजिनिअर ब्रदर्सएकात्मिक शेतीकुशल कुमारशेती
Previous Post

डायबिटीस, ओबेसिटी नियंत्रणात ठेवणारे गव्हाचे नवे वाण विकसित

Next Post

पसरणार्‍याऐवजी उभे वाढणार्‍या वाणाची करा निवड

Next Post
उभे वाढणार्‍या वाणाची

पसरणार्‍याऐवजी उभे वाढणार्‍या वाणाची करा निवड

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.