मुंबई : Draksha Bag… द्राक्षाचा वेल मूळचा रशियातील समशीतोष्ण भागांतील आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. वायव्य हिमालयावर द्राक्षांच्या जंगली वेली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे. द्राक्षांच्या लागवडीत वेलांना वळण देण्याइतकेच त्यांच्या छाटणीला महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेवू या द्राक्ष बागेतील फळे छाटणीनंतरचे व्यवस्थापन..
बऱ्याच वेळी पाऊस जास्त प्रमाणात झाला असेल किंवा पावसाळी वातावरण असल्यास भागात वाढलेल्या आद्रतामुळे वेलीच्या वाढीचा जोम हा जास्त प्रमाणात झाल्यामुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाऊ शकते अशा परिस्थितीत द्राक्ष बागेचा शेंडा पिंचिंग करून त्याची जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून व पूर्तता करावी. काडीची परिपक्वता ओळखण्यासाठी जे काळी कापल्यानंतर तिच्या आतील भागात जितका जास्त तपकिरी भाग असेल तितकी काडी चांगल्या तऱ्हेने परिपक्व झाली असे समजावे काडीची परिपक्वता झाली असल्यास त्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
फळ छाटणीनंतर पानगळ करणे
बागेत खरड छाटणीनंतर लवकर व एकसारख्या फुटी मिळण्याकरिता महत्वाचे म्हणजे काडीवरील डोळे तपासायला हवे हा डोळा जितका जास्त वेळ उन्हात राहील तितका व्यवस्थित व त्याचा परिणाम बागेमध्ये फुटी निघण्यास होईल. याकरिता बागेमध्ये पानगळ करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनीही पानगळ फळ छाटणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर करणे गरजेचे असते.
हाताने केलेली पानगळ व रासायनिक पदार्थाचा वापर करून केलेली पानगळ यापेक्षा मजूर मिळत असतील तर उत्तम नाहीतर रासायनिक पदार्थांचा म्हणजेच फवारणीचा वापर करू शकतो. त्यासाठी इथेफोन या रसायनाचा वापर 3 ते 3.5 मी.ली. लिटर करावा. बागेत कॅनोपी जास्त असल्यामुळे जवळपास 450 ते 500 लिटर पाण्याचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे रसायनाचा वापर करत असताना फवारणीचे पाच-सहा दिवस आगोदरच बागेत पाण्याचा ताण दिला गेलेला असावा, असे केल्यावर पाणगळ चांगली घडून येण्यास मदत होते.
अशी करा द्राक्ष बागेची छाटणी
द्राक्ष बागेची छाटणी घेण्याकरिता डोळे फुगलेले असणे महत्त्वाचे आहे आणि अशाच परिस्थितीत फळ छाटणी घ्यावी. अन्यथा, दोन ते तीन दिवस पुन्हा थांबावे त्यासाठी सरळ काळी व सबकेन अशा दोन प्रकारच्या काड्या बागेमध्ये दिसून येतील. या काड्या शक्यतो डोळे तपासणी अहवाल नुसारच छाटून घ्यावेत. यामध्ये सबकेन काडीवर शेजारी एक डोळा राखूनच छाटणी करून घ्यावी, तर सरळ काडी असलेल्या बागेत काडीवर ज्या ठिकाणी दोन झाडांमधील अंतर कमी असेल अशा ठिकाणी छाटणी केली तरी चालेल.
खताचा वापर
खताचा वापर हा फक्त दोन वेलीमध्ये ड्रीपर च्या खाली थोडेफार गडडे करुन त्यामध्ये महत्त्वाची खते टाकून द्यावीत यामध्ये सिंगल सुपर फास्फेट 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो डीएपी 50 किलो, फेरस सल्फेट दहा किलो असे एकरी प्रमाण घ्यावे. त्यावर हलकासा मातीचा थर झाकून घ्यावा. ती कार्यवाही फळ छाटणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर करावी.
