• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

या विदेशी टोमॅटोची करा लागवड ; होईल चांगली कमाई

भारतातही केली जातेय मोठ्या प्रमाणावर लागवड

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2022
in हॅपनिंग
0
टोमॅटो
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : टोमॅटो म्हटले डोळ्यासमोर येतो तो लाल किंवा कच्चा टमाट्यांचा हिरवा रंग. परंतु, ब्रिटनमधील एका शेतकर्‍यांने चक्क काळा टोमॅटोची (Black tomatoes) शेती केली आहे. या टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असल्याने भारतात देखील या टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून शेतकर्‍यांसाठी हा टोमॅटो उत्पन्नाचे मोठे साधन ठरत आहे. चला तर मग जाणून घेवूया या टोमॅटोबद्दलची माहिती.

जगभरात खाल्ल्या जाणार्‍या काही भाज्यांपैकी टोमॅटो ही सर्वात लोकप्रिय भाजी आहे. टोमॅटोचा वापर जवळपास सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो. एवढेच नव्हे तर टोमॅटोपासून सॉस (केचअप), प्युरी, रस, सूप, लोणचे देखील बनविले जात असल्याने त्याची जगात सर्वाधिक विक्री देखील होते. त्यामुळे शेतकर्‍यांकडून नियमित टोमॅटोची लागवड करून त्यातून चांगले उत्पन्न देखील घेतले जाते.

टोमॅटो म्हटल की, डोळयासमोर येतो तो लाल किंवा हिरव्या रंग, परंतु टोमॅटोचा रंग काळाही असतो, असे सांगितले तर यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. इंग्लंड येथील रे ब्राउनला यांनी जनुकीय उत्परिवर्तनातून काळे टोमॅटो तयार केले आहेत. त्याला इंडिगो रोज टोमॅटो (काळा टोमॅटो) असे नाव देण्यात आले. युरोपच्या बाजारपेठेत हा टोमॅटो सुपर फूड किंवा इंडिगो रोज टोमॅटो म्हणून ओळखला जातो. युरोपमध्ये प्रथम काळ्या टोमॅटोची रोपवाटिका तयार करण्यात आली. यामध्ये जांभळा टोमॅटो आणि इंडिगो गुलाब लाल रंगाच्या बियांचे मिश्रण करून नवीन बियाणे तयार करण्यात आले. ज्यापासून संकरित काळ्या टोमॅटोची उत्पत्ती झाली.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

भारतातही होतेय उत्पादन

काळ्या टोमॅटोची नर्सरी सर्वप्रथम ब्रिटनमध्ये तयार करण्यात आली होती. त्याची लागवडही प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. परदेशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे ब्लॅक टोमॅटो (इंडिगो रोज टोमॅटो)चे आता भारतातही उत्पादन होत आहे. अनुकूल जमीन व हवामानामुळे भारतात अनेक ठिकाणी या टोमॅटोची लागवड केली जात आहे. झारखंडच्या रामगढमध्ये या काळ्या टोमॅटोच उत्पादन केले जात आहे.

NIrmal Seeds

हेक्टरी तीन ते पाच लाखांचा नफा?

काळा टोमॅटो उष्ण प्रदेशात चांगला पिकवता येतो. दंव झालेल्या भागात पिकण्यास त्रास होऊ शकतो. या टोमॅटोची लागवड पद्धत लाल टोमॅटोसारखीच आहे. यासाठी वेगळे काही करण्याची गरज भासणार नाही. 130 बिया असलेले ब्लॅक टोमॅटो सीड्सचे पॅकेट भारतातही उपलब्ध आहेत. शेतकरी त्याचे बियाणे ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. काळ्या टोमॅटोची रोपवाटिका जानेवारी महिन्यात तयार करून त्याची तयार रोपवाटिका मार्च अखेरीस लावता येते.

