मुंबई : Krushi Loan… शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात अशावेळी त्यांना कर्जाची गरज भासते. यामुळे सरकारकडून त्यांना कर्जासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज देण्यापासून ते कृषी उपकरणांपर्यंत सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र, आता भारतातील बँकाही आपली भूमिका बजावत आहेत. चला तर मग जाणून घेवू या कसं आणि कुठे हे लोन मिळेल, शेतकऱ्यांना अर्ज कसा करता येईल.
देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळणार आहे. होय, देशातील सरकारी बँक म्हणजेच PNB शेतकऱ्यांना ही भेट देणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सहजपणे कृषी कर्ज घेता येणार आहे. या दरम्यानच आता पंजाब नॅशनल बँकेने मोबाईलद्वारे मिस्ड कॉल देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
फक्त एका मिस कॉलवर कृषी कर्ज मिळेल
पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम केले आहे. होय, पंजाब नॅशनल बँकेने दावा केला आहे की, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना फक्त एका नंबरवर मिस कॉल आणि मेसेज द्यावा लागेल. असे केल्याने कर्जाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील.
कर्जासाठी या नंबरवर करा मिस कॉल आणि मेसेज
आता शेतकर्यांना कृषी कर्ज मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा आणि दिवस उभ्या राहण्याची चिंता करावी लागणार नाही. त्यापेक्षा आता त्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेजवर कर्जाची सुविधा मिळणार आहे. स्वतः पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटरवरून माहिती शेअर करताना याबाबत ट्विट केले आहे.
पंजाब नॅशनल बँकेने या ट्विटद्वारे कर्ज घेण्याचे अनेक सोपे मार्ग दिले आहेत, जे आम्ही तुमच्यासोबत खाली शेअर करत आहोत. अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज घेण्यासाठी PNB ने दिलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतात.
शेतकऱ्यांना अशा प्रकारे करता येईल अर्ज
देशातील शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देण्याची ऑफर पीएनबीने दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
56070 वर ‘Loan’ असे लिहून SMS करा.
18001805555 वर मिस कॉल द्या.
18001802222 वर कॉल सेंटरशी संपर्क साधा.
नेट बँकिंग वेबसाइट http://netpnb.com द्वारे अर्ज करा.
PNB One द्वारे अर्ज करा.
मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सरकारकडून दिले जातात. याचा देशातील करोडो लोकांना फायदा होत आहे. तसेच कृषी सिंचाई योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते आहे. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान दिले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाइट https://pmksy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.