• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पुरेसा पाऊस येईना, पेरणी होईना; राज्यात फक्त 14% पेरणी !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2023
in हवामान अंदाज
0
पुरेसा पाऊस
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : कोकणात, मुंबईत आणि ठाणे-पालघरमध्ये तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळणे सुरूच आहे. दुसरीकडे, राज्याच्या उर्वरित बहुतांश भागात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. कृषी विभागाने, आपल्या भागात किमान 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या करण्याचा वारंवार सल्ला दिला आहे. त्या पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आता मूग-उडीद आणि भुईमुग पेरणीची वेळ निघून जाण्याची स्थिती आलीय. राज्यात मंगळवार, 4 जुलैअखेर फक्त 14 टक्केच पेरणी झाली आहे. कृषी विभागाचा हा अहवाल चिंता वाढविणारा असताना सत्ताधारी मात्र राजकीय साठमारीत गुंतले आहेत. शेतकऱ्यांना सर्वांनीच वाऱ्यावर सोडले आहे. राज्यातील बळीराजा आज अत्यंत हवालदिल झाला आहे.

यंदा मृगात मान्सूनचा पाऊस बरसलाच नाही. आता आर्द्रा नक्षत्रातही उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भाग वगळता पाऊस रडत-खडत बरसत आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सून हुलकावणी देत आहे. त्यामुळे पेरण्या पूर्णपणे रखडलेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार, 4 जुलैअखेर राज्यात फक्त 14.45 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. नाशिक विभागात तर हा टक्का आणखी घसरला असून विभागात केवळ 13 टक्के इतकाच पीक पेरा झाल्याचे आकडेवारी सांगतेय. जुलैच्या पावसावर शेतकऱ्यांच्या नजरा असल्या तरी पाऊस अजून मुंबई-कोकणातच रखडलेला आहे.

आपत्कालीन परिस्थिती असे करा पीक नियोजन
https://eagroworld.in/crop-planning-as-an-emergency-situation/

नाशिक विभागात फक्त 13 टक्के पेरणी

राज्यात अजूनही 30 टक्के पावसाची तूट आहे. शिवाय, जो काही पाऊस नोंद झालाय, तो विशिष्ट भागात केंद्रीत आहे. त्याच विभागातील इतर भागात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झालेला नाही. 4 जुलैपर्यंत राज्यात झालेल्या 14.45 टक्के पेरण्यात सर्वाधिक पेरणी विदर्भात झाली आहे. अमरावतीमध्ये 25 टक्के तर नागपुरात 19 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय, कोल्हापूर व औरंगाबाद विभागात 15 टक्के तर नाशिक विभागात 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर विभागात 6 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुण्यात योग्य पाऊस नसल्याने पेरण्या फक्त 3 टक्के इतक्याच आहेत. दुसरीकडे, सततच्या पावसाने पेरणीला योग्य वेळ मिळत नसल्याने कोकण विभागातही फक्त 3 टक्के पेरणी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात 10 टक्के तर सातारा जिल्ह्यात 14 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात फक्त 33 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

मंगळवार, 4 जुलैपर्यंत राज्यात फक्त 14.45% पेरण्या पूर्ण झाल्याचे कृषी विभागाचा अहवाल सांगतो. यंदा चार जुलैपर्यंत 20,51,925 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. या तारखेपर्यंत दरवर्षी सरासरी 1 कोटी 42 लाख 2 हजार 318 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झालेल्या असतात.

उशिराच्या, अपुऱ्या पावसाने बदलतोय पीक पेरा

उशिराच्या आणि अपुऱ्या पावसाने राज्यातील पीक पेराही बदलत आहे. नाशिक विभागात हंगामातील मका व इतर खरीप पिकांचे क्षेत्र घटून लाल कांद्याचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे आहेत. धुळे जिल्ह्यात झालेल्या 33 टक्के पेरण्यांमध्ये सर्वाधिक लागवड कपाशीची आहे. राज्यातील बहुतांश उत्पादक भागात कापूस व तेलबिया लागवड अधिक होत आहे, तर कडधान्य व भातपेरा तुलनेने संथ आहे. खरीपातील भात लावणीला तर मोठाच फटका बसलेला आहे. भात लावणी तर सरासरीच्या अवघ्या पाच टक्के क्षेत्रावरच झाली आहे. विदर्भात सोयाबीन आणि कापसाची लागवड सर्वाधिक आहे.