बागेसाठी हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करणे
द्राक्ष बागेत फळ छाटणीनंतर काडी एकसारखी व लवकर फुटण्याकरिता पांढरी सोबतच हायड्रोजन सायनामाईड चॅटिंग सुद्धा महत्त्वाचे आहे. काडीची जाडी नुसार तसेच वातावरणातील तापमानानुसार हायड्रोजन सायनामाईडचा वापर करणे गरजेचे आहे. हायड्रोजन सायनामाईडचे द्रावण फवारण्या अगोदर काडीची जाडी 8 ते 10 मि.ली. असेल. अशा परिस्थितीमध्ये 40 मि.ली. हायड्रोजन सायनामाईड फवारणीसाठी पुरेसे असते. द्राक्ष बागेत काडी जर या पेक्षा जास्त जाड असेल तर त्यांनी वेलींना पुन्हा काड्यांना पुन्हा एकदा तितक्याच मात्रेचे पेस्टिंग करून काडीला दिल्यास त्याचे चांगले परिणाम डोळे फुटण्यास दिसून येतील.
द्राक्ष बागेत वेलीवर साधारणतः 50 ते 100 घडांची संख्या आपल्याला दिसून येत असते. ही संख्या तशीच राहिल्यास वेलीमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचा वापर अधिकाधिक होईल व घडांची वाढ योग्य प्रमाणात न होता लहानच राहील. यावेळी वेलाचे आकारमान पाहून द्राक्ष घडांची संख्या निश्चित करावी व इतर घड काढून टाकावेत, असे करण्यासाठी दोन प्रकार पडतात. स्थानिक बाजारपेठ आणि निर्यात अशावेळी निर्यातीकरिता प्रति दिडवर्ग फूट अंतरावर एक घड तर स्थानिक बाजारपेठेकरिता प्रति वर्ग फूट या प्रमाणात झाडे राखून ठेवावीत.
रोग नियंत्रण
द्राक्ष बागेत फळ छाटणीनंतर आद्रता जास्त असणे साहजिकच आहे. यापूर्वी पावसाळी वातावरणात वाढलेल्या बागेमध्ये वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला दिसून येईल अशी बाग निघाल्यानंतर ही त्रासदायक परिस्थिती निर्माण करत असते. अशा परिस्थितीत बागेत काडीवर, ओलांड्यावर तसेच खोडावर असलेली रोगग्रस्त पाने गोळा करून बागेच्या बाहेर फेकून द्यावी. त्याचबरोबर बागेमध्ये बोर्डो मिश्रणाची फवारणी पूर्ण वेलीवर तसेच जमिनीवर बांधावर सुद्धा करून घेण्यात यावी यामुळे बागेत असलेले रोगाचे जिवाणू नियंत्रणात ठेवणे अधिक प्रमाणात शक्य होईल.
संजीवकाची फवारणी
द्राक्ष बागेमध्ये 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये द्राक्ष घड जी. ए. 3 व पी.पी.एम. या संजीवकांच्या फवारणी करण्याजोगा होतो. जी. ए. 3. चे अधिक चांगले परिणाम होण्यासाठी जी एक. 3. च्या द्रावणात युरिया फॉस्फेट एक ग्रॅम प्रति लिटर किंवा सायट्रिक ऍसिड 0.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा फॉस्फरिक ऍसिड 0.3 मि.लि. लिटर पाणी या प्रमाणात मिसळून घ्यावे.
पाच दिवसानंतर पुन्हा पंधरा पी.पी.एम तीव्रतेच्या फवारणी केल्यास प्रिब्ल्यूम अवस्थेमध्ये घड चांगल्या रीतीने मोकळा झालेला दिसतो. अशाप्रकारे द्राक्षाच्या काडीमधून घड बाहेर येण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे ऑक्टोबरमध्ये छाटणी करणे आवश्यक असते. त्यासाठी वरील प्रमाणे व्यवस्थित नियोजन करून द्राक्ष बागेत अधिकाधिक उत्पादन घ्यावे.