• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Wonder World : जग फिरायची आवड असलेला जिगरबाज चहावाला; फाटक्या आयुष्याला जोडले अदृश्य पंख!

सरळधोपट, चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला आजिबात न पेलवणारा अनोखा, प्रेरणादायी जीवनप्रवास

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2022
in वंडरवर्ल्ड
2
जिगरबाज चहावाला
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : ही गोष्ट आहे एका चहावाल्याची. जग फिरायची आवड असलेला जिगरबाज चहावाला ज्याने आपल्या फाटक्या आयुष्याला जोडले अदृश्य पंख! सरळधोपट, चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला आजिबात न पेलवणारा अनोखा जीवनप्रवास जाणून घेऊया आजच्या वंडरवर्ल्ड स्टोरीतून …

आपल्यापैकी बरेच जण जगाच्या प्रवासाचे स्वप्न पाहत असतात, परंतु प्रत्येकामध्ये उत्साहाने व उत्कटतेने आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत नसते. मात्र, आपल्या देशातील चहावाले याला अपवाद आहे. सध्या भारताची स्टोरी चहावाले लिहीत आहेत.

समजा तुम्हाला एखाद्याचा परिचय चहावाला म्हणून करून दिला तर? तुम्ही म्हणाल, काय करताय, तर चहा विकतात.
चहा विकायला किती वर्षे झाली, तर तब्बल 45-50 वर्षे! चहा विकता-विकता आज वय गेलेय सत्तरीत. जमीन-जुमला, बँक बॅलन्स, इस्टेट काही काही नाही गाठीशी. एकदम कफल्लक. ना गाडी, ना बंगला. उलट डोक्यावर कायमच कर्ज. कर्ज कायमच फेडतोय; ते कशासाठी काढलेय तर जग फिरण्यासाठी. त्यातच आता जोडीला कॅमेऱ्याची हौस. फोटो काढायचेहेत, फिल्म बनवायचीय. सबकुछ कसं एकदम हटके आणि स्टाईलसे…

छ्या, तुम्ही भलत्याच कल्पनांचे अदृश्य पंख लावून काहीही विचार करू नका. हे चहावाले आहेत के. आर. विजयन. केरळातील कोची इथे त्यांचा छोटासा टी स्टॉल आहे. विजयन यांना जग भ्रमंतीचा भारी शौक आहे. बरं एकट्याने नाही, तर पत्नी मोहना यांना घेऊन ते कुठेही फिरतात. विजयन आणि मोहना या अनोख्या जोडप्याच्या जगभरात फिरण्यासाठीची आणि उपजिविकेसाठी चहा विकण्याची रिअल, इन्स्पायारिंग स्टोरी म्हणजे “इनव्हिजिबल विंग्स”

विजयन आणि मोहना या कोचीतील जोडप्याच्या जग भटकंतीचा प्रवास सुरू झालाय 70 च्या दशकात, त्यांच्या वयाच्या चाळिशीत. आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असूनही ते अखंड उत्साहाने जगभर प्रवास करत आहेत. कोचीमधील श्री बालाजी कॉफी हाऊसचे ते मालक. अगदी शुद्ध शाकाहारी. हे छोटेसे कॉफी हाऊस म्हणजे त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk

विजयन आणि मोहना या जोडप्याने आजवर 23 देशांत प्रवास केला आहे. दररोज तीनेकशे रुपयांची बचत करूनही पैशांची तजवीज होत नव्हतीच. मग त्यांनी वेळोवेळी कर्ज काढले. फिरून आले, की दोन-तीन वर्षे चहा विकून ते कर्ज फेडायचं. परत पुढचे डेस्टीनेशन, पुढचा देश, परत कर्ज, परत कष्ट, परत कर्जफेड हे चक्र! पण त्याचा त्यांना बोजा वाटत नाही. कारण भटकंतीतून मिळणारा आनंद, समाधान त्यापेक्षा कितीतरी जास्त! त्यांनी घेतलेली बँक कर्ज ते रोजच्या चहाच्या कमाईतून 300-500 जमेल तसा दैनंदिन भरणा करून फेडतात. कदाचित, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर विजयन हे देशातील सर्वात प्रसिद्ध चहा विक्रेते असू शकतात!

केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्यचकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे असंख्य लोक आपल्या आजूबाजूला आहेतच! पण पै-पै जमा करून केवळ, देशातच नव्हे, तर देशोदेशी भटकंती करणाऱ्या या जोडप्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.
आजपर्यंत त्यांनी सुमारे 23 देशांत भटकंती केली. त्यांत ईजिप्त, जॉर्डनसारखें मध्यपूर्वेतील, तर सिंगापूर, मलेशिया सारखे अतिपूर्वेकडील, युरोपातील सदैव हिटलिस्टवर असणारे इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, तर पार पलीकडे असणाऱ्या अमेरिकेचीही सफर त्यांनी केली.

Kohinoor Nursary

इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा परिस्थिती नसताना जगाचा प्रवास करण्यावर विजयन यांनी इतके लक्ष का केंद्रित केलेय? त्यावर विजयन सांगतात, “ही उत्कटता आहे. माझा जन्म भारताच्या भूमीत झाला आहे आणि इतर अनेक देश आहेत, ज्यात विविध संस्कृती आहेत. मला ते सर्व एक्सप्लोर करायचे होते.”

नातेवाईक, मित्र-मंडळी, हितचिंतक व इतरांनीही चिंता व्यक्त केली, की सर्व कमाई अशी प्रवासावर उधळून कसे चालेल? म्हातारपणाची सोय, आरोग्य सेवेसाठी काहीतरी बचत करायला नको का? मात्र, विजयन यांचा ईश्र्वरावर पूर्ण विश्वास आहे. ते म्हणतात, “मला फक्त प्रवासाची काळजी आहे. देव माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेईल.”

विजयन सांगतात, की त्यांनी केरळात अनेक परदेशी पर्यटक पाहिले आहेत. हे लोकं वर्षाचे काही दिवस कष्ट उपसतात, कमाई करतात आणि उरलेला काळ जगभर भटकतात. ते पैसे साठवून ठेवण्याचा खटाटोप करत नाहीत. आपलं अनुभवविश्व, जगणं समृद्ध करायला हवं. ईश्वराने हा जन्म एकदाच दिलाय. अर्थात इतर देशात सोशल सिक्युरिटी योजना आहेत. मात्र, यावर विजयन फक्त वर देवाकडे इशारा करतात. तो सर्व पाहून घेईल, आपण आपल्या हाती आहे ते करावे, हेच या जोडप्याचे जीवन तत्त्वज्ञान आहे.

विजयन यांच्या चहाच्या दुकानात त्यांनी भेट दिलेल्या देशांची अनेक छायाचित्रे, नकाशे आणि त्यांच्या प्रवासाची वृत्तपत्रातील कटिंग्ज आहेत. त्यांच्या टूरच्या वेळी कॉफी शॉप बंद असते. या जोडप्याचे ब्रिटन, फ्रान्स, युरोप, इजिप्त, संयुक्त राज्य, दुबई, आखाती देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, पेरू, अर्जेंटिना असे अनेक देश फिरून झाले आहेत.

Vikas Pashukhadya

या जोडप्याने एकत्रित सर्व जग एक्सप्लोर केले आहे. त्यांच्या प्रवासकथेने जगभरातील बर्‍याच पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. तेव्हापासून त्यांचे जीवन थोडे बदलले आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट निर्माते हरी एम. मोहनन यांनी विजयन-मोहना जोडप्याच्या जगभ्रमंतीवर “इनव्हिजिबल विंग्स” ही डॉक्युमेंट्री निर्मित केली आहे. या लघु माहितीपटाला फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पैशाची जुळवाजुळव हा महत्वाचा मुद्दा आहे. पण विजयन सांगतात, ‘पैसा लागतोच! पण त्याहून जास्त महत्वाचे म्हणजे भटके, स्वच्छंद मन पाहिजे, मग कुठलेही ठिकाण दूर वाटत नाही!’ जगण्याचे बळ फिरतीतून मिळवणाऱ्या या जोडीला, उतारवयात कुटुंबीय, मित्रमंडळींकडून शहाणपणाचे, बचतीचे, कर्ज न काढण्याचे अनेक सल्लेही मिळालेत. पण या सगळ्याला मागे टाकून त्यांचा पुढचा प्रवास चालूच आहे.


आपला हा प्रवास अनेकानेक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून या चिवट माणसाने एक शॉर्टफिल्म काढायचे ठरवले. अनेक नामांकित हस्तीपुढे प्रस्ताव ठेवला, पण प्रत्येकाने दहा मिनिटांची फिल्म तीन-चार मिनिटांची करा, असा सल्ला दिला. आता हातात पैसा नसताना, कुणाही सरळमार्गी माणसाने हा सल्ला ऐकला असता. पण विजयन यांना ते काही पटले नाही. मग या माणसाने कॉपी बुकफिल्म्स ही अशीच एक छोटीशी फिल्मसंस्था गाठून, स्वतःच दहाएक मिनिटांची Invisible Wings नावाची फिल्म अपार कष्टाने तयार केली. पाचेक वर्षांपूर्वी, 15 ऑक्टोबर म्हणजेच अब्दुल कलामांच्या जन्मदिनी ती रिलीज केली. हा हा म्हणता नेटच्या जगतात ही फिल्म वाऱ्यासारखी पसरली, आजही पसरत आहे. यातून कित्येक लोक प्रेरणा घेताहेत. पण त्यामुळे त्यांचे कर्ज काही फिटत नाही. तरीही त्यांची जिद्द अपरंपार आहे. ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, कळावी म्हणून ते ती निरनिराळ्या भाषांमध्ये डब करत आहेत.

