मुंबई : PM Kisan.. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 13 वा हफ्ता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला आहे. शेतकरी आता 14 व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पीएम किसान (PM Kisan) योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. मात्र, पीएम किसानच्या 14 व्या हफ्त्यामध्ये 4000 रुपये काही शेतकऱ्यांना मिळू शकतात.
छोट्या, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सरकारने सुरु करण्यात आली होती. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर दर 4 महिन्यांनी २ हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 13 हफ्त्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले आहे.
तर मिळू शकतात 4000 रुपये
केंद्र सरकारने पीएम किसानच्या 12 व्या हफ्त्यापासून कडक नियम जारी केले आहेत. दरम्यान, 14 वा हफ्ता कधी मिळणार याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पीएम किसानच्या 14 व्या हफ्त्यामध्ये 4000 रुपये काही शेतकऱ्यांना मिळू शकतात. हा लाभ कोणाला मिळू शकतो? तर पीएम किसान योजनेतील लाखो शेतकऱ्यांना 13 व्या हफ्त्याचा लाभ मिळालेला नाही. जर या शेतकऱ्यांनी 14 व्या हफ्त्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यास 13 आणि 14 व्या हफ्त्याची रक्कम एकत्र मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डसह कागदपत्रांची पडताळणी करू घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच लवकरात लवकर ही कामे उरकून घ्यावी, असं आवाहन देखील केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी [email protected] ईमेल आयडीवर अडचण देखील नोंदवून अडचणींचे निराकरण करू शकतात. तसेच 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करू शकतात.
काय आहे बेनिफिशियरी स्टेटस?
शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना खात्याची संपूर्ण माहीती हे बेनिफिशियरी स्टेटसमध्ये असतात. यात अकाउंटवर आतापर्यंत किती हप्ते मिळाले, बँक खात्यात पैसे कधी जमा झाले, कोणते हप्ते अडकले आहेत तर त्याचे कारण काय?, आधार कार्ड व्हेरिफाय झाले आहे की नाही, अशी संपूर्ण माहिती यात असते.