जळगाव : भारतातील गहू लागवड खालील एकूण क्षेत्रापैकी सुमारे 30 टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. महाराष्ट्रात 1972 साली या पिकाखाली 6,90,600 हेक्टर जमीन होती व उत्पादन 2,48,500 टन झाले. कोकण वगळल्यास महाराष्ट्राच्या इतर सर्व भागांत गव्हाची लागवड होते. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अहमदनगर, सोलापूर आणि पुणे हे गव्हाच्या लागवडीचे प्रमुख जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील दर हेक्टरी उत्पादन मात्र इतर राज्यांच्या मानाने फार कमी आढळते. जाणून घेऊ या पेरणीनंतरचे ते काढणी पर्यंतचे व्यवस्थापन.
माती परीक्षणाद्वारे गहू पिकातील खत व्यवस्थापन
नत्र (कि./हे.)= (7.54 *अपेक्षित उत्पादन) – (0.74 *जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)
स्फुरद (कि./हे.)=(1.90 *अपेक्षित उत्पादन) – (2.88 *जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)
पालाश (कि./हे.)=(1.90 *अपेक्षित उत्पादन) – (0.22 *जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.)
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
पाणी व्यवस्थापन
गव्हाची पेरणी शक्यतो पेरणीपूर्वी शेत न ओलवता उपलब्ध ओलावा असताना करावी. पेरणीनंतर साधारणपणे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी देण्याच्या दृष्टीने पिक वाढीच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था पुढीलप्रमाणे आहे.
मुकुटमुळे फुटण्याची सुरवात : पेरणीनंतर 18 ते 21 दिवसांनी
कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी
फुलोरा, चिक धरण्याची अवस्था : पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी .
दाणे भरण्याची अवस्था:पेरणीनंतर 80 ते 90 दिवसांनी
अपुऱ्या पाणी पुरवठा परिस्थितीही कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
गहू पिकास दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
गहू पिकास तीन पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी, दुसरे 40 ते 42 व तिसरे 60 ते 65 दिवसांनी द्यावे. गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत 41 टक्के घट येते आणि दोन पाणी दिले तर उत्पादनात 20 टक्के घट येते.
आंतरमशागत
गव्हात चांदवेल, हराळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव आढळतो. याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. तसेच कोळपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो आणि जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी 1250 ग्रॅम आयसोप्रोट्युरॉन हे तणनाशक प्रती हेक्टरी 600 ते 800 लि. पाण्यात मिसळून दोन ओळींमध्ये फवारावे. गव्हामधील तणांच्या नियंत्रणासाठी तणे दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर मेटसल्फ्युरॉन मिथाईल (20 टक्के) हेक्टरी 20 ग्रॅम 800 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पीक संरक्षण
तांबेरा : तांबेरा प्रतिबंधक वाणांचाच पेरणीसाठी वापर करावा. तांबे-याची लागण दिसून आल्यास डायथेन एम-45 हे बुरशीनाशक प्रती हेक्टरी 1.5 किलो, 500 लीटर पाण्यातून फवारावे.
करपा : करपा रोगाच्या नियंत्रणासाठी काँपर ऑक्झिक्लोराईड आणि मॅन्कोझेब प्रत्येकी 1250 ग्रॅम या बुरशीनाशकाचे मिश्रण 500 लीटर पाण्यातून प्रती हेक्टर फवारावे.
मावा
रासायनिक नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच थायोमिथोक्झाम 25 डब्ल्युजी 1 ग्रॅम किंवा अॅसेटामिप्रिड 20 एसपी 5 ग्रॅम प्रती 10 लि. पाणी या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे.
जैविक नियंत्रण : मेटारहीझीयम अँनिसोपली किंवा व्हटीसिलीयम लेकँनि 50 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी या प्रमाणात फवारावे.
उंदीर नियंत्रण : प्रथम शेतातील सर्व बिळांची पाहूणी करावी. बिळांची तोंडे चिखलाने किंवा मातीने बंद करावीत. दुस-या दिवशी यापैकी जी बिळे उघडी दिसतील त्यात उदरांचे अस्तित्व आहे असे समजावे. विषारी आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा 50 भाग त्यात एक प्रकारे मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या साहाय्याने खोलवर टाकावे व बिळे पालापाचोळा किंवा गवत टाकून झाकून घ्यावीत आणि बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत. सामुदायिकरीत्या याप्रमाणे मोहिम हाती घेतली तर अधिक फायदा होतो.
कापणी व मळणी
गव्हाची जिरायत आणि बागायत पेरणी करुन पीक तयार झाल्यानंतर परंतु दाण्यामध्ये 12 टक्के पाण्याचे प्रमाण असताना पिकाची कापणी अशाप्रकारे तांत्रिक पद्धतीने गव्हाची पेरणी केल्यास जिरायत गव्हाचे प्रती हेक्टरी 12 ते 15 किंवटल तर बागायत वेळेवर गव्हाचे प्रती हेक्टरी 45 ते 50 किंवटल आणि बागायत उशिरा गव्हाचे प्रती हेक्टरी 35 ते गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या 40 क्विंटल उत्पादन निश्चित मिळेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- रब्बीत गहू लागवडीतून मिळवा बंपर उत्पादन ; जाणून घ्या.. ”जमीन, हवामान, पूर्वमशागत आणि पेरणी” भाग – 1
- बंपर उत्पादनासाठी रब्बीत अशी करा हरभरा लागवड ; जाणून घ्या.. ”पूर्वमशागत आणि पेरणीची वेळ” भाग – 1
- हरभरा लागवड : जाणून घ्या.. ”पेरणीनंतरचे ते काढणी पर्यंतचे व्यवस्थापन” भाग – 2