आता लोक मदत करतात, प्रवासाला प्रायोजक मिळतात. अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांनी प्रत्येकी रु. 50,000,
दिले. बेंगळुरूमधील चाहत्यांनी मिळून 3 ते 6 लाख जमवून दिले आहेत. यामुळे प्रवास-बजेटिंग पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. पण, या कीर्तीने विजयन बदलले नाहीत. ते सांगतात, “मी जे आहे, ते मी आहे. शर्ट आणि मुंडू घालून मी साधी राहणी जगतो. माझ्याकडे काही कोट आणि पँट्स आहेत, जे मी प्रवासात किंवा कुणाला भेटताना फक्त वापरतो.”

विजयन यांनी परदेशाच्या तुलनेत भारतातील सार्वजनिक वर्तन व लोक जीवनाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. “भारतात लोक कुठेही सार्वजनिकपणे लघुशंका करताना, सार्वजनिक थुंकताना आणि वादावादी करताना दिसतात. जेव्हा मी इतर देशांना भेट दिली, तेव्हा मी पाहिले की ते त्यांच्या भूमीचा आदर करतात. भारतीयांनीही आपल्या देशाचा आदर करणे आवश्यक आहे.”

विजयन हे ट्रॅव्हल पोर्टलद्वारे स्वतःच भ्रमंतीत ठिकाणे निवडतात व बुकिंग करतात. त्यांचा सर्वात आवडता देश आहे जपान! विजयन आणि मोहना यांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणींपैकी एक म्हणजे भाषा. पण, त्यांचे टूर गाईड त्यांना गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच तरुणांसाठी विजयन सल्ला देतात, “वेगवेगळ्या भाषा शिका म्हणजे तुमच्यात उत्साह येईल. भाषेद्वारे तुम्ही जग सहजपणे काबीज करू शकता. खाण्यासाठी, झोपण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी जगा.” इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचा सल्ला आहे, “सर्वजण शहरात राहतात. जा आणि जग एक्सप्लोर करा. आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडा!”

जगण्याच्या धकाधकीत आपली स्वप्नं कधी विरून गेली ते कळतही नाही. असुरक्षिततेची भावना, भविष्याची चिंता आपल्याला सतत करकचून बांधून ठेवते. पण अशी माणसे आपल्या स्वप्नांसाठी सगळ्या परीस्थितीवर मात करत हसतमुखाने समोर येतात, तेव्हा आपली स्वप्ने किमान उचकटून तरी बघण्याची इच्छा निर्माण होते. मोहनन यांचे शब्द ‘It’s possible! It’s possible! It’s possible!’, पुन्हा जगण्याचे, स्वप्नांचे नकाशे हातात घ्यायला भाग पाडतात.

सामान्य माणसातील जिद्द, संघर्ष, आणि भटकंतीच्या या वेडाला सलाम!

विजयन- मोहना दाम्पत्याचा पत्ता :
श्री बालाजी कॉफी हाऊस, सलीम राजन रोड, गांधीनगर, एर्नाकुलम (कोची), केरळ – 682020.

दांपत्याचे टूर-टूर पेज 👇
https://m.facebook.com/711619112245046/

“इनव्हिजिबल विंग्स” ही शॉर्ट फिल्म येथे पाहा 👇

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • वंडर वर्ल्ड : रेसट्रॅक प्लेया – जिथे 300 किलोचा दगडसुद्धा आपोआप चालतो! काय आहे हे जगातील अद्भुत आश्चर्य, जाणून घ्या…
  • वंडरवर्ल्ड : राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम ईमेलचा वापर करणारी टेकसॅव्ही राणी! जग तेव्हा ई-मेल बाबत जाणतही नव्हते! No 1 Knows

 


 


 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 23 देशांत भटकंतीअनुपम खेरअमिताभ बच्चनइनव्हिजिबल विंग्सजिगरबाज चहावालाडेस्टीनेशनपंतप्रधान नरेंद्र मोदीहिटलिस्टवर
Previous Post

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

खासदार उन्मेष पाटील यांची ॲग्रोवर्ल्डच्या कार्यालयास सदिच्छा भेट

Next Post
खासदार उन्मेष पाटील

खासदार उन्मेष पाटील यांची ॲग्रोवर्ल्डच्या कार्यालयास सदिच्छा भेट

Comments 2

  1. Pingback: Ram Setu Mystery : राम सेतूशी संबंधित न ऐकलेले रहस्य ; अमेरिकाही झाली नतमस्तक - Agro World
  2. Pingback: Non-Vegetarian Plants : होय ! या वनस्पती नॉनव्हेज खातात... जाणून घ्या.. मांसाहारी वनस्पती म्हणजे काय? - Agro World

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.