मुंबई : PM Kisan 12th Installment… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. मात्र, अजूनही अनेक शेतकरी बँक खात्यात पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे आले नसल्याची तक्रार करत आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे पैसे आतापर्यंत तुमच्या खात्यात आले नाहीत, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला 12 व्या हप्त्याची रक्कम का मिळाली नाही हे तुम्ही शोधू शकता. यासाठी कुठे संपर्क करावा लागेल हे जाणून घेवू या.

17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्यासाठी 16 हजार कोटी रुपयांची रक्कम जारी केली. सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांनी 12 व्या हप्त्याचा लाभ घेतला आहे. मात्र, त्यानंतरही हजारो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर बाराव्या हप्त्याची रक्कम अद्याप पोहोचलेली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या शेतकऱ्यांनी पीएम किसानसाठी नोंदणी करताना चुकीचे बँक खाते, आधार क्रमांक किंवा अन्य माहिती भरली असावी. यामुळे 12 व्या हप्त्याची रक्कमही अद्याप आलेली नाही.
या क्रमांकावर साधा संपर्क
ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 12वा हप्ता प्राप्त केला नसेल, ते अधिकृत ईमेल आयडी
pmkisan-ict@gov.in वर जाऊन संपर्क साधू शकतात. याशिवाय, ते पंतप्रधान किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 वर कॉल करून माहिती मिळवू शकतात. यासोबतच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ०११-२३३८१०९२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

पैसे आले नाहीत तर काय करावे
शेतकरी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, त्यांनी यापूर्वी दिलेली माहिती बरोबर होती की नाही ते तपासा. यासोबतच पात्र शेतकऱ्याने आपला बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक तपासावा.
– सर्वप्रथम, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (https://pmkisan.gov.in)
– त्यानंतर होम पेजच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर आहे.
– यामध्ये अनेक पर्याय दिलेले आहेत.
– उजव्या बाजूला लाभार्थी स्थितीचा पर्याय आहे. तुम्ही त्यावर क्लिक करा.
– क्लिक करताच दोन पर्याय उघडतील.
– एकामध्ये आधार क्रमांक आणि दुसऱ्यामध्ये बँक खाते क्रमांक लिहिलेला असेल.
– तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्ही निवडलेला आधार आणि बँक खाते क्रमांक टाका.
– तुम्ही गेट रिपोर्टवर क्लिक करताच संपूर्ण तपशील तुमच्या समोर येईल. पैसे न मिळण्याचे कारणही कळेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल