पुणे : खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, मुबलक प्रमाणात होण्यासाठी व शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती निविष्ठा व गुण नियंत्रणचे कृषि संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.
स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष हा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी २४ तास सूरू राहणार असून संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वणी क्रमांक ८४४६११७५००, ८४४६२२१७५० व ८४४६३३१७५० उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकाही संपर्क करता येईल. यासोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] या ईमेल पत्त्यावरही पाठविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.
तक्रारी कोऱ्या कागदावर लिहून व्हॉटस्ॲप वर किंवा ई-मेलवर पाठवलेल्या तक्रारीदेखील स्वीकारल्या जातील. व्हॉट्सॲपद्वारे तक्रारी पाठवणे शक्य नसल्यास भ्रमणध्वणी क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदविल्या तरी चालतील. संबंधितांनी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी व अडचणींचा संक्षिप्त तपशिल भ्रमणध्वणी, टोल फ्री क्रमांक व ई-मेलवर कळवाव्यात असे, आवाहनही करण्यात आले आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- नॅनो युरिया, नॅनो डीएपी फवारणीसाठी इफको खरेदी करणार 2,500 कृषी ड्रोन IFFCO Agri Drones
- पीक विमा आता फक्त एक रुपयात ; असा करा अर्ज..