मुंबई : जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती. पण, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे
यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Good news : दिवाळीपूर्वी सरकारने दिली आणखी एक भेट ; या सहा रब्बी पिकांचा वाढवला MSP
- रब्बीत कांदा लागवडीतून विक्रमी उत्पादनासाठी घ्या फक्त एवढी काळजी ..