काळा टोमॅटो लाल टोमॅटो पेक्षा थोड्या जास्त वेळाने पिकतो. लाल टोमॅटो साधारण तीन महिन्यांत पिकतात, परंतु या टोमॅटोला पिकायला तीन ते चार महिने लागतात. काळ्या टोमॅटोच्या लागवडीचा खर्च लाल टोमॅटोएवढा आहे. त्याच्या लागवडीत फक्त बियाणांचा खर्च वाढतो. लागवडीचा खर्च काढल्यास हेक्टरी तीन ते चार लाखांचा नफा मिळू शकतो. त्यामुळे काळ्या टोमॅटोचे पीक हे शेतकर्‍यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे उत्तम साधन बनू शकते.

अशी करा जमिनीची निवड

काळ्या टोमॅटोची रोपवाटिका प्रथम ब्रिटनमध्ये तयार करण्यात आली होती, परंतु आता भारतात अनेक भागात त्याची लागवड केली जात आहे. येथील माती आणि हवामान त्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. काळ्या टोमॅटोचे उत्पादन ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते ते आता झारखंडच्या रामगढमध्ये देखील घेतले जात आहे. येथील हवामान काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे येथील शेतकरी सांगतात. लाल टोमॅटोप्रमाणेच त्याची लागवड सर्व प्रकारच्या मातीत जसे की गुळगुळीत, चिकणमाती, काळी लाल माती इत्यादीमध्ये यशस्वीपणे करता येते. परंतु ज्या ठिकाणी लागवड करायची आहे, त्या ठिकाणची माती सेंद्रिय पदार्थांनी युक्त आणि पाण्याचा चांगला निचरा करणारी असावी. भारतात झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये या टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे.

Ajeet Seeds

अशी आहे या टोमॅटोचे वैशिष्ट्य

काळा टोमॅटोचा उपयोग कॅन्सरशी लढण्यासोबतच इतर अनेक आजारांवर होतो. काळे टोमॅटो सुरुवातीच्या अवस्थेत किंचित काळे असतात आणि पिकल्यावर पूर्णपणे काळे होतात. तोडल्यानंतरही ते बरेच दिवस ताजे राहतात आणि लवकर खराब होत नाही. त्यातही कमी बिया असतात आणि ते दिसायला काळे असले तरी आतून लाल रंगाचे असतात. काळ्या टोमॅटोच्या बिया देखील सामान्य लाल टोमॅटोसारख्याच असतात. लाल टोमॅटोच्या तुलनेत त्याची चव किंचित खारट आहे. जास्त गोड नसल्यामुळे साखरेच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे. शुगर आणि हृदयरोगाचा त्रास असलेले व्यक्ती काळ्या टोमॅटोचे सेवन सहज करू शकतात.

काळ्या टोमॅटोमधील औषधी गुणधर्म

काळ्या टोमॅटोमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन-ए, सी, खनिजे, लोह फॉस्फरस आणि इतर खनिज क्षार यांसारखे अनेक प्रकारचे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यात फ्री रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता आहे, ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यात खूप मदत होते. याशिवाय त्यात अँथोसायनिन असते, जे हृदयविकाराचा झटका टाळते. एवढेच नाही तर यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे काळ्या टोमॅटोचे उत्पादन आणि सेवन दोघेही फायदेशीर मानले जात आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पुणे मार्केटयार्ड समितीतील 16 डिसेंबर 2022 रोजीचे दर
  • Fal Pikavnyasathi Tantradnyan : फळे पिकवण्याचे हे तंत्र शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान ; सरकारही देते अनुदान

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इंडिगो रोज टोमॅटोऔषधी गुणधर्मब्लॅक टोमॅटोरोपवाटिका
Previous Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 16 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post

Hydroponics Sheti : मातीशिवाय पिकवा भाजीपाला ; असा सुरु करा व्यवसाय

Next Post
Hydroponics Sheti

Hydroponics Sheti : मातीशिवाय पिकवा भाजीपाला ; असा सुरु करा व्यवसाय

ताज्या बातम्या

चौध्रुवीय-कोल

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 25, 2025
0

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई?

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई? जाणून घ्या फळपीक विमा योजनेतील अविश्वसनीय फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

भारतीय बाजारपेठ

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

चौध्रुवीय-कोल

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 25, 2025
0

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई?

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई? जाणून घ्या फळपीक विमा योजनेतील अविश्वसनीय फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

भारतीय बाजारपेठ

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish