मुंबई : दिवाळीपर्यंत रेंगाळलेल्या मान्सूनने रविवारी, 23 ऑक्टोबरला अर्थात, मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमधूनही रविवारीच मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. सध्या खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असून मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे.
गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद
यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून परतला असला तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
यंदा विक्रम मोडत मान्सून राज्यातून बाहेर
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरील मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हा विक्रम मोडून मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे. तसेच संपूर्ण देशातून मान्सून बाहेर पडल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पाऊस
यंदा मान्सून पूर्ण माघारी फिरायच्या आधी 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा 65 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. एकूण 104.2 मिलीमीटर सरासरी पाऊस या काळात पडला. सर्वसाधारपणे या कालावधीत 63.2 मिलीमीटर पाऊस पडतो. 11 राज्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, 12 राज्यांमध्ये अतिरिक्त, 10 राज्यांमध्ये सरासरी इतका तर तीन राज्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस पडल्याची या कालावधीत नोंद झाली. दिल्लीमध्ये 469 टक्के, उत्तर प्रदेशात 425 टक्के, उत्तराखंडमध्ये 304 टक्के, राजस्थानमध्ये 208 टक्के, मध्य प्रदेशात 210 टक्के सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही सरासरीच्या 102 टक्के पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये अधिक पडला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