Shriram Plastic

कृषी विभाग अहवालानुसार, राज्यातील पीकनिहाय पेरा

कृषी विभागाच्या अहवालानुसार, 4 जुलै अखेर राज्यातील पीकनिहाय पेरा असा –

1. कपाशी – 29 टक्के
2. तेलबिया – 11%
(सोयाबीन,सूर्यफूल, तीळ, भुईमूग, कारळ व अन्य)
3. मका – 8%
4. कडधान्य – 7%
(उडीद, मूग, तूर व अन्य)
5. भात – 5%
6. ज्वारी – 2%
7. बाजरी – 1%

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

गेल्या 3 दिवसातील पावसाने पेरण्यांना वेग आल्याचा दावा

कृषी विभागाच्या अहवालानंतर, गेल्या 3 दिवसात उत्तर-मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात चांगला पाऊस झाल्यामुळे आता पेरणीचा टक्का वाढल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. अपेक्षित पाऊस झालेल्या आणि वाफसा असलेल्या ठिकाणी पेरण्या होत असून खरीप हंगामातील पेरण्यांना आता गती येऊ लागल्याचे कृषी विभागाने “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले. विदर्भातील बहुतांश भागात आता समाधानकारक पाऊस झाल्याचे सांगितले गेले. तिथे सोयाबीन आणि कापाशीचा 80 टक्के पेरा पूर्ण झालेला आहे. खरीपातील भाजीपाला लागवडही जवळजवळ पूर्णच होत आल्याची माहिती दिली गेली. संपूर्ण जून महिन्यात पाऊस फिरकलाच नसलेल्या क्षेत्रात हंगामापूर्वीच उडीद आणि मुगाचे पीक हातचे जाण्याची शक्यता दिसत आहे. येत्या दोन दिवसात ही पेरणी करावी लागणार आहे. नाहीतर, या हंगामात उडीद व मुगाची लागवड करता येणे शक्य होईल असे दिसत नाही.

15 जुलैपर्यंत खरीप पिकांची पेरणी शक्य – कृषी विभाग

पाऊस झालेल्या राज्यातील भागात पेरणीमध्ये कापूस आणि तेलबिया लागवडीचे प्रमाण मोठे आहे. तृणधान्य, ज्वारी व कडधान्य तसेच भाताचाही फारसा पेरा अजून झालेला नाही. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अजूनही धीर धरण्याचे आवाहन केले जात आहे. आता आठवडाभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. खरीप पिकांची लागवड 7 नव्हे तर 15 जुलैपर्यंत करता येणे शक्य असल्याचे राज्याच्या कृषी विभागाने म्हटले आहे.

Ellora Natural Seeds

कृषी विभागाचा परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचा दावा

अजूनही पुरेसा पाऊस नाही, रखडलेल्या पेरण्या हे सारे पाहता संभाव्य परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा दावा राज्याच्या कृषि विभागाने केला आहे. राज्याचे निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक विकास पाटील यांनी राज्याच्या बहुतांश भागात अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, “राज्याच्या किनारपट्टी भागातले कोकणातले जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रात घाट परिसर सोडल्यास बहुतांश भागात अजून पेरणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी‎ धीर ठेवावा, घाबरून जाऊ नये. जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.”

बँकांचा पीक कर्ज वाटपात आखडता हात; निम्मे शेतकरी पीक कर्जापासून वंचित

राज्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकांच आघाडीवर आहेत. त्यांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल 72 टक्के इतके पीक कर्ज वाटप पूर्ण केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून 18 लाख 74 हजार शेतकऱ्यांनी 13 हजार 380 कोटी रुपयांचे पीक कर्ज मिळविले आहे. राष्ट्रीयीकृत बँकानी मात्र फक्त 47 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकांनी फक्त 9 हजार 827 कोटी रुपये इतक्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. प्रत्यक्षात त्यांना 32 हजार 320 कोटी रुपये कर्ज वाटपाचे लक्ष्य दिले गेले आहे. शेतकऱ्यांना “सिबिल”ची सक्ती केली जात आहे. सत्ताधारी पक्ष राजकीय ताकद वाढविण्यात गुंतलेला असून त्यांनी बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळेच सरकारची इशारेबाजी न जुमानता बँका कर्ज वाटपात अडवणूक करीत आहेत, असा आरोप भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांना उधारीवर माल देऊन खतविक्रेते दुकानदार त्याची व्याजासह वसुली करून सावकारी करत असल्याचेही नवले यांनी सांगितले.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट : Global Warming चा फटका
  • IMD चा आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट; उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कृषी विभागनाशिक विभागपाऊसपेरणी
Previous Post

आपत्कालीन परिस्थिती असे करा पीक नियोजन

Next Post

राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होणार; येत्या 4-5 दिवसात कोकणात मध्यम सरी

Next Post
राज्यातील पावसा

राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होणार; येत्या 4-5 दिवसात कोकणात मध्यम सरी

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.